{"product_id":"गाणे-जनमाणसाचे-काव्यसंग्रह","title":"गाणे जनमाणसाचे (काव्यसंग्रह)","description":"\u003cp\u003eस्वत: शेतकरी असल्याने हयातभर माणूसकीचे गाणे गाणारे शाहिर, कवी नानाभाऊ पाटील कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावखेड्याच्या एक-एका चौकाला पायदळी तुडवत सामाजिक आरसा उभा करण्याचे कार्य साहित्य सेवेतून निष्ठेने करत आलेले आहेत. जीवनोत्सुक कवीमन आणि व्यवस्थानिर्मित अवस्था नानाभाऊ विवेकी भावनेतून पाहतात व काव्यप्रतिभेतून समाजाभिमुख विषयांची गुंफन आपल्या गाणे जनमाणसाचे यातून मांडतात. नानाभाऊंच्या काव्य भावसृष्टीत आत्मानुभूतीचे व संवेदनशील मनाच्या कंगोऱ्याला स्पर्श करणाऱ्या वास्तवलक्ष्यी भूमिकेचे नानाविध पैलू अंतर्बाह्य चिंतन करायला लावणारे आहेत. \u003cbr\u003eशाहिर नानाभाऊ पाटील यांच्या कवितेतील अध्यात्म, समाजिक प्रश्न, कृषक जीवनातील रहस्य, व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, ग्रामीण संस्कृती व लोकसंस्कृतीच्या परिपेक्षातून मानवतावादी प्रवास करणारी प्रबोधनात्मक शब्दलेखनीची धार वाचकांना जवळची वाटते. अहिरानी व मराठीतून काव्यगीतांची वाड.मयीन समृध्दता कुशलतेने भाषिक टिळा लावणारी आहे. भाषिक तंत्र व व्याकरणाच्या कोसोदूर असलेली ग्रामीण वसा जोपासणारी खान्देशी बाज असलेली कविता सेंद्रियतेची आदर्शवादी भूमिका अंतकरणाची भाषा बोलते. शाहिर नानाभाऊ पाटील यांच्या कष्टाची भावना, काव्यगीताच्या अवकाशाला प्रामाणिकतेची गवसणी घालते. मानवतावादी प्रबोधनाची धारणा नानांच्या सात्विक व संवेदनशील भावविश्वाची अनुभूती वाचकाला देत असते, हे भावविश्व गाणे जनमाणसाचे या साहित्यकृतीतून नवी क्षितिजे उजळेल अशा शुभेच्छा..\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eकेंद्रिय अध्यक्ष-खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धु्ळे\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788665319743,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/GaneJanmansanche_ShahirNanabhauPatil-DrSadashivSuryawanshi_1.jpg?v=1776252976","url":"https:\/\/primebookss.in\/products\/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}