{"product_id":"bhugol-abhyapanshastra-bhag-2","title":"भूगोल अध्यापनशास्त्र (भाग 2)","description":"\u003cp\u003eभूगोल अध्यापनशास्त्र हे पुस्तक बदलत्या शैक्षणिक परिप्रेक्ष्यात भूगोल विषयाचे अध्यापन अधिक सुसंगत, अनुभवाधारित आणि विद्याथकेंद्रित बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून अध्यापनशास्त्रातील विविध संकल्पना, पद्धती, साधने आणि मूल्यांकन तंत्रे यांचे सुसंगत व व्यवहार्य स्वरूपात सादरीकरण करण्यात आले आहे.\u003cbr\u003eभूगोल हा विषय केवळ नकाशे आणि आकृत्यांपुरता मर्यादित नसून पर्यावरण, हवामान, नैसर्गिक संसाधने, मानवी वसाहती, औद्योगिक विकास आणि जागतिक संबंध यांचा अभ्यास करणारा व्यापक विषय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, विश्लेषणात्मक विचार, समस्या सोडविण्याची कौशल्ये आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात वार्षिक नियोजन, घटक नियोजन, पाठयोजना, मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धती, अभ्यासक्रमातील सुधारणा, कृती संशोधन, तसेच भूगोल शिक्षकांचा व्यावसायिक विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा सविस्तर आढावा घेतला आहे. उदाहरणे, आकृत्या, तक्ते आणि उपक्रम यांच्या माध्यमातून विषय अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोपा करण्यात आला आहे.\u003cbr\u003eशिक्षक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कार्यरत शिक्षकांसाठी आणि शैक्षणिक संशोधकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. अध्यापनात नवकल्पना आणण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये भूगोलाविषयी आवड निर्माण करण्यासाठी आणि कौशल्याधारित शिक्षणाची दिशा देण्यासाठी हे पुस्तक निश्चितच सहाय्यभूत ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":55032822595903,"sku":null,"price":156.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/3_BhugolAdhyapanshastra_Bhag2_1.jpg?v=1785830112","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bhugol-abhyapanshastra-bhag-2","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}