{"title":"Marathi \u0026 Literature","description":"","products":[{"product_id":"yethe-aamchahi-shrvasa-kendto-aahe","title":"येथे आमचाही श्वास कोंडतो आहे! (काव्यसंग्रह)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eप्रभूच्या कवितेविषयी...\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: left;\"\u003e    प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे भान देणारी कविता आहे. \u003cbr\u003e\u003cbr\u003e    ही कविता फॅसिस्ट प्रवृत्ती आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या विरोधात आहे. म्हणूनच या कवितेत सर्वप्रकारच्या अधोगामी वृत्तीची भलावण करणाऱ्या छद्म राजसत्तेच्या व व्यवस्थेच्या धुरिणांकडून ऊर्ध्वगामी तत्त्वविचारांचा केला जाणारा संकोच आणि जल, जंगल, जमीन या नैसर्गिक स्रोतांवर आपली पिढीजात अधिसत्ता असलेल्या आदिवासींच्या जगण्यातील कोंडी अनुभवणारा श्वास - ‘विचार’ आणि ‘जगणे’ - अशा द्विविध पातळ्यांवरील एकूणच संघर्षाशी निगडित आहे. हा संघर्ष आदिवासी समूहांच्या केवळच आर्थिक जगण्याशी संबंधित नसून तो त्यांच्या जगण्यातील भावजीवनाशी आणि सांस्कृतिक मूल्यजाणिवांशीही जुळलेला आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e    याच अंगाने या कवितेत फॅसिस्ट प्रवृत्तीच्या धोरणांनी मानवी कल्याणाची विचारसरणी आणि आदिवासी समूहांचे जगणे या दोहोंच्या वाट्याला येणाऱ्या कोंडीतून उद्भवलेले गुदमरणे तीव्रपणे अधोरेखित झाले आहे. या अधोरेखनात समकालीन राजकारण, नवभांडवली वृत्ती, आदिवासी समूह आणि त्यांचे नैसर्गिक हक्क व त्यांचे भावजीवन यांच्यातील आंतरसंबंध व आंतरसंघर्षाच्या अनेकविध कडा आणि नवभांडवली अधिसत्तेचा राजसत्ताक व्यवस्थेसोबत अर्थव्यवहाराच्या पातळीवरील असलेला छुपा अजेंडा आहे. त्यातून नैसर्गिक अधिवासात आपले जीवन जगणाऱ्या आदिवासी समूहांच्या वाट्याला विकासाच्या नावावर येणारी घुसमट, त्यांचे उद्ध्वस्तीकरण व त्यांचे मरण... असा या कवितेचा संवेद्य परीघ आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e    म्हणूनच आजच्या बदलत्या वातावरणात नवभांडवली राजसत्ता आणि कार्पोरेट जग यांच्या युतीचा अमानवी चेहरा लक्षात घेऊन त्यातून आकाराला आलेल्या दुष्ट धोरणांचे फलित म्हणून आदिवासी समूहांच्या वाट्याला येणारे विनाशाच्या समकालीन वास्तवाचे अनेक प्रस्तर नेमकेपणाने उलगडून दाखवणारी या संग्रहातील कविता आपल्या समकालीन आदिवासी मराठी कवितेतील एक महत्त्वाचे प्रकटन आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रो. डॉ. अशोक नामदेव पळवेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Books - Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52602370425151,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/YetheAmchaShwasKondtoAhe_RajgadkarSir-9.jpg?v=1775144990"},{"product_id":"kavita-khandeshachi","title":"कविता खानदेशची","description":"","brand":"Prime Books - Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52628127711551,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavitaKhandeshachi_FulaBagul-9.jpg?v=1775203784"},{"product_id":"bhasha-jivanvyavahar-aani-sanvadkaushalye","title":"भाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eभाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये\u003c\/strong\u003e हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. भाषा ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील संवाद अधिक प्रभावी, स्पष्ट आणि समंजस व्हावा, यासाठी भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, विविध रूपे, कार्ये आणि उपयोजन यांचे सुलभ विवेचन या पुस्तकात केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमौखिक व लिखित भाषा, उच्चारण व लेखनाचे परस्परसंबंध, श्रवण व संभाषणाचे महत्त्व, तसेच संवादकौशल्ये—श्रवण, भाषण, संभाषण, निवेदन, लेखन, सारांशलेखन, भाषांतर, मुलाखत आणि कल्पनाविस्तार—यांचा विस्ताराने आढावा घेतला आहे. ही कौशल्ये आत्मसात केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, व्यक्तिमत्त्व विकास साधतो आणि ज्ञान प्रभावीपणे मांडता येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात शैक्षणिक अभ्यासक्रमाशी सुसंगत तसेच प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी माहिती दिली आहे. डिजिटल युगातील संकेतस्थळे, ब्लॉग्स आणि शैक्षणिक लेखसंग्रहांचा आधार घेतलेला असल्यामुळे हे लेखन कालानुरूप आणि विद्यार्थ्यांच्या गरजांशी सुसंगत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक भाषेचे शास्त्र, तिचे व्यवहारातील स्थान आणि संवादकौशल्यांचा व्यावहारिक उपयोग समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. विद्यार्थ्यांना उत्तम संवाद साधण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये निश्चितच उपयुक्त ठरतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698635796799,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bhasha_Jivanvyavahar_Aani_Sanvadkaushalye_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543912"},{"product_id":"marathi-bhasha-swarup-lekhan","title":"भाषा : स्वरूप व लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eभाषा : स्वरूप व लेखन\u003c\/strong\u003e हे पुस्तक मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासावर प्रकाश टाकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मानवी संस्कृती, विचार आणि संवेदनांचा आरसा आहे. या पुस्तकात भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, मानवी जीवनातील स्थान, तसेच बोलीभाषांचे वैविध्य यांचे सुलभ विवेचन केले आहे. वऱ्हाडी, मालवणी, कोकणी, अहिराणी, तावडी, दख्खनी अशा विविध बोलींच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवरही विचार करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात प्रमाणभाषेचे शास्त्रशुद्ध स्वरूप, तिची आवश्यकता आणि बोलीभाषांशी असलेले साम्य-भेद स्पष्ट केले आहेत. आधुनिक लेखनशैलीत विरामचिन्हांचा नेमका उपयोग कसा करावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच परिभाषेचे शुद्ध व तांत्रिक स्वरूप, विविध क्षेत्रांतील पारिभाषिक संज्ञा आणि आधुनिक परिभाषेची उपयुक्तता यांचे विवेचन केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदेवनागरी लिपीची ओळख, तिची वैशिष्ट्ये, उच्चारण व लेखनातील संबंध आणि मराठी लिपीसमोर असलेली आव्हाने यांचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि भाषाप्रेमींना मराठी भाषेचे स्वरूप, तिचे शास्त्र आणि व्यवहारातील स्थान समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698638090559,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bhasha_Swarup_V_Lekhan_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543883"},{"product_id":"marathi-bhashechi-pragat-kaushalye","title":"मराठी भाषेची प्रगत कौशल्ये","description":"\u003cp\u003eतुम्ही तुमच्या मराठी भाषेच्या कौशल्यांना अधिक प्रगत करू इच्छिता? तुमच्या विचारांना आणि कल्पनांना शब्दांचे अचूक रूप देऊ पाहता? मग मराठी भाषेची प्रगत कौशल्ये हे खास तुमच्यासाठीच तयार केलेले लेखन! हे लेखन केवळ व्याकरण आणि नियमांपुरते मर्यादित नाही, तर ते तुम्हाला भाषिक समृद्धीच्या पुढील टप्प्यावर घेऊन जाते.\u003cbr\u003eयामध्ये भाषांतर, उताऱ्याचे आकलन आणि त्यावरील प्रश्नोत्तरे, सारांश लेखन आणि कल्पनाविस्तार लेखन अशा चार महत्त्वाच्या कौशल्यांवर सखोल लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक मुद्दा विद्यार्थ्यांसाठी सोप्या भाषेत आणि अत्यंत सुलभ रीतीने मांडला आहे. क्लिष्ट संकल्पनांनाही सहजपणे समजून घेण्यासाठी विविध उदाहरणे, आकृत्या आणि सोप्या तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.\u003cbr\u003eहे लेखन म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर मराठी भाषेच्या प्रगत प्रवासातील तुमचा खरा मार्गदर्शक आहे. भाषांतराचे योग्य नियम शिकण्यापासून ते मोठ्या उताऱ्याचे अचूक सारांश लेखन करण्यापर्यंत, आणि तुमच्या कल्पनांना प्रभावीपणे शब्दांत मांडण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर हे तुम्हाला मार्गदर्शन करेल.\u003cbr\u003eतुमच्या भाषिक मर्यादा दूर करून, तुमच्या लेखनाला एक वेगळी ओळख देण्यास हे लेखन तुम्हाला मदत करेल. मराठी भाषेवरची तुमची पकड अधिक मजबूत करून, तुम्हाला आत्मविश्वास देण्याचे सामर्थ्य यात आहे. चला, या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात करूया आणि आपल्या मराठी भाषेच्या कौशल्यांना एक नवी दिशा देऊया!\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698639008063,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Marathi_Bhashechi_Pragat_Kaushalye_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543860"},{"product_id":"prasarmadhyamansathi-lekhan","title":"प्रसारमाध्यमांसाठी लेखन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eप्रसारमाध्यमांसाठी लेखन\u003c\/strong\u003e हे पुस्तक आधुनिक माध्यमसृष्टीतील लेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. वृत्तपत्र, रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांसारख्या प्रमुख माध्यमांवरील लेखनाची संकल्पना, स्वरूप, भूमिका आणि त्यातील विविध प्रकार—बातमी, निवेदन, जाहिरात, मुलाखत, माहितीपर कार्यक्रम—यांचे सुलभ आणि स्पष्ट विवेचन येथे केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना माध्यमविषयक लेखन समजून घेणे सोपे व्हावे आणि परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. आधुनिक काळात विद्यार्थी केवळ वाचक नसून संभाव्य लेखक, निवेदक, पत्रकार आणि सर्जकही आहे; त्याला दिशा दाखवणारे आणि भाषिक जाणिवांना पोषक ठरणारे हे लेखन ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुस्तकात वृत्तपत्रांसाठी बातमी लेखन, वैचारिक व ललित लेखन, जाहिरात लेखन, रेडिओवरील उद्घोषणा, बातम्या, रूपक, श्रुतिका, भाषण, जाहिरात तसेच दूरचित्रवाणीवरील बातम्या, मुलाखती, वृत्तनिवेदन आणि माहितीपर कार्यक्रम यांचा सविस्तर आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना, पत्रकारितेच्या अभ्यासकांना आणि प्रसारमाध्यमांच्या जाणिवेत रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त मार्गदर्शक ठरेल. माध्यमांच्या स्वरूप, जबाबदाऱ्या आणि समाजावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणारे हे लेखन विचारप्रवृत्तीला चालना देईल आणि संवादकौशल्ये अधिक प्रभावी बनवेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698644447551,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Prasarmadhyamansathi_Lekhan_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543836"},{"product_id":"marathi-bhasha-vyavaharik-kaushalye-bhag-1","title":"मराठी भाषा व्यावहारिक कौशल्ये (भाग-1)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eव्यावहारिक यशाची गुरुकिल्ली\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारात अचूक आणि प्रभावी उपयोग करता येणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘व्यावहारिक कौशल्य’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात माध्यम म्हणजे काय?, मुद्रित माध्यमे (वर्तमानपत्र), श्राव्य माध्यमे (आकाशवाणी), मुलाखत तंत्र, ग्रंथ परीक्षण यांसारख्या व्यवहारातील कौशल्यांचे सखोल आणि व्यावसायिक पद्धतीने विवेचन करण्यात आले आहे. लेखन, निवेदन, संवाद कौशल्ये, विश्लेषणात्मक दृष्टिकोन, भाषेची अचूकता आणि अभिव्यक्तीचा प्रगल्भतेकडे होणारा प्रवास, हे सर्व पैलू लेखकाने अत्यंत सुसंगत आणि सरळ भाषेत मांडले आहेत.\u003cbr\u003eप्रा. डॉ. माळी यांचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातील तसेच आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रत्यक्ष कामकाजाचा दीर्घ अनुभव, त्यांची भाषाविषयक समज, तसेच विद्यार्थ्यांच्या गरजांची अचूक जाण या साऱ्या गोष्टी पुस्तकाच्या प्रत्येक पानावर जाणवतात. ‘शिकवण्याइतकंच, शिकण्यालाही मार्गदर्शन लागतं’ हे जाणून त्यांनी हे लेखन केवळ शैक्षणिक न राहता, व्यवहारात उतरण्याजोगं केलं आहे.\u003cbr\u003eविद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, अभ्यासक तसेच इतर क्षेत्रातील व्यावसायिक यांना हे पुस्तक स्वत:च्या व्यावहारिक कौशल्यांची धार अधिक तीव्र करण्यासाठी एक विश्वासार्ह साधन ठरेल, यात शंका नाही.\u003cbr\u003eव्यावहारिक यशाच्या वाटेवर चालताना हा मार्गदर्शक ग्रंथ नक्कीच नवी कौशल्य पेरणारा ठरेल!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर वासुदेव वले,\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसदस्य, मराठी अभ्यास मंडळ, \u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.\u003cbr\u003eउपप्राचार्य, श्री शेठ मु. मा. महाविद्यालय, पाचोरा.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698645397823,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Vyavaharik_Kaushalye_Dr_Sandip_Mali_1.jpg?v=1775543808"},{"product_id":"radio-joky","title":"रेडिओ जॉकी","description":"\u003cp\u003eनमस्कार श्रोते हो ! आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. तीनशे अठ्ठ्याहत्तर अंश सात आठ मीटर अर्थात सातशे नव्व्यान्नव किलो हर्ट्स आकाशवाणीच्या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची पाच वाजून पन्नास मिनिटं व दहा सेकंद झाले आहेत... इथून सुरू झालेला पारंपरिक रेडिओचा आवाज आता नमस्कार मित्रांनो! कसे आहात... ट्रॅफिकमध्ये अडकले असाल तर चिंता करू नका, कारण तुमच्या सोबतीला आहे तुमचा दोस्त ठग... इथपर्यंत आलेला आहे. या काळातील आवश्यक वेगाबरोबरच जनतेच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचा आपल्या निवेदनात उल्लेख करत त्यांच्या भावविश्वाच्या जवळ जाणारे निवेदन अधिक जवळचे वाटते.\u003cbr\u003e1923 साली भारतात पहिले रेडिओ प्रसारण झाले आणि 2001 मध्ये खाजगी एफ.एम. स्टेशनची सुरुवात झाली. भारतातीलच नव्हे तर जगातील लहान लहान गावात वेगाने माहिती पोहोचवण्याचे पहिले काम कोणी केले असेल तर ते रेडिओ - आकाशवाणीने... म्हणजेच त्यातून माहिती संकलित करून ती लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या निवेदकाने... आजच्या भाषेत ठग ने. चांगला आवाज आणि भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींना नोकरीची एक संधी म्हणून सुरू झालेल्या या क्षेत्रातील व्यक्ती आता सेलिब्रिटी म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रात वावरतांना दिसत आहेत. हे क्षेत्र आता करिअरची एक संधी म्हणून वेगाने पुढे येत आहे.\u003cbr\u003e‘रेडिओ जॉकी’ या पुस्तकाच्या निमित्ताने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना या क्षेत्राच्या माहिती बरोबरच या क्षेत्रात काम करतांना आवश्यक असणारी अंगभूत कौशल्ये आणि प्रभावी वक्तृत्व शैली, निरीक्षण क्षमता, संवाद कौशल्याबरोबरच व्यासंग, अद्ययावतता, लेखनशैली अशा अनेक बाबींच्या पैलूंविषयीची माहिती, रेडिओ केंद्रातील विविध विभाग, उपकरणे, ध्वनिमुद्रण यासारख्या तांत्रिक बाबीची देखील माहिती मिळते. 21व्या शतकातील या नव्याने प्रस्थापित होत असलेल्या क्षेत्राविषयीची  माहिती जाणून घेणाऱ्यांना हे पुस्तक मोलाची मदत करेल.\u003cbr\u003eमराठी भाषेतील ‘रेडिओ जॉकी’ या विषयावरील पहिलं पुस्तक असलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. योगेश महाले व डॉ. संदीप माळी यांचं या प्रयत्नाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. (डॉ.) विद्या पाटील\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eविभागप्रमुख तथा अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ,\u003cbr\u003eमूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703948079423,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/RadioJoky_SandipMali-1.jpg?v=1775541519"},{"product_id":"sahitya-vichar","title":"साहित्य विचार","description":"\u003cp\u003eसाहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच  पाश्चात्य साहित्यशास्त्राचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. वर्तमान साहित्याशी मेळ घालणारा हा अभ्यासक्रम शिकविणे काळाची गरज आहे. साहित्यकृतीचा आस्वाद घेणारा वाचक व लेखक या सर्वांना प्राचीन साहित्यशास्त्र व पाश्चात्य समीक्षाशास्त्र या दोन्ही अंगांचा अभ्यास असणे आवश्यक आहे.त्यामुळे दर्जेदार कलाकृती घडविणारे साहित्यिक व सहृदयी वाचक निर्माण होतील. हीच या विषयाची फलश्रुती म्हणावी लागेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703988908351,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SahityaVichar_DrPurushottamMahajan-1.jpg?v=1775541852"},{"product_id":"sanvad-kaushalye","title":"संवाद कौशल्ये","description":"\u003cp\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी संवाद आणि भाषिक कौशल्य यांचा सर्वसमावेशक अभ्यास उपलब्ध करून देते. यात संवाद कौशल्याचे तंत्र, संवादकौशल्याची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये यापासून सुरूवात करून सूत्रसंचालन कौशल्य, वक्तृत्त्व कौशल्य, भाषण कौशल्य आणि वादविवाद कौशल्य यांपर्यंत प्रत्येक पैलू सविस्तर समजावून सांगितला आहे. पुस्तकात सूत्रसंचालनाचे तंत्र, वैशिष्ट्ये, पाळावयाची पथ्य, वक्तृत्वपटूचे गुण आणि प्रभावी भाषणासाठी आवश्यक तयारी यावर भर दिला आहे. तसेच, भाषणाचे सादरीकरण, भाषिक उपयोजन, प्रभावी भाषण कसे करावे, वादविवादासाठी विषयाची निवड, प्रत्यक्ष खंडन मंडण, वादविवादाचे परीक्षण आणि स्पर्धेतील सहभाग या सर्व गोष्टींवर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. \u003cbr\u003eप्रा. डॉ. संदीप माळी लिखित हे पुस्तक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातून नव्हे, तर व्यावहारिक जीवनात संवाद साधताना आत्मविश्वास, प्रभावी व्यक्तिमत्व आणि सार्वजनिक बोलण्याची कला विकसित करण्यासही उपयुक्त ठरते. सहज वाचता येणारी भाषा, उदाहरणे आणि सुस्पष्ट स्पष्टीकरणे यामुळे हे पुस्तक अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर डॉ. किशोर एन. सोनवणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eअध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ \u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव \u003cbr\u003eप्रभारी प्राचार्य, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे \u003cbr\u003eदादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703991365951,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SanvadKaushalye_DrSandipMali-1.jpg?v=1775542221"},{"product_id":"spardha-parikshansathi-marathi","title":"स्पर्धा परीक्षांसाठी मराठी","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना उतारा आकलन, भाषांतर, कल्पनाविस्तार, निबंध लेखन, मुलाखत आणि सारांश लेखन यासारख्या विविध घटकांमध्ये गोंधळ होतो. हे पुस्तक त्यासाठीच तयार करण्यात आले आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात प्रत्येक घटक सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज समजेल. उताऱ्यावरील प्रश्न व उत्तरे, भाषांतर आणि उतारा आकलन यासाठी नवीन पद्धती वापरून विद्यार्थ्यांना हे मुद्दे नव्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कल्पनाविस्तार, निबंधलेखन, मुलाखत आणि सारांश लेखन याबाबत सहज, सोपे आणि व्यवस्थित मार्गदर्शन केले आहे, जे विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य, तार्किक विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवायला मदत करेल.\u003cbr\u003eया पुस्तकामुळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू शकतील. विषयाचे सखोल ज्ञान, उदाहरणे, सराव पद्धती आणि लेखन मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास परिणामकारक व आत्मविश्वासपूर्ण बनेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703993233727,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SpardhaParikshansathiMarathi_DrSandipMali-1.jpg?v=1775542527"},{"product_id":"swarshabda-shabdanna-swar-milala-tevha","title":"स्वरशब्द : शब्दांना स्वर मिळाला तेव्हा...","description":"\u003cp\u003eशब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शब्द स्वरांच्या निमित्ताने लेखन मांडणी करणाऱ्या लेखिका डॉ. भारती सोनवणे आणि प्रकाशक श्री. प्रदीप पाटील तसेच भावगीताच्या भावविश्वाचा वाचनातून आनंद घेणाऱ्या वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकानेक शुभेच्छा..!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा.डॉ. म. सु. पगारे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमानवतावादी विचारवंत व साहित्यिक\u003cbr\u003eसंचालक, \u003cbr\u003eभाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र \u003cbr\u003eसंचालक,\u003cbr\u003e विचारधारा प्रशाळा, \u003cbr\u003eवरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख, (मराठी, हिंदी, इंग्रजी) \u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52703995855167,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Swarshabad_DrBharatiSonawane-1.jpg?v=1775542969"},{"product_id":"sanskritik","title":"सांस्कृतिक","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणाला सर्वांगीण, समावेशक व कौशल्याधारित करण्यावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक विकासाला समान महत्त्व दिले गेले आहे. या पुस्तकात महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे स्वरूप, प्रकार व प्रयोजन यांचे सविस्तर विवेचन केले आहे.\u003cbr\u003eपहिल्या प्रकरणात रांगोळी, स्वागतगीत, भित्तिपत्रक, अतिथी परिचय, आभार प्रदर्शन, रचना, वर्तमानपत्र लेखन व वार्षिकांक यांचा परिचय दिला आहे. दुसऱ्या प्रकरणात कविता, संकलन, सांस्कृतिक उपक्रम, रॅली, निबंध व विविध राष्ट्रीय\/सांस्कृतिक दिन यांचे स्वरूप व प्रकार स्पष्ट केले आहेत. तिसऱ्या प्रकरणात सुत्रसंचालन, कथा, वाद्यकला, एकपात्री प्रयोग, अभिनय, फॅशन शो व लोककला यांचे स्वरूप व प्रकार मांडले आहेत. चौथ्या प्रकरणात वादविवाद, कथाकथन, अभिवाचन, सांस्कृतिक स्पर्धा, सजावट व साहित्य संमेलन यांचे स्वरूप व प्रयोजन दिले आहे.\u003cbr\u003eया पुस्तकातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वृद्धी, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, भारतीय परंपरा व विविधतेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मता यांचा विकास साधता येईल. तसेच कला, संस्कृती, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, नाट्य, संगीत व चित्रपट या क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होतील.\u003cbr\u003eसांस्कृतिक उपक्रम हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे प्रभावी साधन ठरतात. हे पुस्तक महाविद्यालयीन विद्याथ, शिक्षक तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704705577279,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sanskritik_DrPankajkumarNannavare_1.jpg?v=1775565551"},{"product_id":"mounacha-uchhar","title":"मौनाचा उच्चार","description":"\u003cp\u003eभोवतालातील आवाजी वास्तवामुळे समकाळाचा स्वर अधिकाधिक क्षीण होत चालला आहे. स्व-आंतरिकतेची लय समजून घेण्यासाठी अवसर मिळणे जगण्याच्या गोंगाटात दुरापास्त होत चालले आहे. त्यातूनच कवितेच्या निर्मितीपुढे, अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण कवितेच्या असण्याचे, तिच्या कवितापणाचे स्व-आंतरिकतेच्या अभिव्यक्तीशी जीवाभावाचे नाते आहे. भौतिकतेच्या रेट्यामुळे हरवत गेलेला जगण्यातील ओलावा, स्नेह आणि सुरक्षित, सोयीच्या कप्पेबंद जगण्याची लागलेली चटक, त्यातून प्रत्ययास येणारे संवेदनाशून्य व विचारनिष्प्रभ असे भोवतालाचे निगरगट्ट विश्व यांमुळे कवितेच्या निर्मितीपर्यंत, तिच्या कवितापणापर्यंत पोहोचावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होतो. समकाळात कवितानिर्मितीपुढे हा पेच उभा ठाकलेला असला तरीही तथाकथित कविता लिहिणे मात्र थांबलेले नाही. परंतु कवयित्री उषा हिंगोणेकर या पेचाविषयी सजग आहेत. म्हणूनच की काय मौनाचा मार्ग त्यांना आपलासा करावासा वाटतो. स्व-आंतरिकतेचा तळ धुंडाळण्यासाठी मौन हा सर्वोत्तम मार्ग आहे, याची त्यांना खात्री पटलेली आहे. समकाळाच्या धबडग्यात स्वत्वपूर्ण स्वर उच्चारण्यासाठी हा मार्ग अनुसरण्याशिवाय पर्याय नाही. काव्यनिर्मितीविषयीचे हे सजग भान या संग्रहातील कवितेला लक्षणीयता बहाल करते. मौनाच्या गाभाऱ्यातून (स्व-आंतरिकतेला साद घालून) कवितेच्या शब्दांना आकार देण्यासाठी हे कविमन अस्वस्थतेच्या गर्तेत स्वतःला झोकून देते. आत्मसन्मान, अस्तित्व यांसाठी कराव्या लागणाऱ्या उठावासाठी सज्ज होत असलेले हे कविमन मनाच्या तळघरातील अंतःस्फोटाचे सामर्थ्य जाणून आहे याचा प्रत्यय या संग्रहातील कवितांतून प्राधान्याने येतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारची भावव्याकुळता वा वैचारिक बुवाबाजी यांचा आसरा न घेता सहजस्वभावी शब्दकळेतून मुक्तछंदाच्या प्रवाहाला आपलेसे करीत जाणारी या संग्रहातील कविता कवितेच्या विचक्षण वाचकाचे लक्ष वेधून घेणारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e - आशुतोष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52716098421055,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MounachaUchhar_UshaShashikantHingonekar199_1.jpg?v=1775830789"},{"product_id":"uttarardha","title":"उत्तरार्ध","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्य तर धोक्यात आले आहेच\u003cbr\u003eसमताही संपवली जातेय\u003cbr\u003eबंधुतेची ऐशी की तैशी करत\u003cbr\u003eन्यायालाही बांधले जातेय\u003cbr\u003eकुणाच्या तरी दावणीला\u003cbr\u003eजगण्याला अर्थ देणारे\u003cbr\u003eसंविधानही खूप अस्वस्थ झालेय\u003cbr\u003eआजकाल या वर्तमानात...\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52716129681727,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Uttarardha_Shashikant_Hingonekar_1.jpg?v=1775832656"},{"product_id":"pratikshecha-shunyakal","title":"प्रतीक्षेचा शून्यकाल","description":"\u003cp\u003eप्रश्नोत्तरांची\u003cbr\u003eजुगलबंदी सुरूय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसगळेच आक्रमक झालेले आहेत\u003cbr\u003eआपापल्या पटलावर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसार्थकी नाही होतंय\u003cbr\u003eही जुगलबंदी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणूनच प्रतीक्षेचा शून्यकाल\u003cbr\u003eपुन्हा सुरू झालाय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया बेदद व्यवस्थेविरुद्ध\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52716186501439,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PratikshechaShunyakal_ShashikantHingonekar_1.jpg?v=1775832159"},{"product_id":"khandesh-kathaprabodha-sahitya-v-samiksha","title":"खान्देश कथाप्रबोध : साहित्य व समीक्षा","description":"\u003cp\u003e‘कथा’ हा साहित्यप्रकार अत्यंत महत्वाचा आणि मानवाच्या मुलप्रवृत्तीशी निगडीत असलेला साहित्यप्रकार आहे. कथा सांगणे आणि ऐकणे याची आवड मानवी स्वभावातच दडलेली आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात खान्देशातील साहित्यिकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. कथा साहित्यात खान्देशी कथाकारांनी मोलाची भर घातलेली असून बोलीभाषा, आशयसौंदर्य, आविष्कार आणि निवेदन पद्धती या घटकांच्या पारंपारिक ढाच्याची मोडतोड खान्देशी कथेत दिसून येते. मराठी साहित्यात खान्देशी कथा ही वेगळी आणि महत्वाची म्हणूनच ठरलेली आहे. खानदेश कथाप्रबोध : साहित्य व समीक्षा ग्रंथात खान्देशातल्या निवडक कथाकारांच्या कथांची विलक्षण समीक्षा असून कथेच्या संदर्भातील तांत्रिक घटक आणि एकूणच कथा या साहित्यप्रकाराविषयी मुलभूत आणि नेमकी मांडणी केलेली आहे. विविध कथांच्या संदर्भात खानदेशातील विविध समीक्षकांनी सूक्ष्मपणे केलेली ही समीक्षा कथेचे स्थूल आकलन आणि कथेच्या स्वरूपाचा बोध होण्यास उपकारक ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रोफेसर डॉ. वासुदेव सोमाजी वले\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसदस्य, मराठी अभ्यासमंडळ,\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52773041668415,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KhandeshKathaprabodha_SwapnilBhosale_1.jpg?v=1776177573"},{"product_id":"nibandhpakali","title":"निबंधपाकळी","description":"\u003cp\u003eनिबंध लेखन ही एक सहज पण प्रभावी कला आहे. गप्पांमधून आपण जे विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो, तेच विचार कागदावर उतरवले की निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—विचारांना शब्दांच्या धाग्यात बांधणे. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हेच निबंधाचे सार आहे. ही कला सरावाने आणि वाचनाने अधिक परिपक्व होते.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधलेखनासाठी सतत वाचन, चिंतन आणि मनन आवश्यक आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे अभ्यासपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. त्यातून मिळालेली सुभाषिते, कवितेच्या ओळी, अनुभव टिपण वहीत नोंदवल्यास निबंधाला समृद्धी मिळते. आकर्षक सुरुवात, वैचारिक मुद्द्यांची मांडणी, रचना, भाषा शैली आणि परिणामकारक शेवट हे निबंधाचे महत्त्वाचे घटक आहेत.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधलेखन ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर विचारांना कलात्मक रूप देण्याची कला आहे. योग्य शब्दांची निवड, सुसंगत रचना आणि प्रभावी शेवट यामुळे निबंध वाचकाच्या मनावर ठसा उमटवतो. म्हणूनच निबंध लिहिणे अवघड नसून, तो आपल्या विचारांना सुंदर शब्दरूप देण्याचा एक प्रयत्न आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ माझा भारत देश, स्वच्छता, किंवा मूल्यशिक्षण आणि मी यावर.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785963532607,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhpakali_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776235784"},{"product_id":"nibandhparna","title":"निबंधपर्ण","description":"\u003cp\u003eनिबंध लेखनाविषयी दोन शब्द सांगताना मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो. उत्कृष्ट विचारमंथनातून स्फुरलेले निबंध विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करताना लेखकाला समाधान मिळते. हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षार्थी तसेच शिक्षक यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. कोणतेही लेखन करताना सर्वप्रथम विचारांची साठवण आवश्यक असते. विचारांना योग्य शब्दरूप देण्याची क्षमता ही लेखनकलेची खरी ताकद आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्याप्रमाणे मण्यांची माळ तयार करण्यासाठी विविध मणी सुंदरपणे गुंफले जातात, त्याचप्रमाणे निबंधात समर्पक शब्दरचना, योग्य दाखले, उदाहरणे, सुभाषिते आणि कवितेच्या ओळी गुंफल्या की निबंधाची माळ तयार होते. विद्यार्थ्यांनी वाचलेले किंवा ऐकलेले विचार सहज, सोप्या भाषेत मांडता आले पाहिजेत. निबंध म्हणजे विचारांची बांधणी—मुद्देसूद मांडणी, योग्य भाषाशैली आणि सुसंगतपणा हे उत्कृष्ट निबंधाचे टप्पे आहेत. सतत वाचन केल्याने शब्दसंग्रह वाढतो आणि लेखन अधिक प्रभावी होते.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की निबंध कितीही व्यवस्थित लिहिला असला तरी शुद्धलेखनाच्या चुका असल्यास गुण कमी होऊ शकतात. म्हणूनच लेखन शुद्ध असणे अत्यावश्यक आहे. निबंधलेखनाची तयारी वाचनाच्या सवयीपासून सुरू होते. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे अभ्यासपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. निरंतर वाचन, चिंतन आणि मनन यातून सुयोग्य विचार शब्दबद्ध होतात. त्यासाठी एक टिपण वही तयार करून त्यात सुभाषिते, कवितेच्या ओळी आणि अनुभव नोंदवावेत.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधाची आकर्षक सुरुवात, वैचारिक मुद्द्यांची मांडणी, भाषाशैली आणि परिणामकारक शेवट हे घटक निबंधाला पूर्णत्व देतात. थोडक्यात सांगायचे तर आशय, मनन, चिंतन आणि जागर यांतून निबंध साकार होतो.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ स्वच्छता अभियानात माझी भूमिका, वृक्षसंवर्धन, रक्तदान, किंवा वाचन-एक संस्कार यावर.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785965859135,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhparna_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776236167"},{"product_id":"nibandhsari","title":"निबंधसरी","description":"\u003cp\u003eनिबंध लेखनाविषयी थोडेसे सांगताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध म्हणजे विचारांची बांधणी. नि+बंध म्हणजे बांधणे, शब्द गुंफणे. आपल्या मनातील विचार जेव्हा योग्य रचनेत, सुसंगतपणे आणि शैलीदारपणे मांडले जातात तेव्हा तो निबंध होतो. मनात अनेक विचार असतात, पण ते विस्कळीत असतात. त्यांची निवड करून विषयाशी सुसंगत अशी रचना करणे हीच खरी निबंधकला आहे.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंध लिहिणे अवघड नाही, मात्र त्यासाठी भरपूर वाचन, चिंतन आणि सराव आवश्यक आहे. सोप्या व ओघवत्या भाषेत विचार प्रकट करणे म्हणजे निबंधलेखन. ही कला इतर कलांप्रमाणेच प्रयत्नाने साध्य होते. निबंधलेखनासाठी भाषा विषयाबद्दल आस्था असावी, वाचनाची सवय जोपासावी. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे परिपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. वाचन सहेतुक असावे, कारण निरंतर वाचन, चिंतन आणि मननातूनच सुयोग्य विचार शब्दबद्ध होतात.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधलेखनासाठी टिपण वही तयार करणे उपयुक्त ठरते. त्यात अनुभव, सुभाषिते, कवितेच्या ओळी, म्हणी, सुवचने, कात्रणे यांचा संग्रह असावा. उत्तम वक्त्यांची भाषणे ऐकणे, शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, चरित्रे व आत्मचरित्रांचे वाचन करणे यामुळे विचारसंपत्ती वाढते. शब्दांत वेचकपणा आणण्यासाठी शब्दसंपत्ती वाढवावी.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधाचे चार टप्पे लक्षात ठेवावेत—प्रारंभ, मध्य, अंत्य आणि निष्कर्ष. सुरुवात आकर्षक असावी, विषयाशी संबंधित सुविचार किंवा कवितेच्या ओळीने निबंधाची सुरूवात करावी. प्रत्येक परिच्छेदात एकच विचार मांडावा आणि पुढील परिच्छेदाशी त्याची सांगड घालावी. विचारांची पुनरावृत्ती टाळावी. भाषाशैली सरळ, साधी पण परिणामकारक असावी. शुद्धलेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर, सुवाच्च हस्ताक्षर हे निबंधाला अधिक प्रभावी बनवतात.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिबंधाचे प्रकारही विविध असतात—वर्णनात्मक, कल्पनात्मक, आत्मवृत्तपर, ललित, चर्चात्मक, वैचारिक, कथनात्मक. वाचन, मनन आणि लेखनाने उत्तम निबंध लिहिता येतो.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“आचार, विचार, संस्कार  \u003cbr\u003eत्यातून होईल निबंध साकार”  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ मुलांच्या सर्वांगीण विकासात मातृभाषेची भूमिका, संवर्धन पर्यावरणाचे, किंवा स्वामी विवेकानंद यावर.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785969234239,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhsari_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776236467"},{"product_id":"nibandhveli","title":"निबंधवेली","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंध लेखनाविषयी काही विचार मांडताना सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे लागते की निबंध लिहिणे मुळीच अवघड नाही. आपण जे अनुभवले आहे, पाहिले आहे किंवा कुणाकडून ऐकले आहे, तेच विचार जेव्हा आपण सहजपणे कागदावर उतरवतो तेव्हा निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—शब्दांची बांधणी, विचारांची गुंफण. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हीच खरी निबंधकला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंधलेखन ही एक कला आहे आणि इतर कलांप्रमाणेच ती प्रयत्नाने साध्य होते. लहानपणापासूनच जर निबंधलेखनाचा सराव केला तर ही कला आत्मसात करता येते. निबंधलेखनासाठी वाचनाची सवय अत्यंत महत्त्वाची आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिके, साप्ताहिके यांचे अभ्यासपूर्ण वाचन केल्याने विचारांना प्रगल्भता येते. मात्र वाचन सहेतुक असावे. निरंतर वाचन, चिंतन आणि मननातून सुयोग्य विचार शब्दबद्ध होतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंधलेखनासाठी टिपण वही तयार करणे उपयुक्त ठरते. त्यात अनुभव, सुभाषिते, कवितेच्या ओळी, म्हणी, सुवचने यांचा संग्रह असावा. अशा साठ्यामुळे निबंध लिहिताना वाक्यरचना सहज सुचते. आकर्षक सुरुवात, वैचारिक मुद्द्यांची मांडणी, रचना, भाषाशैली आणि परिणामकारक शेवट हे निबंधाचे महत्त्वाचे घटक आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनिबंधलेखनाची खरी ताकद म्हणजे विचारांची मुद्देसूद मांडणी. प्रत्येक परिच्छेदात एकच विचार मांडावा आणि पुढील परिच्छेदाशी त्याची सांगड घालावी. भाषाशैली सरळ, साधी पण परिणामकारक असावी. शुद्धलेखन, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि सुवाच्च हस्ताक्षर हे निबंधाला अधिक प्रभावी बनवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअशा प्रकारे वाचन, मनन आणि लेखनाच्या सरावातून उत्तम निबंध लिहिता येतो. निबंधाचे विविध प्रकार असतात—वर्णनात्मक, कल्पनात्मक, आत्मवृत्तपर, ललित, चर्चात्मक, वैचारिक, कथनात्मक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या यादीतील एखाद्या विषयावर संपूर्ण निबंध तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ माझा मोठं होण्याचा प्रवास, पर्यावरण संरक्षणात माझे योगदान, किंवा सोशल मिडीया : शाप की वरदान.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52785973592383,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Nibandhveli_SmtVarshaAhirrao_1.jpg?v=1776236948"},{"product_id":"ekavisavya-shatkatil-marathi-kadambarine","title":"एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीने सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पातळीवर नवे क्षितिज गाठले आहे. ग्रामीण-शहरी वास्तव, जात-लिंग-श्रम यांचे भेद, जागतिकीकरणाचे परिणाम, अस्तित्वाचा संघर्ष आणि आत्मशोधाच्या वाटा यांचे विविधांगी चित्रण या काळातील मराठी कादंबऱ्यांमधून समर्थपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या संपादनाखाली साकारलेला ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह’ हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समग्र समीक्षणाचा आदर्श नमुना ठरतो. डॉ. पाटील यांची सर्वसमावेशक दृष्टी, काटेकोर व साक्षेपी निवड आणि विषयाशी सुसंगत अभ्यासकांचा सहभाग या ग्रंथाला संशोधनपर आणि संदर्भात्मक मूल्य बहाल करतो. या कादंबऱ्यांचे विश्लेषण करणारे लेखकही महाराष्ट्र व गोव्यातील विविध विद्यापीठांतील, विविध पिढ्यांचे, भिन्न साहित्यदृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी लेखकमंडळी आहेत. त्यांनी त्यांच्या सामाजिक-राजकीय जाणिवा आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून या कादंबऱ्यांचे सखोल वाचन करून अतिशय अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.  \u003cbr\u003eविविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि लिंगविवेकाशी निगडित 24 महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण या ग्रंथात आहे. हा ग्रंथ एकविसाव्या शतकातील कादंबऱ्यांची केवळ समीक्षा नसून समकालीन सामाजिक बदलांचा दस्तऐवज आहे. या सर्व कादंबऱ्यांची निवड आणि विविध समीक्षा दृष्टिकोनांतून साकारलेली त्यावरील चिकित्सक चर्चा एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीचा आशयसंपन्न प्रवास तसेच आशय, स्वरूप व प्रवाह समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003eसाहित्य, भाषा व समाजजीवनाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींसाठी हा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भ ठरेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788175307071,"sku":null,"price":356.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/21vyaShatkatilMarathiKadambariSamiksha_RahulPatil_1.jpg?v=1776246367"},{"product_id":"aarogya-sanjivani","title":"आरोग्य संजीवनी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘आरोग्य मंत्र’ या पुस्तकाचा सारांश सांगताना असे लक्षात येते की लेखकांनी दैनंदिन जीवनातील सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी घटकांचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ३६ लेखांच्या माध्यमातून मानसशास्त्रीय दृष्टिकोन, घरगुती सिद्धांत, शास्त्रोक्त माहिती आणि अनुभव यांच्या आधारे आरोग्यविषयक मार्गदर्शन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात निसर्गातील रस, सुक्या खोबऱ्याचे फायदे, कारल्याचे महत्त्व, नारळ पाणी, दहीभात, जांभूळ, तीळ, हिंग, सुंठ, हिरवे मूग, नाशपती यांसारख्या पदार्थांचे फायदे सांगितले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयाशिवाय कोलेस्ट्रॉल व बीपी, पचनशक्ती, तोंडाचे विकार, मधुमेह, दमा, त्वचेची काळजी, महिलांच्या समस्या, इंडोमेट्रियोसीस, मानसिक ताण, आत्मविश्वास वाढवणे, ध्यान साधना यांसारख्या विषयांवरही मार्गदर्शन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखकांनी घरगुती उपाय, पारंपरिक पद्धती, संस्कृतीतील आरोग्यदायी सवयी आणि आधुनिक जीवनशैलीतील त्रुटी यांचा तुलनात्मक अभ्यास करून वाचकांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आरोग्य संजीवनी’ या पुस्तकातून वाचकांना दैनंदिन विकारांवर मात करण्यासाठी सोपे उपाय, आत्मविश्वास वाढवण्यासाठी टिप्स आणि मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा यांचे महत्त्व पटवून दिले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्हाला हवे असल्यास मी या अनुक्रमणिकेतील एखाद्या लेखाचा \u003cstrong\u003eसविस्तर सारांश\u003c\/strong\u003e तयार करून देऊ शकतो. उदाहरणार्थ कारले कडू पण आरोग्यासाठी गोड, जांभूळ एक अमृत, किंवा ध्यान साधना का करावी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788237271359,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AarogyaSanjivani_NitinMali_1.jpg?v=1776247243"},{"product_id":"bahinabainche-kavya-eka-chintan","title":"बहिणाईंची गाणी आणि जीवनदर्शन","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही त्यांच्या जगण्याची लय, ताल, नाद, स्वर मुखर करणारी आहे. शंभर वर्षांपूवच्या कृषिजनसंस्कृतीशी समरस झालेल्या एका शेतकरी स्त्रीजीवनाचे हे ह्रदगत आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनधर्माचे मर्म काव्यात्मतेने व्यक्त करणारी ही रचना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सहजपणे ओळख करून देणारी आहे. डॉ. उज्वला पंकज नन्नवरे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे आकलन करून घेताना एक स्त्री म्हणून स्वतःच्या जगण्याचाच एकप्रकारे शोध घेतला आहे. निसर्ग, अध्यात्म, जीवनविषयक तत्त्वज्ञान या सूत्रांच्या अनुरोधाने या कवयित्रीच्या कवितेचे अनोखेपण धुंडाळण्यासाठी अभ्यासकाने हा खटाटोप केला आहे. बहिणाईंची कविता ही किती अर्थ आवाहक आणि अर्थ प्रसरणशील आहे याचा प्रत्यय या मांडणीतून येतो. त्याबद्दल डॉ. उज्वला पंकज नन्नवरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुस्तकाचे मनःपूर्वक स्वागत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. आशुतोष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788241531199,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BahinainchiGaniAaniJivandarshan_DrUjwalaPNannavare_1.jpg?v=1776247892"},{"product_id":"गाणे-जनमाणसाचे-काव्यसंग्रह","title":"गाणे जनमाणसाचे (काव्यसंग्रह)","description":"\u003cp\u003eस्वत: शेतकरी असल्याने हयातभर माणूसकीचे गाणे गाणारे शाहिर, कवी नानाभाऊ पाटील कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावखेड्याच्या एक-एका चौकाला पायदळी तुडवत सामाजिक आरसा उभा करण्याचे कार्य साहित्य सेवेतून निष्ठेने करत आलेले आहेत. जीवनोत्सुक कवीमन आणि व्यवस्थानिर्मित अवस्था नानाभाऊ विवेकी भावनेतून पाहतात व काव्यप्रतिभेतून समाजाभिमुख विषयांची गुंफन आपल्या गाणे जनमाणसाचे यातून मांडतात. नानाभाऊंच्या काव्य भावसृष्टीत आत्मानुभूतीचे व संवेदनशील मनाच्या कंगोऱ्याला स्पर्श करणाऱ्या वास्तवलक्ष्यी भूमिकेचे नानाविध पैलू अंतर्बाह्य चिंतन करायला लावणारे आहेत. \u003cbr\u003eशाहिर नानाभाऊ पाटील यांच्या कवितेतील अध्यात्म, समाजिक प्रश्न, कृषक जीवनातील रहस्य, व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, ग्रामीण संस्कृती व लोकसंस्कृतीच्या परिपेक्षातून मानवतावादी प्रवास करणारी प्रबोधनात्मक शब्दलेखनीची धार वाचकांना जवळची वाटते. अहिरानी व मराठीतून काव्यगीतांची वाड.मयीन समृध्दता कुशलतेने भाषिक टिळा लावणारी आहे. भाषिक तंत्र व व्याकरणाच्या कोसोदूर असलेली ग्रामीण वसा जोपासणारी खान्देशी बाज असलेली कविता सेंद्रियतेची आदर्शवादी भूमिका अंतकरणाची भाषा बोलते. शाहिर नानाभाऊ पाटील यांच्या कष्टाची भावना, काव्यगीताच्या अवकाशाला प्रामाणिकतेची गवसणी घालते. मानवतावादी प्रबोधनाची धारणा नानांच्या सात्विक व संवेदनशील भावविश्वाची अनुभूती वाचकाला देत असते, हे भावविश्व गाणे जनमाणसाचे या साहित्यकृतीतून नवी क्षितिजे उजळेल अशा शुभेच्छा..\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eकेंद्रिय अध्यक्ष-खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धु्ळे\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788665319743,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/GaneJanmansanche_ShahirNanabhauPatil-DrSadashivSuryawanshi_1.jpg?v=1776252976"},{"product_id":"gupta-bhasha-aani-gupta-lipi-vishwa","title":"गुप्त भाषा आणि गुप्त लिपी विश्व","description":"\u003cp\u003e“गुप्त भाषा आणि गुप्त लिपी विश्व” हे पुस्तक प्राचीन भारतातील गूढ, दुर्लक्षित आणि अद्यापही न उलगडलेल्या भाषांचा व लिपींचा सखोल अभ्यास सादर करते. सम्राट, राजघराणी, व्यापारी आणि योद्ध्यांनी आपल्या खजिन्याचे, आदेशांचे आणि गोपनीय दस्तऐवजांचे संरक्षण करण्यासाठी गुप्तभाषा आणि लिपींचा वापर केला. ब्राह्मी, खरोष्ठी, ग्रीक लिपींपासून ते शिलालेख, ताम्रपट, सिक्के आणि मुद्रांपर्यंत या लिपींचा ऐतिहासिक प्रवास या ग्रंथात तपशीलवार मांडला आहे.\u003cbr\u003eआजच्या डिजिटल युगातही हजारो गुप्तभाषा आणि लिपी संशोधन संस्थांकडे उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे डिकोडिंग अद्याप अपूर्ण आहे. या लिपींचा अभ्यास केल्यास भारतीय इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेवरील अनेक रहस्यांचा पडदा दूर होऊ शकतो. लोथल, सिंधू संस्कृती, सम्राट हर्षवर्धन आणि मध्य आशियातील संदर्भांमधून या लिपींचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले गेले आहे.\u003cbr\u003eगुप्तभाषा-लिपी केवळ सांस्कृतिक वारसा नाही, तर सुरक्षा, संरक्षण, व्यापार, भूगोल आणि ब्रह्मांडशास्त्राशीही निगडीत आहे. त्यामुळे या विषयाचे संशोधन नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, त्यांना प्रेरणा देणे आणि शैक्षणिक संस्था, संशोधक व शासन यांना एकत्र करून या अमूल्य ठेव्याचे जतन-संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक वाचकांना गुप्तभाषा-लिपींच्या अद्भुत विश्वात प्रवेश करून भारताच्या गूढ परंपरेचा उज्वल वारसा समजून घेण्याची संधी देते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788859371839,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/GuptaBhashaAaniGuptaLipiVishwa_AjijRashidTadvi_1.jpg?v=1776254769"},{"product_id":"gurjar-sahitya-bolibhasha-v-gani_dr-jasavant-anjane","title":"गुर्जर बोली : साहित्य आणि लोकगाणी","description":"\u003cp\u003e    आजने पिढीनं गुर्जर बोलीभाषानु महत्त्व पटासाठी अन् गुर्जर बोलीभाषानो होणारो ऱ्हास टाळासाठी हे प्रयत्न सं. अनेक साहित्यिकोयनू निरनिराळे प्रकारनु साहित्य एकत्र करीसन ते प्रकाशित करानो हे प्रयत्न सं. गुर्जर बोलीभाषा मधले म्हणो, कविता, लेख, उखाणा, नाट्यछटा, गवळण हे प्रकारने साहित्यनो पुस्तकमं समावेश करेल सं. गुर्जर बोलीभाषाने संवर्धनसाठी पुस्तकने स्वरूपमं साहित्यिकोयना विचार सर्वे लोकायलोक पोहचवानो हे सर्वोत्तम मार्ग सं. आपले भावी पिढीसाठी गुर्जर भाषानू अस्तित्व टिकीरव्हासाठी हे सर्वा प्रयत्न करेल सं.\u003cbr\u003e    गुजर भाषिक अल्पसंख्यांक संस्था चालक संघटना जळगाव अन् सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयमं स्थापन करेल गुर्जर बोलीभाषा संवर्धन केन्द्र ऐनपूर हे दोन्ही संस्था गुर्जर बोलीभाषा संवर्धन कराकरता प्रयत्नशील सं. तेन्ने प्रयत्ननं वाचक म्हनीसन आपू भरभरिसन प्रतिसाद देवो व  तेन्ने प्रयत्ननं प्रोत्साहन देवो एवढीच माफक अपेक्षा ठेऊस.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788871102783,"sku":null,"price":356.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/GurjarSahitya-BolibhashaVGani_DrJasavantAnjane_1.jpg?v=1776255291"},{"product_id":"tao-eka-jeevanshaili-jagave-kase","title":"ताओ एक जीवनशैली जगावे कसे?","description":"\u003cp\u003eTowards tranquility Harmony \u0026amp; Banance\u003cbr\u003e\"We believe in the harmless and eternal Tao and we recognize all personified deities as being mere human constructs. We reject hatred, personified deities and unnecessary violence and embraces harmony love and learning as we are taught by Nature. We place over trust and our lives in the Tao, that we may live in peace \u0026amp; balance with the universe, both in this mortal life \u0026amp; beyond.\"\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- LAOTSE\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e604-531 BC\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788919861567,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/JagavanKasan_BGWagh_Cover_1.jpg?v=1776257883"},{"product_id":"kalakar","title":"कलाकार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“कलाकार” हे पुस्तक म्हणजे एका चाहत्याच्या मनात उमटलेलं सुबोध भावे यांचं प्रतिबिंब आहे. सिनेमा संपतो, पडदा पडतो, पण काही चेहरे, काही आवाज, काही भाव कायम मनात घर करून राहतात. सुबोध भावे हे असेच एक कलाकार आहेत—जे अभिनय करत नाहीत, तर भूमिकेत जगतात. बाळगंधर्व, लोकमान्य टिळक, एक सर्वसामान्य पती किंवा असामान्य नेता—प्रत्येक रूपात त्यांनी मनाला भिडणारं वास्तव साकारलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात लेखकाने अनुभवलेलं, जाणवलेलं आणि शब्दांत जपलेलं सुबोध भावे यांचं अस्तित्व आहे. समीक्षक नसूनही भावलेलं व्यक्त करण्याचा, लेखक नसूनही अनुभवलेलं सांगण्याचा हा एक सच्चा प्रयत्न आहे. प्रत्येक लेखातून झिरपणारा एकच रंग—“सुबोधरंग”—वाचकांच्या हृदयाला स्पर्श करेल, अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजे एका कलाकाराने दिलेल्या प्रेरणेमुळे जन्मलेलं लेखन, आणि एका चाहत्याच्या मनातील कृतज्ञतेचं साक्षीदार.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788943290687,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Kalakar_SarangPawar_1.jpg?v=1776258839"},{"product_id":"mazi-aai","title":"माझी आई","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“आई” हा शब्द जसा छोटा, तसा त्यामध्ये सामावलेलं विश्व अनंत आहे. हे पुस्तक म्हणजे एका मुलाने आपल्या आईच्या आयुष्याचं प्रतिबिंब शब्दांत जपलेलं आहे. रोहिणी हिरालाल वाघ ते रोहिणी ज्ञानेश्वर पवार—हा प्रवास फक्त नात्यांचा नाही, तर जिद्दीचा, प्रेमाचा आणि श्रद्धेचा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखकाने या पुस्तकात 15 लेख, 20 कविता आणि आठवणींची डायरी लिहून आईच्या आयुष्याचं एक जिवंत चित्र उभं केलं आहे. आईचं मूक प्रेम, तिच्या अदृश्य लढाया, तिचं घरासाठी झिजणं, आणि तिच्या ओठांवर कायमचं असणारं हसू—हे सगळं या पानांमध्ये जपलेलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक समीक्षण नाही, साहित्यिक प्रयोग नाही—हे एका मुलाचं आपल्या आईसाठीचं अर्पण आहे. आईने दिलेल्या आयुष्याचं ऋण शब्दांनी फेडण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक लेख, प्रत्येक कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करेल आणि आईच्या प्रेमाचा सुगंध त्यांच्या हृदयात दरवळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788961214783,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MaziAai_SanrangPawar_1.jpg?v=1776259172"},{"product_id":"samrpan-charoli-sangrah","title":"समर्पण (चारोळी - संग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“समर्पण (चारोळी – संग्रह)” हा एक साधा चाहत्याचा, पण मनापासून केलेला प्रयत्न आहे. सुबोध भावे यांच्या अभिनयातून झिरपणाऱ्या भावना, त्यांच्या भूमिकांमधील सच्चेपणा, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून उमटणारा प्रकाश या चारोळ्यांमध्ये जपला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक चित्रपटावर आधारित चारोळ्या—‘कट्यार काळजात घुसली’ मधील सदाशिवचा संयम, ‘बालगंधर्व’ मधील सुरांचा भक्त, ‘लोकमान्य’ मधील विचारांचा ज्वालाग्राही दीप, ‘विजेता’ मधला उमलणारा विश्वास—या सगळ्या छटा या संग्रहात शब्दरूपाने साकारल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयाशिवाय रंगभूमीवरील अभिनय, व्यक्तिमत्त्व म्हणून सुबोध भावे, आणि एका चाहत्याचं अंतरंग—या तिन्ही अंगांनी हा संग्रह समृद्ध आहे. प्रत्येक पानातून झिरपणारा एकच रंग आहे—“सुबोधरंग”—जो वाचकांच्या मनातही घर करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक समीक्षण नाही, साहित्यिक प्रयोग नाही—हे एका चाहत्याचं आपल्या कलाकारासाठीचं अर्पण आहे. प्रेम, प्रेरणा आणि अभिमान यांचं हे शब्दरूप समर्पण वाचकांच्या हृदयाला स्पर्श करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788963148095,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Samarpan_Charoli_SanrangPawar_1.jpg?v=1776259717"},{"product_id":"man-maze-kavitasangrah","title":"मन माझे (कवितासंग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“मन माझे” हा कवितासंग्रह म्हणजे एका संवेदनशील मनाचा प्रवास आहे. आयुष्य, निसर्ग, बालपण, विचार, शांतता, स्वप्नं आणि भावविश्व या सगळ्या छटा या कवितांमध्ये जपल्या आहेत. प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती मनाच्या गाभ्यातून उमटलेली अनुभूती आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया संग्रहात एव्हरेस्टसारखी उंची, चक्रीवादळासारखी अस्थिरता, ब्रह्मांडासारखं विशालत्व, पावसाचा स्पर्श, नक्षत्रांची चमक, आणि क्षितिजाच्या पलीकडचं स्वप्न आहे. चारोळ्यांमध्ये हास्य, काळ, क्षण, एकांत आणि मनाच्या लहरी जपल्या आहेत. विचारांमध्ये गुलाबाचं सौंदर्य, थंडीची जाणीव, आई-वडिलांचं ऋण, आणि शांततेचं मौन शब्दांत उतरलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e“मन माझे” हा संग्रह समीक्षण नाही, प्रयोग नाही—तो एका मनाचा स्वतःशी केलेला संवाद आहे. प्रत्येक पानातून झिरपणारी भावना वाचकांच्या हृदयाला स्पर्श करेल आणि त्यांना स्वतःच्या मनाशी जोडून ठेवेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788979138879,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ManMaze_SarangPawar1_1.jpg?v=1776260414"},{"product_id":"कथा-जनाच्या-व्यथा-मनाच्या","title":"कथा जनाच्या व्यथा मनाच्या","description":"\u003cp\u003eशिक्षकाची भूमिका ही समाजनिरीक्षकाची असते. समोर असणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्याथ वर्गापुरती ही भूमिका मर्यादित राहू शकत नाही तर आपल्या भोवतालातील बरे-वाईट, आंतरिक पातळीवर अस्वस्थ निर्माण करणारे घटनाप्रसंग, व्यक्ती यांच्याकडेही एक संवेदनशील आणि विचारी समाजघटक म्हणून शिक्षक पाहत असतो. याची प्रचीती सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी साळुंके यांच्या सदर कथासंग्रहातून प्रभावीपणे येते. हा शिक्षक-लेखक कधी व्यक्तीच्या जीवनकहाणीपासून कथेला सुरुवात करतो, कधी हुंडाबळी, बलात्कार अशा तात्कालिक घटनांमधून कथानकाला चालना मिळते, कधी गावखेड्यातील उलथापालथी प्रसंगचित्रण व वातावरणनिर्मिती यांना आपसूक वाट मोकळी करून देतात, कधी जातपात, आंतरजातीय विवाह यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणून सामाजिक वास्तवाच्या भयावह रूपाचे दर्शन घडवले जाते तर कधी मुक्त चिंतनाव्दारा ललित गद्याचा भावप्रत्यय देतात. वर्गातील शिक्षकाकडून समाजशिक्षकाच्या व्यापक भूमिकेकडे झुकणारा या कथालेखकाचा पिंड आपले लक्ष वेधून घेणारा आहे. म्हणून तर सदर पुस्तकाचे शीर्षक ‘कथा जनाच्या व्यथा मनाच्या’ हे आहे. आपला जीवनानुभव त्याच्या अस्सल प्रत्ययासह आणि आंतरिक आचेसह अभिव्यक्त करणाऱ्या या लेखकाच्या सदर पुस्तकाचे हार्दिक स्वागत आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- आशुतोष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788992213311,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KathaJanachyaVyathaManachya_ShivajiSalunke_1.jpg?v=1776260901"},{"product_id":"kavivarya-bhau-panchbhai","title":"कविवर्य भाऊ पंचभाई","description":"\u003cp\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.\u003cbr\u003eभाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही या पुस्तकात आहेत.\u003cbr\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊंचे जीवन आणि भाऊंचे काव्य यांच्यातील आंतरसंबंध उलगडून दाखविले आहेत. वाचकांना या पुस्तकात भाऊ पंचभाई नावाच्या आकांताची उत्कट गोष्ट ऐकायला येईल...\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789000208703,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavivaryaBhauPanchbhai_YashwantManohar_1.jpg?v=1776261560"},{"product_id":"krantdarshi-dr-m-n-wankhade-janmshatabdi-kritdnyatagranth","title":"क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ","description":"\u003cp\u003eडॉ. म. ना. वानखडे यांनी जीवनाच्या आणि साहित्याच्या चर्चाविश्वात एका प्रगमनशील सौंदर्याचं नवं युग निर्माण केलं. त्यात रॅशनल नीतीचं वैश्विक सौंदर्य आहे आणि साहित्याच्या सौंदर्याची पुनर्रचनाशील नीती आहे. एवढंच नाही तर त्यांनी उभारलेल्या पायाभूत ज्ञानव्यवहारात या दोन्हींची अविभाज्यताच आपल्या प्रत्ययाला येते.\u003cbr\u003e     या क्रांतदर्शी ज्ञानमंथनातून म.ना. वानखडे नावाचा एक अस्सल तत्त्ववेत्ता आपल्याला दिसतो. सर्वसमावेशकता आणि सर्वांचे समान हितसंबंध या पायावर त्यांची सौंदर्यसंकल्पना अधिष्ठित आहे. या बंडखोर प्रज्ञावंतानं जीवन आणि साहित्य या दोन्हींसाठी अनिवार्य तत्त्वज्ञान मांडलं आहे.\u003cbr\u003e     या अस्सल प्रज्ञावंताच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा कृतज्ञताग्रंथ निर्माण झाला आहे. या ग्रंथातील प्रत्येकच शब्दावर म.ना. वानखडे हे विशेषनाम कोरलेलं आहे आणि या ग्रंथातील सर्वच शब्दांच्या बेरजेचं नावही कृतज्ञता हेच आहे. हे एका खन्ऱ्याच क्रांतदर्शित्वाला केलेले विनम्र अभिवादन आहे.\u003cbr\u003e     'क्रांतदर्शी डॉ.म.ना. वानखडे' हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अनेक चाहत्यांनी निर्माण केलेला कृतज्ञतेचा दीपस्तंभ आहे. या ग्रंथातून पुढल्या पिढ्यांना म.ना. वानखडे नावाचा गगनभेदी दीपस्तंभ वाचताही येईल, बघताही येईल आणि विश्वासू मार्गदर्शक म्हणून सोबतही घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789007548735,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KrantdarshiDrMNWankhade_YashwantManohar_1.jpg?v=1776261961"},{"product_id":"khandemalani-kathasangrah","title":"खांदेमळणी (कथासंग्रह)","description":"\u003cp\u003eजागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती ग्रामीण संस्कृती वेगवेगळ्या अंगाने प्रभावित झाली आहे.हा झालेला बदल कलेतून आणि साहित्यातून मांडण्याचा प्रभावी प्रयत्न दोन दशकांपासून सुरू झालेला आपणास दिसतो.\u003cbr\u003e‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. ग्रामीण जीवनात झालेल्या सामाजिक, राजकीय, सांकृतिक किंवा भाषिक बदलाची सूक्ष्म दखल हा कथासंग्रह घेताना आपणास दिसतो. ‘खांदेमळणी’ या कथासंग्रहात लेखक कोणतेही भडक भाष्य किंवा विधान करीत नाही किंवा ग्रामजीवनाचे फार तपशील मांडत नाही तर ग्रामीण जीवनातील सर्व पातळ्यांवरील सूक्ष्म वस्तुनिष्ठता टिपते. व्यक्तिरेखेतील विविधता, नात्यातील ताणतणाव, सामाजिक-राजकीय जीवनातील पेच, त्यातील अंतर्गत संघर्ष, जीवनाचे विविधांगी बदलते स्वरूप अस्सल भाषेतून मांडणे हे अनंता सूर यांना लिलया जमले आहे. ग्रामीण कथेचा जो एकूणच परीघ आहे तो या कथासंग्रहामुळे नक्कीच विस्तारल्या जाणार आहे. अनंता सूर यांच्या भविष्यातील कथा अधिक प्रगल्भ आणि परिणत होऊन येईल याची आश्वासक खात्री ‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह आजच आपणास देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रमोदकुमार अणेराव\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789060043071,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Khandemalani_AnantaSur_1.jpg?v=1776263258"},{"product_id":"khandeshatil-varkari-sampraday","title":"खान्देशातील वारकरी संप्रदाय","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे. म्हणूनच आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही वारकरी संस्कृती आपले अस्तित्व टिकवून आहे. अठरा पगड जातीचे, विविध धर्मपंथाचे लोकं वारकरी संप्रदायाने जवळ केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसामान्यांच्या पर्यंत वारकरी संप्रदायाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. वैभवशाली व सर्व समावेशक असणाऱ्या वारकरी संप्रदायाची, संतांच्या मूल्याधिष्ठित व मानवतावादी साहित्याची परंपरा खान्देशातही महत्त्वाची ठरलेली आहे. खान्देशच्या भूमीत निर्माण झालेले संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महत्त्वाचे मठ, संस्थान यांचे कार्य मोलाचे आहे. खान्देशातील वारकरी सांप्रदायिक संतांनी निर्माण केलेली आध्यात्मिक लोकशाही, मानवता, सर्वधर्मसमभाव वृत्ती, सामाजिक समरसता, डोळस भक्ती याचा परामर्श घेता यावा. या हेतूने प्रेरित होऊन खान्देशातील वारकरी संप्रदाय या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. यात खान्देशातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे मठ, संस्थान यांचे कार्य व परंपरा. खान्देशातील वारकरी संतांचे समाज प्रबोधन व वाङ्मयीन कार्य, खान्देशातील महत्त्वाच्या कीर्तनकारांचे भक्ती प्रबोधन, समाज प्रबोधन व दिशादर्शक कार्य याविषयीचा परामर्श घेतलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789089141055,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KhandeshatilVarkariSampraday_DineshPatil_Bhalod_1.jpg?v=1776263643"},{"product_id":"sant-sahitya-aani-sanshodhan","title":"संत साहित्य आणि संशोधन","description":"\u003cp\u003eसंतांनी आपल्या साहित्यातून समाजात सुख, शांती, ऐक्य, सहिष्णुता, मानवता, अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी व मार्गदर्शक तसेच नीती मूल्यांवर आधारित, शाश्वत मूल्यांवर आधारित साहित्याची निर्मिती संतांनी केली. मध्ययुगीन कालखंडात समाजातील विविध समस्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेले संतांचे मूल्याधिष्ठित साहित्य सतत भव्यत्वाचा, दिव्यत्वाचा व अलौकिकतेचा शोध घेत आहे. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही समाजाला आदर्श, मानवतावादी, समतावादी जीवन जगण्यासाठी संतांचे मूल्याधिष्ठित व सर्वसमावेशक साहित्य प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे. साहजिकच आदर्श जीवनाची, स्वधर्माची, मानवतेची, आध्यात्मिक लोकशाहीची, सकारात्मकतेची रुजवण करण्यासाठी संत साहित्याचा सतत शोध घेणे  महत्त्वाचे  आहे. प्रस्तुत संत साहित्य आणि संशोधन या पुस्तकात संत साहित्य संशोधनाची पार्श्वभूमी, संत साहित्य संशोधनाचा हेतू, दिशा व व्याप्ती संत साहित्य संशोधनाची गरज व महत्त्व, विविध भक्ती संप्रदाय व संत साहित्य यांचा अनुबंध या विषयावर चर्चा केलेली आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789096972607,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SantSahitya_Sanshodhan_DineshPatil_Bhalod_1.jpg?v=1776263998"},{"product_id":"महानुभाव-संप्रदाय-ः-वाङ्मय-आणि-सद्यस्थिती","title":"महानुभाव संप्रदाय : वाङ्मय आणि सद्यस्थिती","description":"\u003cp\u003eमहानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे केवळ मराठी भाषेची सेवा करणारे साहित्य नसून, मानवतेचा आणि लोककल्याणाचा अमूल्य संदेश देणारे आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानपर दालन आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रातून प्रकटलेली शिकवण ही केवळ भक्तीच्या मर्यादेत सीमित नसून, ती जीवनाच्या प्रत्येक पैलूस स्पर्श करणारी आहे. सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधत, जाती-पाती, लिंगभेद, धार्मिक दुरावा या सर्व भेदांचे उच्चाटन करणारी ही वाणी, मनाला स्पर्शून जाते. \u003cbr\u003eश्रीचक्रधर स्वामींनी संस्कृत भाषेच्या अभेद्य दरवाजाऐवजी सहज-सरळ, जिव्हाळ्याच्या मराठी भाषेतून तत्त्वज्ञान मांडले. त्यामुळे विद्वानांसोबतच सामान्य लोकांनाही उच्च तत्त्वज्ञानाचा लाभ झाला. यात करुणेचा, समानतेचा आणि विवेकाचा संगम आहे. लोककल्याणाच्या सर्वोच्च हेतूने रचलेले हे वाङ्मय आजही सामाजिक ऐक्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणादायी आहे. \u003cbr\u003eया ग्रंथातून वाचकाला महानुभाव संप्रदायाच्या विचारविश्वाचा सखोल परिचय होतो. यात श्रीचक्रधर स्वामींच्या जीवनदृष्टीतून आलेली मानव-मूल्ये, आध्यात्मिकता आणि सामाजिक सुधारणा यांचा सुंदर संगम दिसतो. हे वाङ्मय केवळ ऐतिहासिक नोंद नसून, आजच्या काळातही उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारा जिवंत वारसा आहे.\u003cbr\u003eमहानुभाव संप्रदायाचे हे ज्ञानदालन म्हणजे सत्य, करुणा, समानता आणि एकात्मतेचा अखंड प्रवाह जो मराठी भाषेतून आणि लोकांच्या अंत:करणातून पिढ्यान्पिढ्या वाहत राहील.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792778719551,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MahanubhavSanpraday-VadmayAaniSadyaSthiti_DrSandipMali_1.jpg?v=1776323397"},{"product_id":"marathi-hindi-kadambari-abhyas","title":"मराठी व हिंदी कादंबरी : तौलनिक साहित्याभ्यास","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“मराठी व हिंदी कादंबरी : तौलनिक साहित्याभ्यास” हे पुस्तक म्हणजे दोन भाषांतील ग्रामीण कादंबऱ्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा एक सखोल प्रयत्न आहे. मराठी व हिंदी साहित्याच्या प्रवाहात ग्रामीण आशय कसा विकसित झाला, त्यातील साम्य-भेद कोणते, आणि सामाजिक जीवनातील विविध पैलू—विवाहसंस्कृती, अंधश्रद्धा, सण-उत्सव, स्त्रीजीवन, जातिव्यवस्था, अस्पृश्यता, धर्मांधता, लैंगिक संबंध—यांचे चित्रण कसे झाले आहे, याचा विस्तृत उहापोह या पुस्तकात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतौलनिक साहित्याभ्यासाच्या संकल्पनेचे विवेचन, त्याची वैशिष्ट्ये आणि संशोधनासाठीची दिशा हे पहिले प्रकरण वाचकांना मार्गदर्शक ठरेल. पुढील प्रकरणांमध्ये ग्रामीण कादंबऱ्यांचा प्रवास, त्यांचा सामाजिक संदर्भ, आणि महाराष्ट्र व उत्तर भारतातील संस्कृतीतील साम्य-भेद यांचा सखोल अभ्यास सादर केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक केवळ संशोधकांसाठीच नाही, तर साहित्यप्रेमी वाचकांसाठीही उपयुक्त आहे. मानवी जीवनाचा व्यापक पट एकाच वेळी उभा करणारा हा तुलनात्मक अभ्यास भारतीय समाज अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी निश्चितच मदत करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792797561151,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Marathi-HindiKadambariAbhyas_RahulPatilSamiksha_1.jpg?v=1776323752"},{"product_id":"marathitil-nivadak-sahity-samiksha","title":"मराठीतील निवडक साहित्य समीक्षा","description":"\u003cp\u003eडॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हयातभर अध्यापनाचे कार्य करीत असतानाच आपल्यातील सर्जनशीलतेला आणि आस्वादकतेला कुठे बाधा येणारा नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यातूनच त्यांच्यातील ललितलेखिका आणि विवेचक समीक्षिका घडत गेली. ही घडणूक होताना त्यांनी अवतीभवतीचे भान राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला. समाजमनापासून व्यक्तिमनापर्यंतचे सर्वस्तरीय भान त्यांनी आपल्या लेखनात सातत्याने प्रकट केले. समीक्षक हा सर्जनशील लेखक असेल तर त्याच्या लेखनाला वेगळी झळाळी कशी प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे लेखन समोर ठेवता येईल. या प्रक्रियेतूनच त्यांनी वारंवार काही समकालीन कलाकृतींवरील लेखन केलेले आहे. त्या लेखनाची एकत्रित भेट ‘मराठीतील निवडक साहित्य-समीक्षा’ या शीर्षकाखाली वाचकांना, जाणकारांना मिळते आहे, हे या दृष्टीने महत्त्वाचे वाटते.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी ज्या कलाकृती रसास्वादासाठी निवडलेल्या आहेत त्या बहुतेक या शतकातल्या पहिल्या पर्वातल्या आहेत. खाउजा संस्कृतीच्या परिणामकारकतेच्या उत्तर पर्वातील या कलाकृतींवर लिहितांना लेखिका समकालीन नैतिकता आणि कलाकृतीची सर्वांगीण मूल्यात्मकता तपासात मुक्तपणे त्यातील स्वत्त्वाला सामोरी जाते. आणि हे करताना या मूल्यमापनात कुठेही सैद्धांतिक बोजडपणा येऊ नये, हे लेखन सर्वसामान्याला अधिक भावेल, याची त्या पुरेपूर दक्षताही घेतात.\u003cbr\u003eमराठी समीक्षेत आस्वादक समीक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते ती वर्ण्य कलाकृतीचा अधिक खोलात जाऊन सर्वांगीण शोध घेते, म्हणून. आपल्या समीक्षालेखनासाठी डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हीच वाट निवडल्याने यात चर्चिल्या गेलेल्या कलाकृतींना योग्य न्याय मिळाला आहे. आणि म्हणूनच अभ्यासकांना हा समीक्षाग्रंथ महत्त्वाचा ठरावा, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. रवींद्र शोभणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eअध्यक्ष, 97 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अमळनेर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792853659967,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MarathitilNivadakSahitySamiksha_DrShrutiWadagbalkar_1.jpg?v=1776324760"},{"product_id":"stri-sahitya-ani-strivad","title":"स्त्री साहित्य - स्त्री वाद","description":"\u003cp\u003eसोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे नवीन पुस्तक “स्त्री साहित्य... स्त्री वाद..” वाचकांच्या हाती देताना आनंद वाटतो. त्या लेखिका, समीक्षक तर आहेत, पण सर्जनशील साहित्यिका आहेत. कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख, कविता, एकांकिका, बालसाहित्याची मिळून त्यांची चाळीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या अनेक संस्थांच्या कार्यकारणी वरती आहेत सध्या सोलापूर म.सा.प.च्या अध्यक्ष असून साहित्यिक वाटचालीबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग आहे. प्रभारी प्राचार्य, मराठी विभाग प्रमुख, पीएच.डी.च्या मार्गदर्शिका म्हणून त्यांनी काम केले आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. स्त्रीमुक्तीच्या चळवळीनंतर स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याला उठाव मिळाला. स्त्रिया लिहिताहेत हे अधोरेखित होत असल्याने त्याकडे सजगपणे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत गेला. स्त्रीवादी साहित्याची व्याख्या, त्यातूनच भारतीय व पाश्चात्य स्त्रीवादाची तुलना ओघानच आली. पाश्चात्य स्त्रीची जीवनपद्धती, मानसिकता ही वेगळी म्हणून भारतीय स्त्री जीवनाचे विश्लेषण व्हायला सुरुवात झाली. तिची आत्मचरित्र हा त्याचा आरसा होता. हे नक्की. ती काय करते? तिच्या कार्याची क्षेत्र कोणती? याचाही शोध घेतला जात राहिला. तिचं सुयोग्य चित्र कथा साहित्यात आलं असेल तरी त्याचं स्वरूप काय? या सगळ्या गोष्टीचा विस्ताराने  विचार प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी  या पुस्तकात केला आहे. याचबरोबर महिलांना आरक्षण असणं कायद्याच्या रूपाने किती आवश्यक हेही त्या आग्रह पूर्वक मांडतात. कारण भारतीय महिलांना कायद्यानेच पुरुषां बरोबरीच्या सवलती मिळाल्यात, मग ते शिक्षण असो, वारसा हक्क असो की मतदान. हे लेखिका जाणून आहे. त्यांच्या मुलाखतीतून त्यांची भूमिका जास्त स्पष्ट होते. हा “स्त्री साहित्य..स्त्री वाद..” समीक्षणात्मक लेखसंग्रह मराठी साहित्याला आणखी समृद्ध करेल व अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी होईल हे निश्चित.. या प्रतिथयश लेखिकेला उर्वरित लेखनासाठी अनेक शुभेच्छा...\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. छाया महाजन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिका, माजी प्राचार्या,\u003cbr\u003eडॉ. आय.बी.पी. महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792859918655,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/StriSahityaAniStrivad_DrShrutiWadagbalkar_1.jpg?v=1776325097"},{"product_id":"matanganchi-shaurya-gatha","title":"मातंगांची शौर्य गाथा","description":"\u003cp\u003eशतकानुशतके सामाजिक वंचनेच्या छायेत राहूनही असामान्य धैर्य, कर्तृत्व आणि निष्ठेची अमिट छाप सोडणाऱ्या मातंग समाजाचा इतिहास आजही फारसा ज्ञात नाही. ‘मातंगांची शौर्यगाथा’ हे पुस्तक या समाजाच्या गौरवशाली, पण दुर्लक्षित इतिहासाचे दार वाचकांसमोर उघडते आणि एका समृद्ध सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रवासाची साक्ष देते.\u003cbr\u003eया ग्रंथात मातंग समाजाच्या पराक्रमाची, आध्यात्मिक अधिष्ठानाची आणि सामाजिक लढ्यांची साक्ष देणारी विविधांगी चित्रे प्रभावीपणे उभी केली आहेत. सत्यवादी गावजी बाबा, पुरंदरचा किल्ला, अमळनेरचा दगडी दरवाजा, ह.भ.प. शंकर महाराज म्हसावदकर, संजीवानंद महाराज यांसारख्या थोर विभूतींच्या योगदानामुळे या ग्रंथाला एक वेगळे वैचारिक व दस्तऐवजात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. \u003cbr\u003eपारंपरिक अस्पृश्यतेच्या विरोधात उभा राहिलेला हा समाज केवळ विरोधाच्या नव्हे तर आत्मबळाच्या इतिहासाचे प्रतीक आहे. या लढ्यांची सामाजिक उत्क्रांती, धार्मिक परंपरा, लोकसंख्याशास्त्रीय विश्लेषण आणि विद्वान अभ्यासकांचे साक्षेप यांचे सखोल चिंतन या ग्रंथात प्रभावीपणे सादर झाले आहे. बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाशी असलेले मातंग समाजाचे ऐतिहासिक अनुबंध, त्यांच्या अस्मितेचा शोध आणि सामाजिक न्यायासाठीचा प्रयत्न यांची साक्ष या लेखनातून मिळते.\u003cbr\u003eलेखकाची ओघवती, स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण भाषाशैली वाचकाला सहजपणे आपलेसे करते. ‘मातंगांची शौर्यगाथा’ हे केवळ इतिहासाचे दस्तऐवजीकरण नसून, एका वंचित समाजाच्या आत्मभान, अस्मिता आणि उन्नतीचा प्रेरणादायी आलेख आहे, जो आजच्या सामाजिक संदर्भात अत्यंत समर्पक आणि विचारप्रवर्तक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792878137663,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MatanganchiShauryaGatha_HarishchandraKadhare_1.jpg?v=1776325653"},{"product_id":"yog-abhyas-margedarshak-puskita","title":"योग-अभ्यास मार्गदर्शक पुस्तिका","description":"\u003cp\u003eयोग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैली आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा हा प्राचीन भारतीय ज्ञानमार्ग आज जगभरात स्वीकारला जात आहे. एनसीसीच्या नवीन अभ्यासक्रमात योगाचा समावेश विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि चारित्र्य विकासासाठी उपयुक्त ठरतो.\u003cbr\u003eया पुस्तकात प्रार्थना, पूरक हालचाली, विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचा क्रमशः अभ्यास दिला आहे. प्रत्येक आसनाची पद्धत, वेळापत्रक आणि महत्त्व यांचा संक्षिप्त आढावा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.\u003cbr\u003e21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाविषयी सखोल माहिती मिळावी, तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार व्हावा, हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविण्यासाठी प्रेरणा देईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793083789631,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Yog-AbhyasMargedarshakPuskita_MajorDrSanjayChaudhari_1.jpg?v=1776331819"},{"product_id":"palak-prabodhan-pustika","title":"‘पालक-प्रबोधन‌’ पुस्तिका","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंवाद\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eलेकरांना अवश्य सांगा की, स्वतःशी तुला जर\u003cbr\u003eस्पर्धा करायची असेल तर प्रथम स्वतःला\u003cbr\u003eनीट समजून घे.\u003cbr\u003eयश मिळवायचं असेल, तर कोणत्या\u003cbr\u003eगोष्टी कराव्यात, टाळाव्यात, हेही सांगा.\u003cbr\u003eकारण, प्रत्येक लेकराला विशेष कौशल्यांची\u003cbr\u003eआणि बुद्धिमत्तेची ‘भेट’ मिळालेलीच असते.\u003cbr\u003eती वाढवणं हेच पालकांचं काम,\u003cbr\u003eतेही शांतपणे...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eचिंतन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eगुलाबांना काटे असले तरी त्याचं\u003cbr\u003eसौंदर्य कमी होत नाही.\u003cbr\u003eजीवनात मोठे आनंदाचे क्षण,\u003cbr\u003eलहानसहान दुःखांसह येणारच...!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“गुरु का चरण पूजा का मुख्य स्थान है|\u003cbr\u003eगुरु का वाक्य सब मंत्रों का मूल है\u003cbr\u003eऔर गुरु की कृपा मुक्ति का कारण है|”\u003cbr\u003e                                    \u003cstrong\u003e- स्कंद पुराण\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e- ज्ञान तो गुरु से ही प्राप्त हो सकता है\u003cbr\u003eइसलिए गुरु, मातापिताजी और बड़ों का\u003cbr\u003eआदर किजिए|\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793240453439,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Palak-PrabodhanPustika_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776334135"},{"product_id":"single-by-choice","title":"सिंगल, बाय चॉइस","description":"\u003cp\u003eप्रत्येक शिक्षक हा जातिवंत शिक्षक असतोच. पण तो विद्यार्थ्याचा पालक ही असतो. दोन्ही भूमिका तो एकाच वेळी बजावत असतो. किंबहुना तो पालक अधिक असतो. म्हणून विद्यार्थ्यांबद्दल वात्सल्याचा पान्हा त्यांना अगोदर फुटतो. नेमलेल्या पाठ्यपुस्तकांमधील नियोजित विषयांचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यात तो हमखास सफल होतो. त्याचं कारण, त्याचं अध्यापन कौशल्य एवढंच नाही, तर त्याबरोबर त्याचं शिष्यवात्सल्य हेही आहे. आपल्यावर सोपवलेलं काम निष्ठेने व नियमितपणे करणं. आपलं अध्यापन कौशल्य पणाला लावून अपेक्षित ज्ञान विद्यार्थ्यांकडे संक्रमित करणं, ते त्याला अवगत करता आलं की नाही, याची चाचपणी म्हणून अधूनमधून चाचणी परीक्षा घेणं, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अधिकाधिक सुधारणा घडवून आणणं, विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणं, त्याचबरोबर त्याच्यामधील चिकित्सा वृत्तीलाही प्रोत्साहन देणं, वारंवार प्रतिप्रश्न विचारून शंकासमाधान करून घेण्यास त्याला प्रवृत्त करणं, विषय-ज्ञानाबाबत त्याला आपल्या पातळी पर्यंत आणून पोचवणं, आपल्याशी चर्चा करण्याएवढा त्याचा आत्मविश्वास वाढवणं ही झाली शिक्षकाची एक बाजू. पण या निमित्तानं जवळ आलेल्या विद्यार्थ्याच्या व्यक्तित्वाचे विविध कंगोरे साक्षेपानं साफसूफ करून घेणं, त्याच्यातल्या सुप्त गुणांना विकासासाठी वाव देणं, एकूण त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला मदत करणं, जग व जीवन याबद्दलची डोळस जाण त्याच्यामधे उत्पन्न करून हळूहळू वाढवत नेणं, तो एक परिपूर्ण नागरिक बनेल या दृष्टीनं त्याच्या वाढीकडं लक्ष पुरवणं ही शिक्षकाची दुसरी बाजू. यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. फक्त पालकाचं अंतःकरण असावं लागतं. समोरचा मुलगा हा आपला विद्याथ आहे असं मानलं, तर गुरूशिष्यांच्या नात्यात रूक्षपणा येतो. अंतर उत्पन्न होतं अन् तो एकदा परीक्षेत उत्तीर्ण किंवा अनुतीर्ण झाला, की त्याच्याशी असलेलं शिक्षकाचं नातं संपुष्टात येतं. विद्यार्थ्याऐवजी तो आपला पाल्य ही दृष्टी एकदा स्वीकारली, की संबंधात ओलावा निर्माण होतो व अभ्यासाव्यतिरिक्तच्या वेळाकडं व अवस्थेकडं लक्ष पुरवावंसं वाटतं. शिष्यांचं जाऊन तिथं पितापुत्राचं नातं आकार घेऊ लागतं. या नात्यामध्ये ते एकमेकांमधल्या उणिवा दूर करतात व एकमेकांच्या निकोप वाढीस साहाय्यभूत होतात.\u003cbr\u003eतेव्हा शिक्षकांच्या या दोन्ही बाजूंचा आपण अभ्यासू नजरेनं विचार करायला हवा !\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793244516671,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SingleByChoice_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776334505"},{"product_id":"tasadibaddal-kshamaswa","title":"तसदीबद्दल क्षमस्व","description":"\u003cp\u003eचंद्रकांत भंडारी यांचा आरसा म्हणजे त्यांचा नायक - ‘सूर्यकान्त अमळनेरकर’! तोही त्यांच्यासारखाच अमळनेरचा. पेशाने शिक्षक. शिक्षकी वातावरणात, पुस्तकांच्या सान्निध्यात आणि साध्या जगण्यात जीवनाचं सुख शोधणारा. त्याला एक मुलगी आवडते. तो तिला तसं सांगतोही. त्यासाठी काही पत्रे लिहितो. त्याचा मित्र ती पत्रे तिच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र, त्या वयाला शोभणारा राग, अवघडलेपण ‘तिला’ वाटतं. ती संपर्क कमी करते आणि इथे ‘सूर्यकान्त’च्या प्रेमाचा उगवता सूर्य मावळतो. आपल्यामुळे तिला त्रास झाला, तिचं मन दुखावलं या विचाराने तिच्यापेक्षा जास्त त्याचं मन दुखावतं आणि ती सल घेऊन तो महाविद्यालयातून बाहेर पडतो. परंतु, आपला हा अश्वत्थामा पुढे आयुष्यभर तिला शोधत ती ठसठसती जखम घेत तसाच फिरत राहतो. इतकंच नाही, तर आपल्या पत्नीला मोकळेपणाने सर्व सांगतो. ती देखील परिस्थिती समजून घेते त्याला साथ देते आणि त्याच्या शोधाला आडकाठीही घालत नाही. मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप वगैरे नसलेल्या त्या काळात सुटलेली साथ. नाव सोडून कोणतीही माहिती जवळ नाही. अशा स्थितीत तो तिला कसं शोधतो? ती त्याला सापडते का? सापडली असेल तर तो तिला ‘तसदीबद्दल क्षमस्व!’ असं म्हणतो का? आणि ती त्याला क्षमा करते का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वाचण्याची प्रेमळ ‘तसदी’ घ्यायला हवीच!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- मयूर भावे, पुणे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e(लेखक, वक्ते व पत्रकार)\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793255952703,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/TasdibadalShamaksha_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776334822"},{"product_id":"bhau-bole","title":"भाऊ बोले","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e‘उत्साही’ ती...\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘ती’ चालत होती...\u003cbr\u003eचालता चालता मागे राहून गेलेल्यांना\u003cbr\u003e(विद्यार्थिनींसह ज्येष्ठ-श्रेष्ठ मैत्रिणींना)\u003cbr\u003eपुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होती.\u003cbr\u003eथोड्या वेगाने वा अतीवेगाने,\u003cbr\u003eपुढे जाणाऱ्यांना\u003cbr\u003e‘ती’ .. वास्तवतेचे भान देत होती\u003cbr\u003e‘ती’ चं चालणं जसं ‘धावणं’ झालं नाही\u003cbr\u003eतसंच ‘शिक्षकी’ बैठकीमुळे मोहापाशीही\u003cbr\u003e‘रेंगाळणं’ झालं नाही\u003cbr\u003eसाधी-साधी कामं करत पुढे जाणाऱ्या\u003cbr\u003e‘ती’ च्या कडे पाहून सर्वांना वाटायचं..\u003cbr\u003e‘ती’ खरी ‘गृहिणी’, खरी हाडाची ‘शिक्षिका’ \u003cbr\u003eखरी ‘कामसू स्त्री’... अन् बरंच काही\u003cbr\u003eपण... ‘ती’ मात्र आवर्जून नव्हे निक्षून\u003cbr\u003eसांगायची..\u003cbr\u003eमी आहे एक अस्सल गृहिणी...\u003cbr\u003eघरादारासाठी जगणारी! नातेवाईक सांभाळणारी!!\u003cbr\u003e‘ती’ चा हाच आठवणींचा प्रवास\u003cbr\u003e‘भाऊ बोले’ मध्ये शब्दबद्ध झालाय\u003cbr\u003e‘तो’  वाचून तुम्ही म्हणाल...\u003cbr\u003e‘ही’ होती ‘खरी’ स्त्री\u003cbr\u003eनिष्काम कर्म करणारी कर्मयोगीनी\u003cbr\u003eअन् ‘माणूस’ पेरणारी, वेचणारी\u003cbr\u003eएक ‘उत्साही’ स्त्री!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- चन्द्रकान्त भंडारी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793282560319,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhauBole_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776335543"},{"product_id":"purushachya-vyatha","title":"पुरुषाच्या व्यथा","description":"\u003cp\u003e    समकालीन समाजात सर्वच स्रिया आळशी, बेफिकीर व अहमी नाहीत; पण बऱ्याच शिक्षित गृहिणी तशा दिसून येतात. त्यामुळे अशा बायका ज्यांच्या नशिबात आल्या असतील त्याला हे ‘पुरुषवादी’ काव्य त्याच्या जीवनाचे प्रतिरूप वाटेल, असे अनुभव प्रस्तुत संग्रहात काव्यात्म पद्धतीने सांगितलेले आहेत. मध्यमवगय नोकरदार पुरुषाच्या जीवनाचे ते भीषण वास्तव आहे; म्हणून घर घर की कहाणी अशीच काहीशी प्रचिती त्यातील कवितांमधून वाचकांना येईल. मात्र ती कोण्या स्त्रीबाबत तक्रार नाही, की कोणा स्त्रीचे दोष दाखवून पुरुषांचे श्रेष्ठत्त्वही इथे सांगितले नाही. आजच्या काळात काही बायका नवऱ्याशी चांगल्या वागत नाही, त्यामुळे बिचाऱ्याची फार घुसमट होते, ती अनेक दृष्टीने, हेच इथे समजून घ्यावे लागते, ते एका नवऱ्याच्या भावविरेचनातून, त्याच्या दुखऱ्या मनाच्या व भावनेच्या प्रकटनातून. अशावेळी ती बायकोविषयी केलेली तक्रार न मानता आजच्या पुरुषांच्या व्यथा-वेदनांचा तो उद्गार आहे, असे म्हणता येईल. काही कवितांमधून मात्र मैत्रीण किंवा प्रेयशी हिच्याबाबत मात्र हळुवार भावना प्रकट झालेल्या आहेत. म्हणजे बायकोपेक्षा मैत्रीण अधिक चांगली वाटते, असे का होते ? बायकोनेच नवऱ्याची मैत्रीण का होऊ नये ? असे काही प्रश्नही इथे पडतील. केवळ पुरुषाचे भावविश्व कवितेतून अधोरेखित करायचे असल्याने त्याच्या व्यथांचे स्वरूप वाचक समजून घेतील.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793333612863,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PurushachyaVyatha_DrManoharSurwade_1.jpg?v=1776336949"},{"product_id":"to-ti-te","title":"तो-ती-ते","description":"\u003cp\u003e    तो तिचा पती आहे, तसेच  कोणाचा तरी मुलगा किंवा भाऊ आहे. त्याच्या रक्तसंबंधाचा एक गोतावळा आहे. त्याचा त्याविषयी लोभ आहे, पण त्याची जोडीदार तशी नाही. तिची ओढ व लोभ माहेराकडे असते. ही विसंगती त्यांच्यातील संघर्षाचे कारण ठरते, तेव्हा तो तिच्याशी कसा वागतो, हे त्याच्या भावना व विचारांसह कविता निर्माण होत गेली आहे. \u003cbr\u003e    ‘तो’ मित्र आहे, तसा स्नेही व प्रियकरदेखील आहे आणि ‘ती’ मैत्रीण आहे, तशी प्रेयसीही आहे. दोघांच्या भावसंबंधात ‘तेच्या म्हणजे लोकांच्या परंपरागत मानसिकता, रूढ झालेली जुनाट मूल्ये, त्यातून तिचे घडलेले मन व तिचे दृष्टिकोन ‘त्याच्या’ स्वप्नांना बाधक ठरतात. धड बोलता येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी त्याची अवस्था होते. तिच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे तो दुरावाही सहन करू शकत नाही. ही त्याच्या मनाची चाललेली तगमग काही कवितांमधून दिसून येईल. त्याचे केविलवाणे मनोभाव रसिकमनाला स्पर्श करून जातील.  ह्या कविता पुरुषकेंद्री असल्याने ‘तोचे भावविश्व समजून घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793339085119,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ToTiTe_DrManoharSurwade_1.jpg?v=1776337193"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/marathi-literature.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}