{"product_id":"bharatatil-vindyan-ani-tantradnyanacha-vikas","title":"भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास","description":"\u003cp\u003eआजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनावर आधारित असून, या क्षेत्रात भारताने प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेद, उपनिषद, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र यांसारख्या परंपरागत ज्ञानसंपदेतून विज्ञानाचा पाया घालण्यात आला. चरक, सुश्रुत, आर्यभट्ट यांसारख्या विद्वानांनी भारतीय विज्ञानाला दिशा दिली, तर आधुनिक काळात इस्रो, संगणक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांत भारताने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे.\u003cbr\u003eया पुस्तकाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, भारतीय परंपरेतील वैज्ञानिक विचारांची ओळख व्हावी आणि आधुनिक संशोधनाची प्रेरणा मिळावी, असा आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मूलभूत संकल्पना, त्यांचे समाजावर होणारे परिणाम, तसेच व्यवस्थापनाचे महत्त्व हे विषय सोप्या भाषेत मांडले गेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, व्यसनमुक्ती, अवयवदान यांसारख्या सामाजिक विषयांवरही विचारमंथन करण्यात आले आहे. पुस्तकाचे सहा विभाग विविध कालखंडातील वैज्ञानिक योगदान आणि व्यवस्थापनाच्या भूमिका स्पष्ट करतात. हे पुस्तक शिक्षक, विद्याथ आणि विज्ञानात रुची असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704286310719,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatatilVindyanAniTantradnyanachaVikas_DrDipakShirsat_1.jpg?v=1775546332","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatatil-vindyan-ani-tantradnyanacha-vikas","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}