{"product_id":"bharatiya-arthavyavastha-1991-pasun-ii","title":"भारतीय अर्थव्यवस्था 1991 पासून (भाग 2)","description":"\u003cp\u003e1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, कोट्यवधी नागरिकांच्या आकांक्षा, संघर्ष आणि संधींचा इतिहास आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या त्रिसूत्रीपासून ते डिजिटल इंडिया, णझख आणि स्टार्टअप क्रांतीपर्यंतचा प्रवास हा धोरणात्मक धाडस आणि सामाजिक परिवर्तनाचा आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शेती, उद्योग, बँकिंग, डिजिटल क्रांती, स्टार्टअप संस्कृती आणि जागतिक स्तरावरील भारताची भूमिका यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आर्थिक धोरणांचा थेट परिणाम शेतकरी, कामगार, उद्योजक, विद्याथ आणि मध्यमवगय कुटुंबांच्या जीवनावर कसा होतो, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण येथे आहे.\u003cbr\u003eभारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना बेरोजगारी, विषमता आणि कौशल्य विकास यांसारखी आव्हानेही समोर आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा, क्षमता आणि भविष्यातील शक्यता समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरतो.\u003cbr\u003eभारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा केवळ आकडेवारीचा किंवा धोरणांचा अभ्यास नाही, तर तो सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. या पुस्तकात आर्थिक सुधारणा आणि डिजिटल क्रांतीने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक संरचनेवर केलेल्या परिणामांचा सखोल वेध घेतला आहे.\u003cbr\u003eयाचबरोबर, भारताच्या जागतिक भूमिकेतील बदल, विकसनशील देशांचा आवाज म्हणून उभे राहणे आणि आर्थिक राजनयातून निर्माण झालेल्या संधी यांचा चिकित्सक आढावा येथे आहे. त्यामुळे हे पुस्तक भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा संगम साधत, भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वांगीण चित्र वाचकांसमोर ठेवतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698687406399,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bharatiya_Arthavyavastha_1991_Pasun_-_II_Dr_Shubhangi_Pingale_1.jpg?v=1775383535","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatiya-arthavyavastha-1991-pasun-ii","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}