{"title":"ग्रंथालय व माहितीशास्त्र","description":"","products":[{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-pranali-i","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली - I","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणणारे ठरले आहे. या धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय, समग्र व जीवनाशी निगडित शिक्षण मिळावे, हा प्रमुख हेतू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ हा विषय Open Elective (OE) स्वरूपात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना ग्रंथालय व माहितीशास्त्राची  प्राथमिक ओळख करून देते. ग्रंथालयांचे प्रकार, माहिती साधने व स्त्रोत, शैक्षणिक ग्रंथालयांची रचना व नियम, नीतिशास्त्र, संग्रह व्यवस्थापन, प्रवेश प्रणाली, तसेच मूलभूत व विशेष सेवा या सर्व गोष्टी सोप्या भाषेत मांडल्या आहेत. संदर्भ सेवा, ग्रंथालय अभिमुखता, आंतरग्रंथालय देवघेव, प्रलेखन, भाषांतर, साहित्य शोध आणि माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आधुनिक सेवा यांचा उपयोग विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा पद्धतीने स्पष्ट केला आहे. \u003cbr\u003e‘ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रणाली’ हा ग्रंथ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृतीची जाणीव करून देणारा, माहितीच्या शोधकौशल्यांचा विकास करणारा आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व अधोरेखित करणारा उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701218472255,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/FYBA_GranthalayAaniMahitishastraPranali-I_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775470014"},{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-pranali-ii","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र प्रणाली - II","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च शिक्षणात बहुविद्याशाखीय व समग्र दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख करून देणे, माहिती संसाधनांचा योग्य वापर शिकवणे आणि संशोधनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. या ग्रंथात ग्रंथालय सेवा, सुविधा, संशोधन साधने तसेच सामाजिक माध्यमांचा शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उपयोग यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. ओपॅक व वेब ओपॅक सारख्या आधुनिक शोध तंत्रांचा वापर, इलेक्ट्रॉनिक माहिती संसाधनांची ओळख, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याशी निगडित नैतिक मुद्दे यांचा समावेश विद्यार्थ्यांना ज्ञानसमृद्ध बनवतो. ‘ओपन इलेक्ट्रिव्ह’ (OE) स्वरूपात सादर होणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना वाचनसाहित्य शोधणे, हाताळणे व त्याचा प्रभावी वापर करण्याचे प्रशिक्षण देतो. ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रणाली- हा ग्रंथ विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर व्यावहारिक दृष्टिकोनातूनही सक्षम करतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701221257535,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/1FYBA_GranthalayAaniMahitishastraPranali-II_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775470422"},{"product_id":"ग्रंथालय-आणि-माहितीशास्त्र-कौशल्ये-भाग-1","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये - III","description":"\u003cp\u003eआजच्या डिजिटल युगात माहिती हीच खरी शक्ती आहे. पण या अफाट माहितीसमुद्रातून योग्य आणि उपयुक्त माहिती शोधणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि सर्व वाचकांना ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरते. या पुस्तकात डिजिटल संसाधने, ऑनलाईन डेटाबेस, मुक्त शैक्षणिक साधने, शोधयंत्रे, माहिती विपणन, तसेच ग्रंथालयांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. त्याचबरोबर माहिती साक्षरता, टिकात्मक विचारसरणी, संशोधन कौशल्ये, शैक्षणिक लेखनातील संदर्भ साधने आणि डिजिटल साक्षरता यांचा स्पष्ट आढावा घेतला आहे. \u003cbr\u003e‘ग्रंथालय व माहितीशास्त्र कौशल्ये’ हा ग्रंथ अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता वाचनसंस्कृतीची जाणीव करून देणारा, माहितीच्या शोधकौशल्यांचा विकास करणारा आणि ग्रंथालयीन सेवांचे महत्त्व अधोरेखित करणारा उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701223878975,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SYBA_GranthalayAaniMahitishastraKaushalye-III_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775470795"},{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-kaushalye-iv","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र कौशल्ये - IV","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केलेला हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती व्यवस्थापनाची कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो. माहिती विपणन, डिजिटल ग्रंथालय, ग्रंथालय नेटवर्क्स, कन्सोर्शिया आणि संस्थात्मक भांडार यांचा सखोल अभ्यास या पुस्तकात समाविष्ट आहे.  \u003cbr\u003eया ग्रंथात डिजिटल संसाधनांवरील सरकारी उपक्रमांची माहिती दिली असून NDLI, SWAYAM, MOOCs, UGC उपक्रम, शोधनिबंध भांडार तसेच करिअर पोर्टल्स, शैक्षणिक सामाजिक नेटवर्क्स, Research Gate, Academia.edu यांसारख्या आधुनिक व्यासपीठांचा उपयोग स्पष्ट केला आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील संशोधन व माहिती व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचे हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.  \u003cbr\u003eमओपन इलेक्ट्रिव्हफ (OE) स्वरूपात सादर होणारा हा अभ्यासक्रम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना माहितीशास्त्रातील सध्याचे कल, डिजिटल संसाधनांचा प्रभावी वापर आणि करिअर संधी यांची दिशा दाखवतो. हा ग्रंथ विद्यार्थ्यांना आधुनिक माहितीशास्त्रातील बदलत्या प्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701230793023,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/2SYBA_GranthalayAaniMahitishastraKaushalye-IV_DrKalpanaSonawane_1.jpg?v=1775471175"},{"product_id":"granthalay-aani-mahitishastra-khand-1-te-10","title":"ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (खंड 1 ते 10)","description":"\u003cp\u003eग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाच्या सर्वांगीण अभ्यासासाठी तयार केलेला हा ग्रंथ, यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या बी.लिब., एम.लिब., एम.फिल. तसेच पीएच.डी. (PET) अभ्यासकांसाठी हा एक उपयुक्त आणि विश्वासार्ह संदर्भग्रंथ आहे. तसेच NET\/SET व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथामध्ये ग्रंथालय व माहितीशास्त्रातील मूलभूत ते प्रगत संकल्पनांचा सुसंगत आणि सोप्या भाषेत आढावा घेतला आहे. विषयांची मांडणी अभ्यासक्रमानुसार व्यवस्थित करण्यात आलेली असून, प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या समज वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया संचातील दहा पुस्तकांमध्ये पुढील विषयांचा समावेश आहे –\u003cbr\u003eमाहिती विज्ञान, ग्रंथालयशास्त्राचा विकास, माहिती स्रोत व संसाधने, ग्रंथालय सेवा व प्रणाली, ज्ञान संघटन, ग्रंथालय व माहिती व्यवस्थापन, संगणक व माहिती तंत्रज्ञान, ग्रंथालय यांत्रिकीकरण व डिजिटायझेशन, संशोधन पद्धती आणि ग्रंथालय व माहिती प्रणाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंपूर्ण अभ्यासासाठी एकच विश्वासार्ह मार्गदर्शक म्हणून हा ग्रंथ विद्यार्थ्यांना नक्कीच यशाच्या दिशेने मार्गदर्शन करेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715736334655,"sku":null,"price":3200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/2_23ae5101-c4cd-4bd5-806b-63807f7e2e02.jpg?v=1776075256"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/library-and-information-science.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}