{"product_id":"antarrashtriya-vyavasay-vyavasthapanachi-olkha","title":"आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eआंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनाची ओळख \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक वाचकांना आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या मूलभूत संकल्पना, सिद्धांत आणि व्यवहारिक पैलू समजावून सांगण्यासाठी तयार केलेले आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि शिथलीकरणामुळे व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून व्यवस्थापनाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले आहे. त्यातूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा अर्थ, महत्त्व, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यवसायातील फरक, व्यवसायाच्या वाढीस कारणीभूत घटक आणि प्रवेशाचे मार्ग यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे. जागतिकीकरणाच्या संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यापारावरील सिद्धांत, पोर्टरचा डायमंड सिद्धांत आणि भारतीय व्यवसायावर जागतिकीकरणाचा परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. व्यवसाय वातावरण, सांस्कृतिक घटक, PESTEL फ्रेमवर्क आणि धोका विश्लेषण यांचा विवेचनात्मक आढावा दिला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयाशिवाय जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, UNCTAD आणि भारताची परकीय व्यापार धोरणे यांचा सखोल अभ्यास पुस्तकात समाविष्ट आहे. परकीय चलन, चलन दर प्रणाली, देयक संतुलन, परकीय थेट गुंतवणूक आणि संस्थात्मक गुंतवणूक यांचे स्पष्टीकरण दिले आहे. जागतिक पुरवठा साखळी, लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी तसेच सांस्कृतिक विविधतेतील वाटाघाटी व संवाद यांचा आंतरराष्ट्रीय संदर्भात विचार करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक प्रकरणात आकृत्या, उदाहरणे आणि अभ्यासणार्थ प्रश्न दिलेले असून विषय अधिक स्पष्ट आणि सुलभ होईल याची काळजी घेतली आहे. विवेचन सुबोध, शास्त्रशुद्ध आणि मुद्देसूद ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे सखोल ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52708409835839,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AntarrashtriyaVyavasayVyavasthapanachiOlkha_DrSandipKotkar_1.jpg?v=1775642285","url":"https:\/\/primebookss.in\/products\/antarrashtriya-vyavasay-vyavasthapanachi-olkha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}