{"product_id":"ambedkari-chalvalicha-itihas","title":"आंबेडकरी चळवळीचा इतिहास","description":"\u003cp\u003e‘आंबेडकरी चळवळीचा इतिहास’ या ग्रंथामध्ये आंबेडकरी चळवळीचे तीन टप्पे सविस्तरपणे मांडले आहेत. पहिल्या टप्प्यात आंबेडकरपूर्व चळवळीचा इतिहास विशद केला आहे. यामध्ये दलित समस्येची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी, वसाहतकालीन सामाजिक स्थितंतर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आणि कार्य, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोड यांचे योगदान, तसेच राजष शाहू महाराज आणि महष विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  \u003cbr\u003eदुसऱ्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चळवळीचा आढावा घेतला आहे. यात सामाजिक, आर्थिक न्यायासाठी बाबासाहेबांचा संघर्ष, संविधान निर्मितीतील त्यांचे कार्य, महिला उद्धाराचे प्रयत्न, राष्ट्रउभारणीतील योगदान, जल, कृषी आणि कामगार विषयक भूमिका, तसेच बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानावर सखोल चर्चा करण्यात आली आहे.  \u003cbr\u003eतिसऱ्या टप्प्यात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतरची चळवळ मांडली आहे. रिपब्लिकन पक्षाचा उदय आणि विभाजन, दादासाहेब गायकवाड यांचा सत्याग्रह, दलित पँथर चळवळ, मा. कांशीराम, बामसेफ व बहुजन समाज पक्ष यांचा विकास, तसेच दलित स्त्रियांचा पितृसत्ता आणि विषमतेविरोधातील संघर्ष यावर भाष्य केले आहे.  \u003cbr\u003eविद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमानुसार एकाच ग्रंथात सविस्तर माहिती देण्याच्या उद्देशाने हा ग्रंथ लिहिण्यात आला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52769301135679,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AmbedkariChalvalichaItihas_ProfDrNishantShende_1.jpg?v=1776173917","url":"https:\/\/primebookss.in\/products\/ambedkari-chalvalicha-itihas","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}