{"product_id":"aadhunik-marathi-wadmyacha-itihas","title":"आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास (कालखंड : 2000 ते 2020)","description":"\u003cp\u003eसाहित्य हा समाजाचा आरसा असतो. तो केवळ शब्दांचा संग्रह नसून मानवी जीवन, संघर्ष आणि संस्कृतीचा जिवंत दस्तऐवज असतो. 21 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत मराठी वाङ्मयाने क्रांतिकारी स्थित्यंतर अनुभवले. जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट आणि बदलती सामाजिक मूल्ये यांचे प्रतिबिंब कवितेत, कथेत, कादंबरीत आणि गद्यात स्पष्टपणे उमटले.\u003cbr\u003eया ग्रंथात ग्रामीण कवितेतील बदलती शेती-मातीची नाळ, दलित कवितेतील विद्रोह आणि जाणीव, तसेच आदिवासी साहित्यातील निसर्गप्रेम आणि अस्तित्वसंघर्ष यांचा सखोल अभ्यास केला आहे. आत्मचरित्रे, चरित्रे आणि प्रवासवर्णनांमधून उमटणारे मानवी अनुभव यांचा मागोवा घेतला आहे. कथा-कादंबरी क्षेत्रातील दलित व ग्रामीण जाणिवांचा आविष्कार, प्रादेशिकता आणि जागतिकीकरणाचे पडसाद यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. तसेच भावभावनांची तरल अभिव्यक्ती करणाऱ्या ललित गद्याचे बदलते स्वरूपही उलगडले आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि जिज्ञासू वाचकांसाठी आधुनिक मराठी साहित्याचा सखोल आणि सर्वसमावेशक आढावा घेणारे मार्गदर्शक ठरेल. परीक्षेच्या तयारीसाठी तसेच साहित्याच्या प्रवासाची दिशा समजून घेण्यासाठी हा ग्रंथ दीपस्तंभाप्रमाणे उपयुक्त ठरेल. ‘आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास (कालखंड 2000 ते 2020)’ म्हणजे एका कालखंडाचा जिवंत दस्तऐवज-साहित्याच्या प्रवासाची दिशा दाखवणारा.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703869763903,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AadhunikMarathiWadmyachaItihas_ProfRameshwarNimbalkar-1.jpg?v=1775541126","url":"https:\/\/primebookss.in\/products\/aadhunik-marathi-wadmyacha-itihas","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}