{"title":"राज्यशास्त्र","description":"","products":[{"product_id":"rajkiya-samajashtra","title":"राजकीय समाजशास्त्र","description":"","brand":"Prime Books - Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52627415007551,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/RajkiyaSamajshastra_DrBapuraoAndhale-9.jpg?v=1775202869"},{"product_id":"bharatiya-rajyaghatna","title":"भारतीय राज्यघटना","description":"","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52627983860031,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhartiyaRajyaghatana_VEC_NandkumarBharambe-9.jpg?v=1775203422"},{"product_id":"aadhunik-bharatache-rajkiya-vichar","title":"आधुनिक भारताचे राजकीय विचार","description":"\u003cp\u003eया पुस्तकात आधुनिक भारताच्या लोकशाही विचारांची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख राजकीय विचारवंतांचे अध्ययन करण्यात आले आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेच्या विचारांची पेरणी या विचारवंतांनी केली असून भारतीय लोकशाही नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायाची हमी देते. या पार्श्वभूमीचे सुलभ आकलन व्हावे म्हणून हे पुस्तक तयार केले आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले, तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे आधुनिक राजकीय व्यवस्थेची रचना केली. संविधान निर्मितीत डॉ. आंबेडकरांचे योगदान अनमोल आहे आणि म्हणूनच या पुस्तकात महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या राजकीय विचारांवर विशेष प्रकाश टाकला आहे. गांधींच्या सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सर्वोदय व हिंद स्वराज्य यांसारख्या संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यांचा जीवनपरिचय, प्रभाव आणि पंचसूत्री यांचा उलगडा केला आहे. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांचा जीवन प्रवास, त्यांच्यावर पडलेले प्रभाव व प्रमुख विचार मांडले आहेत. अस्पृश्यता, संविधानवाद, सामाजिक न्याय, आरक्षण, महिला स्वातंत्र्य व हिंदू कोड बिल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. गांधींचे राष्ट्रवाद, धर्म-राजकारण, आरोग्य, स्वच्छता व वंचितांसाठीचे विचार विशद केले आहेत, तर डॉ. आंबेडकरांचे उदारमतवाद, राष्ट्रवाद, राज्य समाजवाद, धर्मनिरपेक्षता व बौद्ध धर्मावरील विचार समजावले आहेत. सहज-सोप्या भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी, अभ्यासक व वाचकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701400203583,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AadhunikBharatacheRajkiyaVichar_ProfDrRajendraNadekar_1.jpg?v=1775480453"},{"product_id":"aadhunik-karyalay-vyavstapan","title":"आधुनिक कार्यालय  व्यवस्थापन","description":"\u003cp\u003eआधुनिक कार्यालय व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले उपयुक्त पाठ्यपुस्तक आहे. आजच्या व्यावसायिक वातावरणात आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांची ओळख करून देत हे पुस्तक विद्यार्थ्यांना आधुनिक कार्यालयीन कार्यपद्धती, तांत्रिक प्रगती आणि प्रशासकीय धोरणे सोप्या भाषेत समजावून सांगते.\u003cbr\u003eया पुस्तकात आधुनिक कार्यालयाची संकल्पना व स्वरूप, कार्यालयीन रचना व पर्यावरण, प्रणाली व प्रक्रिया, फॉर्म व अभिलेख व्यवस्थापन तसेच सभा आयोजन यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.\u003cbr\u003eराष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केलेले हे पुस्तक विद्याथ व प्राध्यापकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक साधन ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701418717503,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KaryalayVyavasthapan_DrSwapnilMishra_1.jpg?v=1775480774"},{"product_id":"gramvikasacha-dipstambh-panchyatraj","title":"ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज","description":"\u003cp\u003e‘ग्रामविकासाचा दीपस्तंभ : पंचायतराज’ हे पुस्तक भारतातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा ऐतिहासिक प्रवाह, सांगोपांग रचना, तात्त्विक पाया आणि समकालीन आव्हाने समजून घेण्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरते.\u003cbr\u003eपंचायतराज व्यवस्थेची निर्मिती ही केवळ प्रशासनिक चौकट नसून लोकशाहीचे लोकांपर्यंत पोहोचणारे प्रत्यक्ष रूप आहे. या ग्रंथातून वाचकांना त्रिस्तरीय व्यवस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या सर्व घटकांचे कार्य, जबाबदाऱ्या आणि निर्णय प्रक्रियेची स्पष्ट ओळख होते.\u003cbr\u003eयाशिवाय समकालीन ग्रामीण समस्या, विकास योजना, स्थानिक प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची भूमिका आणि सुधारणा दृष्टीकोन यावर आधारित मार्गदर्शन हे पुस्तक व्यवहारात कार्य करणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरते.\u003cbr\u003eजिल्हा प्रशासन, पंचायत कर्मचारी, स्थानिक प्रतिनिधी, विद्याथ, संशोधक आणि ग्रामीण विकासात कार्यरत प्रत्येकासाठी हे पुस्तक ज्ञान, कौशल्य आणि दृष्टी यांचा संतुलित संगम घडवते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701430022463,"sku":"9789373446639","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PanchayatRaj_SanjayPatil-MPSCCopy_1.jpg?v=1775481509"},{"product_id":"panchayatraj","title":"पंचायतराज","description":"\u003cp\u003e“गावकऱ्यांच्या आवाजाला लोकशाहीचे बळ देणारी व्यवस्था म्हणजे ‘पंचायतराज’ - आणि हे पुस्तक त्या व्यवस्थेचा समग्र आरसा आहे.” भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार ग्रामपातळीवर जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणारी पंचायतराज व्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. शासनाच्या योजना, निधी आणि धोरणांचे खरे स्वरूप गावापर्यंत पोहोचावे, त्याचे नियोजन स्थानिक गरजांनुसार व्हावे, आणि सामान्य जनतेला स्वतःच्या विकासात भागीदार होता यावे, हीच या व्यवस्थेची मूलभूत कल्पना आहे.\u003cbr\u003eभारतीय लोकशाहीचे खरे यश मोजायचे असेल, तर ते तळागाळातील लोकांपर्यंत अधिकार, विकास व स्वायत्तता किती पोहोचली आहे, यावरून ठरते. या पार्श्वभूमीवर पंचायतराज व्यवस्था ही केवळ प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाचे माध्यम नसून, ती समाज परिवर्तनाची शक्ती आहे. या पुस्तकात पंचायतराज व्यवस्थेचा ऐतिहासिक व वैचारिक मागोवा, घटनेतील 73 वी दुरुस्ती, त्रिस्तरीय रचना, विविध योजनांची अंमलबजावणी, लोकसहभाग, ग्रामसभा आणि समित्यांचे अहवाल, धोरणात्मक शिफारशी आणि वास्तवातील अडथळे  इ.ची मांडणी केली आहे. या पुस्तकाची भाषा विद्यार्थ्यांकरिता सुलभ, परीक्षार्थ्यांसाठी मुद्देसूद व अभ्यासकांसाठी संदर्भयुक्त आहे. हे पुस्तक म्हणजे राज्यशास्त्र, सार्वजनिक प्रशासन व ग्रामीण विकास या क्षेत्रांतील अभ्यासकांसाठी एक सखोल मार्गदर्शक ठरेल. \u003cbr\u003e“गावकुसातील लोकशाही समजून घेण्याचा, तिच्यातील आव्हानांचा आणि संधींचा अभ्यास करण्याचा, आणि जनतेच्या हातात विकासाचे सूत्र सोपवणाऱ्या व्यवस्थेचा अभ्यास करण्याचा हा एक विश्वासार्ह प्रयत्न आहे.”\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701486711103,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PanchayatRaj_DrSanjayKPatil_1.jpg?v=1775485442"},{"product_id":"bharatache-sanvidhan-vec","title":"भारताचे संविधान","description":"\u003cp\u003eभारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचे हृदय आहे. हे केवळ कायद्यांचे संकलन नसून, भारतीय समाजाच्या मूल्यांना, हक्कांना आणि कर्तव्यांना दिशा देणारा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने लोकशाही प्रणाली स्वीकारली, आणि तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक व्यापक व सर्वसमावेशक संविधान तयार करण्यात आले. \u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात भारतीय संविधानाची संकल्पना साध्या, सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत मुद्देसूदपणे मांडली आहे. संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, राज्यघटनेची रचना, संविधानाची प्रासंगिकता, कायद्याचे राज्य, मार्गदर्शक तत्वे यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. हा ग्रंथ महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथ, अभ्यासक, संशोधक आणि संविधान जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरेल, या दृष्टीनेच हा लेखन प्रपंच केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52769486340415,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatacheSanvidhan_VEC_1.jpg?v=1776174277"},{"product_id":"bhartiya-sanvidhan-manav-mukticha-jahirnama","title":"भारतीय संविधान - मानव मुक्तीचा जाहीरनामा","description":"\u003cp\u003eभारतीय संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, मानवतावाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या जगातील सर्वोत्तम मानवी मूल्यांचे एक अजब रसायन आहे. समाज परिवर्तनाच, व्यवस्था परिवर्तनाच एक अमोघ साधन आहे. भारतीय संविधानामुळेच उभी असलेली बहुजनांचे शोषण करणारी, अन्याय, अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार करणारी चातुर्वर्ण व्यवस्था आज बहुतांशी प्रमाणात (पुर्णतः नाही) जमीनदोस्त झालेली आहे, आडवी झालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. भारतीय संविधानामुळेच कालचा दुर्बल आजचा सबल झालेला आहे. बेजान आणि मृतप्राय पडलेल्या मानवी शरीरात आज नवचैतन्य आलेले आहे. पेशवाईच्या काळात गळ्यात गाडगे आणि कमरेला झाडू घालून फिरणारा समाज आज सुटाबुटात वावरायला लागला आहे. कालचा गावकुसाबाहेर वास्तव्य करणारा समाज आज गावाच्या आत आलेला आहे. गावच्या मध्यापर्यंत येऊन पोहचला आहे. डोंगरदऱ्यात, गिरीकंदरात राहणारा समाज आज गावात ताठ मानेने राहत आहे. स्वभाव हरवलेल्या समाजमनात पुन्हा आत्मभान, आत्मबल, आत्मसन्मान, आत्मतेज निर्माण झालेले आहे, ते दिवसेंदिवस विकसित होत चाललेले आपणास दिसत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52770319597887,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatacheSanvidhan_VEC__DrRahulNikam_1.jpg?v=1776174631"},{"product_id":"constitution-of-india","title":"Constitution of India","description":"\u003cp\u003eThe Indian Constitution is the heart of India's democracy. It is not just a collection of laws, but a guiding document that directs the values, rights, and duties of Indian society. After independence, our country adopted a democratic system and created a comprehensive, inclusive constitution to ensure its successful implementation. This book explains the concept of the Indian Constitution in clear and simple language. It provides a detailed discussion on the historical background of the constitution, fundamental rights, duties, the structure of the state, the relevance of the constitution, the rule of law, and directive principles. This work is designed to be useful for college students, exam aspirants, scholars, researchers, and anyone who wants to understand the constitution.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52771090039103,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ConstitutionofIndia_DrSanjayKPatil_1.jpg?v=1776175756"},{"product_id":"bharatachi-rajyaghatna","title":"भारताची राज्यघटना","description":"\u003cp\u003e‘भारताची राज्यघटना’ नव्या पिढीसाठी मार्गदर्शक या पुस्तकात भारतीय राज्यघटनेची मूलभूत संकल्पना, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये, उद्देश पत्रिका, राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे, तसेच केंद्र व राज्य यांच्यातील सत्तावाटप याविषयी सुलभ भाषेत स्पष्ट माहतीि दिली आहे.\u003cbr\u003eभारतीय राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक नागरिकासाठी एक जीवनदृष्टी आहे. ही राज्यघटना लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, आणि लोककल्याण या मूल्यांवर आधारित असून, आज ती संपूर्ण जगासाठी एक आदर्श बनली आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांना आणि सर्वच वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक संविधानाची मूलतत्त्वे उलगडून दाखवते. जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788547977535,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatachiRajyaghatna_DrMadhavWaghamare_1.jpg?v=1776249572"},{"product_id":"sanvidhan-gaurav","title":"संविधान गौरव","description":"\u003cp\u003eभारतीय संविधानाचे निर्माण युगप्रवर्तक क्रांती आहे. हजारो वर्षांच्या इतिहासात भारतीय प्रजेला अपूर्व अशी संविधानात्मक मूल्यांची जीवन प्रणाली लाभली आहे. संविधानात्मक क्रांतीने भारताचे स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य प्रस्थापित झाले आहे. भारताचे विकार मुक्त, भयमुक्त राष्ट्र घडविले आहे. भारतात मानवतेचे युग अवतरले, भारतीय प्रजासत्ताक जगात आदर्श ठरले आहे त्याचे श्रेय स्वातंत्र्य संग्रामाप्रमाणेच मुलभूत सामाजिक परिवर्तनाच्या क्रांती लढ्यास देखील आहे. संविधानात्मक प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सव प्रसंगी सामाजिक क्रांती संग्रामाचा अभिमानाने, स्वाभिमानाने गौरव होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802789540159,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SanvidhanGaurav_BhatuAmbarMangale_1.jpg?v=1776413001"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/political-science.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}