{"product_id":"abhyaskramantargat-bhasha","title":"अभ्यासक्रमांतर्गत भाषा","description":"\u003cp\u003e‘अभ्यासक्रमांतर्गत भाषा’ हे पुस्तक भाषेला केवळ विषय म्हणून न पाहता शिक्षणाच्या प्रत्येक घटकाची आधाररचना म्हणून अधोरेखित करते. भाषा ही विचारांची, संस्कृतीची आणि ज्ञानाची वाहक असल्याने तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.\u003cbr\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या बहुभाषिकतेच्या आणि मातृभाषेतून शिक्षणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून या पुस्तकात भाषिक कौशल्यांचा विकास, अध्यापनातील नवकल्पना आणि डिजिटल साधनांचा उपयोग यांचे सखोल विवेचन केले आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांच्या विविधतेचा आदर करून शिक्षकांना प्रभावी, सहभागी आणि संवेदनशील अध्यापन करता यावे, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते. सोप्या भाषेत, उदाहरणांसह आणि विद्याथ-केंद्रित दृष्टिकोनातून मांडलेले हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांसाठी प्रेरणादायी साथीदार ठरेल.\u003cbr\u003eआजच्या डिजिटल युगात शिक्षण अधिक गतिमान आणि संवादात्मक झाले आहे. ई-साधने, मल्टिमीडिया आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने भाषा अध्यापन अधिक आकर्षक आणि परिणामकारक बनवता येते. या पुस्तकात अशा आधुनिक साधनांचा उपयोग करून अध्यापन समृद्ध करण्याचे मार्गदर्शन दिले आहे, ज्यामुळे शिक्षकांना नव्या शैक्षणिक आव्हानांना समर्थपणे सामोरे जाता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":54923902320959,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/1_AbhyaskramantargatBhasha_1.jpg?v=1785766845","url":"https:\/\/primebookss.in\/products\/abhyaskramantargat-bhasha","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}