{"product_id":"adhyayan-ani-adhyapan_dr-nagesh-sarvede","title":"अध्ययन आणि अध्यापन","description":"\u003cp\u003e“अध्ययन आणि अध्यापन” हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याशी सुसंगत अशा नवीन  अभ्यासक्रमावर आधारित असून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या बी.एड्. अभ्यासक्रमासाठी उपयुक्त ठरते. या ग्रंथात शैक्षणिक मानसशास्त्र, सामाजिक-सांस्कृतिक संदर्भातील शिक्षण, बुद्धिमत्ता, अध्ययनाचे घटक, अध्यापन प्रक्रिया, वर्गातील परस्परसंवाद, मानसशास्त्रज्ञांचे सिद्धांत, सर्वांसाठी अध्यापन तसेच अध्ययन सुलभ करण्याचे विविध मार्ग यांचा सखोल आढावा घेतला आहे.\u003cbr\u003eपुस्तकाची रचना NEP-2020 नुसार अद्ययावत अभ्यासक्रमाशी सुसंगत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसशास्त्रीय व सामाजिक दृष्टिकोन मांडण्यात आले आहेत. अध्यापनातील चिंतनशीलता, व्यावसायिक नीतिमत्ता आणि शिक्षकाची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला आहे. दिव्यांग, अध्ययन अक्षम, अतिक्रियाशील तसेच प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाच्या कार्यनीती स्पष्ट करण्यात आल्या आहेत. गट शिक्षण, सहकारी अध्ययन-अध्यापन, रचनावाद, ब्रुनर व ऑसुबेल यांच्या दृष्टिकोनावर आधारित ज्ञाननिर्मितीचे मार्गदर्शन या पुस्तकात दिलेले आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्याथ, शिक्षक, संशोधक आणि शिक्षणशास्त्रातील अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरते. अध्यापन व अध्ययनाच्या प्रक्रियेला अधिक सखोल, परिणामकारक आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. शिक्षणशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन आणि अध्यापनातील नवनवीन कार्यनीती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येक शिक्षक व विद्याथ यांच्यासाठी आवश्यक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715684430143,"sku":null,"price":626.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AdhyayanAniAdhyapan_DrNageshSarvede_1.jpg?v=1775814683","url":"https:\/\/primebookss.in\/products\/adhyayan-ani-adhyapan_dr-nagesh-sarvede","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}