{"product_id":"adhyayan-ani-adhyapan-h-n-jagtap","title":"अध्यापन आणि अध्ययन","description":"\u003cp\u003eशिक्षकशिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या दोन दशकांत झालेल्या व्यापक बदलांमुळे बी.एड. अभ्यासक्रमाचे स्वरूप अधिक समग्र, बहुविषयक आणि अनुभवाधारित झाले आहे. NCTE आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांच्या दिशादर्शक विचारसरणीमुळे अध्ययन, अध्यापन आणि मूल्यनिर्धारण या संकल्पनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मानसशास्त्र, समाजशास्त्र किंवा तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांचा अभ्यास आता शिक्षणाच्या संदर्भात, उपयोजनाधारित पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे, ज्यामुळे विद्याथ-शिक्षकांना शिकणाऱ्याच्या अनुभवांची रचना, अध्ययनावर परिणाम करणारे घटक आणि आधुनिक शैक्षणिक उपपत्ती यांची सखोल समज विकसित होते.\u003cbr\u003eया नव्या शैक्षणिक वातावरणात प्रभावी अध्यापन, चिंतनशील अध्यापन, तंत्रज्ञानाचा वापर, वर्गव्यवस्थापन, बहुविविधता हाताळणे आणि शिक्षकाचा व्यावसायिक विकास यांसारख्या घटकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुभवाधारित, आंतरक्रियात्मक आणि विद्याथ-केंद्रित अध्यापनाच्या अपेक्षा वाढत असताना, हा ग्रंथ अध्ययन-अध्यापनाच्या संकल्पना स्पष्ट, सोप्या आणि समकालीन पद्धतीने मांडतो. क्रमिक पुस्तकासारखा सहज आणि संदर्भग्रंथासारखा सखोल असलेला हा ग्रंथ शिक्षकशिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक विश्वासार्ह आणि आवश्यक मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52712541749567,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/9_AdhyayanAniAdhyapan_HNJagtap1.jpg?v=1775741610","url":"https:\/\/primebookss.in\/products\/adhyayan-ani-adhyapan-h-n-jagtap","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}