{"product_id":"bharatiya-nanakshastrachi-olkha","title":"भारतीय नाणकशास्त्राची ओळख","description":"\u003cp\u003eनाणी ही केवळ व्यवहाराची साधने नसून, ती संस्कृतीची प्रतिबिंबे आणि इतिहासाची जिवंत साक्ष आहेत. त्यांच्या सूक्ष्म रचनेत सत्तेचे वैभव, अर्थव्यवस्थेची घडण, श्रद्धा-विश्वासांची दिशा आणि कलेची अभिव्यक्ती दडलेली असते.\u003cbr\u003eया पुस्तकात नाणकशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, भारतीय नाण्यांचा प्राचीन ते आधुनिक काळातील प्रवास, तसेच नाण्यांमधून उलगडणारे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक आयाम सुलभ भाषेत मांडले आहेत. अभ्यासक, विद्याथ आणि रसिक वाचक यांना नाण्यांकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळावी, हीच या लेखनाची उद्दिष्टे.\u003cbr\u003eभारतीय नाण्यांची परंपरा ही वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे-जनपदांच्या साध्या नाण्यांपासून ते मुघल, मराठा आणि ब्रिटिश काळातील भव्य चलनप्रणालीपर्यंत. प्रत्येक नाणे हे एका युगाचे प्रतिबिंब आहे आणि त्या काळाची कथा सांगणारे मौन साक्षीदार आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक अभ्यासक्रमाशी सुसंगत असले तरी परीक्षापुरते मर्यादित नाही. इतिहासाच्या गाभ्याशी असलेली समृद्धता जपत, नाण्यांमधील कहाण्या जाणून घेण्याची जिज्ञासा वाढवणे आणि अभ्यासाची गोडी निर्माण करणे-हा यामागचा खरा हेतू आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52689298555199,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatiyaNanakshastrachiOlkha_DrSurajSonawane_1.jpg?v=1775310475","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatiya-nanakshastrachi-olkha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}