{"product_id":"digital-arthavyavastha","title":"डिजिटल अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003eसध्या आपण तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात जगत आहोत. पारंपरिक अर्थव्यवस्थेच्या जागी आता ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजेच डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. इंटरनेट, मोबाइल, कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), ब्लॉकचेन, आणि क्लाऊड संगणक यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद, पारदर्शक आणि सोपे झाले आहेत. 2015 मध्ये सुरू झालेल्या ‘डिजिटल इंडिया’ या अभियानामुळे भारतात डिजिटल बदलाची मजबूत सुरूवात झाली. णझख, इकखच ॲप, आधार कार्ड लिंक करणे, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन शिक्षण आणि बँकिंग या गोष्टींमुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार खूप सोपे झाले आहेत. या पुस्तकामध्ये ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजावले आहे. पुस्तकात चार भाग आहेत- डिजिटल बँकिंग, डिजिटल पैसे (चलन), तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सरकारी योजना. पुस्तकात सोपी भाषा वापरली आहे, हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांनाही उपयुक्त आहे. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर आपल्याला डिजिटल युगात आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्ग दाखवते. सायबर सुरक्षेची, डिजिटल साक्षरतेची आणि नागरिकांच्या सहभागाची जाणीव करून देते. भारत विकसित होण्यासाठी ही डिजिटल क्रांती खूप महत्त्वाची ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52771685466431,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/DigitalArthavyavastha_CANarendraNerpagar_1.jpg?v=1776176089","url":"https:\/\/primebookss.in\/products\/digital-arthavyavastha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}