{"product_id":"bhartiya-sanvidhan-manav-mukticha-jahirnama","title":"भारतीय संविधान - मानव मुक्तीचा जाहीरनामा","description":"\u003cp\u003eभारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या जगातील सर्वोत्तम मानवी मूल्यांचे एक अजब रसायन आहे. समाज परिवर्तनाच, व्यवस्था परिवर्तनाच एक अमोघ साधन आहे. भारतीय संविधानामुळेच उभी असलेली बहुजनांचे शोषण करणारी, अन्याय, अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार करणारी चातुर्वर्ण व्यवस्था आज बहुतांशी प्रमाणात (पुर्णतः नाही) जमीनदोस्त झालेली आहे, आडवी झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. भारतीय संविधानामुळेच कालचा दुर्बल आजचा सबल झालेला आहे. बेजान आणि मृतप्राय पडलेल्या मानवी शरीरात आज नवचैतन्य आलेले आहे. पेशवाईच्या काळात गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू घालून फिरणारा समाज आज सुटाबुटात वावरायला लागला आहे. कालचा गावकुसाबाहेर वास्तव्य करणारा समाज आज गावाच्या आत आलेला आहे. गावच्या मध्यापर्यंत येऊन पोहचला आहे. डोंगरदऱ्यात, गिरीकंदरात राहणारा समाज आज गावात ताठ मानेने राहत आहे. स्वभाव हरवलेल्या समाजमनात पुन्हा आत्मभान, आत्मबल, आत्मसन्मान, आत्मतेज निर्माण झालेले आहे, ते दिवसेंदिवस विकसित होत चाललेले आपणास दिसत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52770319597887,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatacheSanvidhan_VEC__DrRahulNikam_1.jpg?v=1776174631","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bhartiya-sanvidhan-manav-mukticha-jahirnama","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}