{"product_id":"bharatatil-paryatan-utpadane","title":"भारतातील पर्यटन उत्पादने","description":"\u003cp\u003e    आधुनिक काळातील पर्यटकांच्या वर्गात विविध उद्देशांनी प्रवास करणाऱ्यांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः पर्यटनकाळ हा मर्यादित असतो. आठवड्यातील सुट्या, रजा तसेच एखाद्या कार्याचा वा कार्यक्रमाचा भाग म्हणून नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात निवास करणे. अभ्यास वा संशोधन करणे, सदिच्छा भेटीचा घटक म्हणून प्रसिद्ध स्थळे पाहणे यांसारख्या विविध हेतूंनी पर्यटकांची ये-जा चालू असते.\u003cbr\u003e    पर्यटनाचे क्षेत्र अंतर्देशीय तसेच आंतरराष्ट्रीय असते. जुन्या पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पर्यटनस्थळे विकसित करणे, ही पर्यटन उद्योगाची महत्त्वाची अंगे होत. अनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, त्यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धियंत्रणा उभी करणे, पर्यटकांना वाहतुकीच्या तसेच निवास-भोजनादी सुखसोयी उपलब्ध करून देणे, हेदेखील पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे घटक ठरतात. पर्यटनाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर परस्परांविषयी सामंजस्य व सद्भाव निर्माण करण्याचे कार्यही साधले जाते. \u003cbr\u003e    आधुनिकपूर्व काळातील प्रवासाची उद्दिष्टे प्राधान्याने धार्मिक, व्यापारी व विद्याध्ययनात्मक असत. पश्चिमी प्रबोधनकाळापासून एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन हा इहलोकनिष्ठ होऊ लागला व सांस्कृतिक, ऐतिहासिक, कालवाङ्मयीन, नव्याजुन्या निर्मितीबद्दल नवे आकर्षण निर्माण झाले. आधुनिक पर्यटनदृष्टीचा आरंभ तेव्हापासूनच झाला, असे म्हणता येईल. ही दृष्टी केवळ धनिक वर्गापुरतीच मर्यादित न राहता, ती सर्वसामान्य लोकांतही निर्माण होऊ लागली. \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52770675949887,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatatilParyatanUtpadane_DrDipakShirsat_1.jpg?v=1776175336","url":"https:\/\/primebookss.in\/products\/bharatatil-paryatan-utpadane","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}