{"title":"भूगोल व पर्यावरण","description":"","products":[{"product_id":"भारताचा-प्राकृतिक-भूगोल","title":"भारताचा प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003e‘भारताचा प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक भौगोलिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. भारताचे भौगोलिक स्थान, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध यांचा सविस्तर आढावा या ग्रंथात घेतला आहे. विविध प्राकृतिक विभागांची ओळख करून देताना नकाशांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे, जे वाचकांना विषय अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत करते.\u003cbr\u003eजलप्रणाली आणि हवामान यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर आधारित विभागात प्रमुख नद्या, त्यांचे उगमस्थान, उपनद्या, पाणलोट क्षेत्र यांचे विश्लेषण सादर केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवामानाची वैशिष्ट्ये, ऋतूंचा क्रम आणि हवामानावर परिणाम करणारे घटक यांचे सखोल विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eमृदेचे प्रकार, त्यांचे वितरण, मृदा धूप आणि संवर्धन यांचा अभ्यास या पुस्तकात समाविष्ट आहे. तसेच भारतातील वनांचे प्रकार, त्यांचे वितरण आणि वनसंवर्धनाच्या उपाययोजना यांचेही विस्तृत वर्णन केले आहे.\u003cbr\u003eस्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास आणि संशोधनाच्या दृष्टीने हे पुस्तक एक विश्वासार्ह स्रोत ठरते. भारताच्या प्राकृतिक भूगोलातील विविध घटकांची समज आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698574881087,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatachaPrakritikBhugol_DrDattatrayPMane_1.jpg?v=1775369389"},{"product_id":"भारतीय-भौगोलिक-ज्ञान","title":"भारतीय भौगोलिक ज्ञान","description":"\u003cp\u003e‘भारतीय भौगोलिक ज्ञान’ हे पुस्तक प्राचीन भारताच्या समृद्ध भौगोलिक परंपरेचा अभ्यास सुसंगतपणे मांडणारे असून, त्यामधील सांस्कृतिक, धार्मिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा सुंदर समन्वय साधलेला आहे. वैदिक वाङ्मय, उपनिषदे, रामायण, महाभारत, पुराणे तसेच बौद्ध व जैन साहित्य यातील भूगोलाशी संबंधित विचार व वर्णने अभ्यासातून उलगडले आहेत. नद्या, पर्वत, दिशांपासून ते खंड, देश व मानवी जीवन यामधील निसर्गाशी असलेले नाते अभ्यासताना विद्यार्थ्यांना एक नवी अंतर्दृष्टी मिळते. या ज्ञानाचा आजच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात उपयोग कसा करता येईल, हेही या पुस्तकातून समजते.\u003cbr\u003eपुस्तकातील विशेष बाब म्हणजे गांधीवादी भौगोलिक विचारांचा समावेश. ग्रामस्वराज, स्वयंपूर्णतेची संकल्पना, पर्यावरणपूरक शेती, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामानातील बदलांसोबत जगण्याची कौशल्ये यांचा अभ्यास या ठिकाणी विस्ताराने करण्यात आला आहे. तसेच प्राचीन भारतातील अंतर्देशीय व सागरी व्यापारी मार्ग, वेधशाळा, स्थापत्यकला, शेतीविषयक परंपरा, ऋतूनुसार सण-उत्सव आणि पारंपरिक पर्यावरणीय ज्ञान यांचाही विचार या पुस्तकात करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाला अनुरूप अशी रचना व उपयुक्त दृष्टिकोन यामुळे हे पुस्तक भूगोल विषयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या पलीकडे नेणारे, विचार समृद्ध करणारे आणि भारतीय ज्ञान परंपरेचा अभिमान वाटावा असे ठरणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698585563455,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatiyaBhaugolikDnyan_DrSharadDhat_1.jpg?v=1775370410"},{"product_id":"भूरूपशास्त्राची-मुलतत्वे","title":"भूरूपशास्त्राची मुलतत्वे","description":"\u003cp\u003e‘भूरूपशास्त्राची मूलतत्त्वे’ हे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. या ग्रंथात भूरूपशास्त्रातील संकल्पना, सिद्धांत आणि संज्ञा सहज आणि सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत, जे  विषयाची मूलभूत समज विकसित करण्यात मदत करतात.\u003cbr\u003eपुस्तकात भूरूपशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती, विविध शाखा आणि त्याचे शैक्षणिक व व्यावहारिक महत्त्व यांचे सविस्तर विवेचन आहे. खंड व महासागरांची निर्मिती, भूपट्ट-तबकडी सिद्धांत, सागरतळ विस्तार आणि भूकवचाच्या हालचाली यांचे विश्लेषण अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे.\u003cbr\u003eविदारणाचे प्रकार, नदीच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचे आकृत्यांसह स्पष्टीकरण, तसेच सागरी लाटांमुळे तयार होणाऱ्या भूरूपांचे विश्लेषण या ग्रंथात समाविष्ट आहे. याशिवाय, आधुनिक काळातील भूरूपशास्त्राची मानवी जीवनातील उपयुक्तता आणि पर्यटन व अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूआकृती स्थळे यांची माहितीही विस्तृतपणे दिली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक भूरूपशास्त्र विषयाचे मूलभूत ज्ञान, सिद्धांत आणि उपयोजित पैलू समजावून देण्याचा प्रयत्न करते आणि स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यास व संशोधनासाठी एक विश्वासार्ह स्रोत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698587496767,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhurupshastrachiMultatve_DrDattatrayPMane_1.jpg?v=1775370936"},{"product_id":"जागतिक-स्थान-निश्चिती-प्रणाली-gps-परिचय","title":"जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (GPS) : परिचय","description":"\u003cp\u003eसध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात भौगोलिक माहितीचे अचूक संकलन, विश्लेषण आणि वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (ॠश्रेलरश्र झेीळींळेपळपस डूीींशा ड्ढ ॠझड) ही एक उपयुक्त व महत्त्वाची तंत्रज्ञान प्रणाली म्हणून विकसित झाली आहे. भौगोलिक अभ्यास, नकाशाशास्त्र, पर्यावरण अभ्यास, शहरी व ग्रामीण नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन तसेच दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये ॠझड चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.\u003cbr\u003eया पुस्तकाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ॠझड विषयी मूलभूत ते आवश्यक ज्ञान सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून देणे हा आहे. यात ॠझड प्रणालीचा अर्थ, घटक, इतिहास, कार्यपद्धती, उपग्रह, रिसीव्हर आणि नियंत्रण केंद्र यांची माहिती दिली आहे. तसेच विविध ॠझड उपकरणांचा वापर, क्षेत्रीय सर्वेक्षणातील माहिती संकलनाची प्रक्रिया, संकलित माहितीचे प्रक्रियाकरण, अचूकता वाढविण्याच्या पद्धती आणि ॠझड व इतर भौगोलिक प्रणालींसोबत ॠझड माहितीचे एकत्रीकरण यांचे विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ परीक्षाभिमुख नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, निरीक्षण क्षमता आणि प्रात्यक्षिक ज्ञान विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. भूगोल विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शक स्वरूपाचे असून पुढील उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठीही विश्वासार्ह संदर्भग्रंथ ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698592969023,"sku":null,"price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/JagatikSthanGPS_DrRameshAhire_1.jpg?v=1775371327"},{"product_id":"लोकसंख्या-आणि-वस्ती-भूगोलाची-ओळख","title":"लोकसंख्या आणि  वस्ती भूगोलाची ओळख","description":"\u003cp\u003e‘लोकसंख्या आणि वस्ती भूगोलाची ओळख’ हा ग्रंथ भूगोल विषयातील विद्याथ, संशोधक आणि स्पर्धा परीक्षाथ यांच्यासाठी उपयुक्त संदर्भग्रंथ आहे. यात लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, स्वरूप, व्याप्ती तसेच इतर शाखांशी असणारा परस्परसंबंध यांचे सविस्तर विवेचन केले आहे. जन्मदर, मृत्युदर आणि स्थलांतर यांसारख्या घटकांमुळे लोकसंख्या वाढीतील स्थानिक व कालगत विविधता स्पष्ट करण्यात आली आहे. भारतातील लोकसंख्या वाढीचे परिणाम, माल्थसचा सिद्धांत आणि भारत व नार्वेचे लोकसंख्या धोरण यांचा तुलनात्मक अभ्यास या ग्रंथात समाविष्ट आहे.\u003cbr\u003eवस्ती भूगोलाच्या विभागात ग्रामीण व नागरी वसाहतींचे आकृतिबंध, स्थानिक वैशिष्ट्ये आणि कार्यात्मक स्वरूप यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. नगर, शहर, महानगर, प्रमहानगर, स्मार्ट सिटी, ग्राम-नगर सीमांत क्षेत्र तसेच किंग्सले डेव्हिस यांचा नागरीकरणाचा सिद्धांत यांचे शास्त्रीय विवेचन येथे दिले आहे. भारतातील नागरीकरणाच्या प्रक्रियेचे वास्तववादी विश्लेषण आकृत्यांसह मांडले असून, शैक्षणिक अभ्यास, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा ग्रंथ विश्वासार्ह स्रोत ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698595066175,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/LoksankhyaAaniVastiBhugolachiOlkha_DrDattatrayMane_1.jpg?v=1775371844"},{"product_id":"aarthik-bhugol","title":"आर्थिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून आर्थिक भूगोलाचा अभ्यास विद्यार्थ्यांना मानव आणि पर्यावरण यांच्यातील आर्थिक संबंध समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. प्रस्तुत पुस्तकात आर्थिक भूगोलाच्या मूलभूत संकल्पना, व्याख्या, उद्दिष्टे, व्याप्ती तसेच विविध आर्थिक क्रिया, संसाधनांचे प्रकार व वितरण आणि आर्थिक विकासाचे प्रतिमान यांचा सखोल व सोप्या भाषेत आढावा घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक \u003cstrong\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/strong\u003e यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असून \u003cstrong\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020)\u003c\/strong\u003e च्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून रचलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e🎯 \u003cstrong\u003eपुस्तकाची वैशिष्ट्ये\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआर्थिक भूगोलाच्या संकल्पनांची सोपी व स्पष्ट मांडणी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमुद्देसूद विवेचन, योग्य उदाहरणे व तक्त्यांचा वापर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी उपयुक्त\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपरीक्षाभिमुख व्याख्या, लघुउत्तरे व सरावासाठी आवश्यक मुद्द्यांचा समावेश\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना आर्थिक भूगोलाचा अभ्यास अधिक सखोल व परिणामकारक करण्यास मदत करेल. विषयाची रुची वाढवून त्यांचा भौगोलिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704319209791,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AarthikBhugol_DrRameshAhire_1.jpg?v=1775548379"},{"product_id":"bhugolatil-kshetra-tantre","title":"भूगोलातील  क्षेत्र तंत्रे","description":"\u003cp\u003eभूगोलातील क्षेत्रतंत्रे : परिचय आणि नमुना पद्धती हे पुस्तक विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि शिक्षकांना क्षेत्रीय कार्याचे महत्त्व समजावून सांगते. भूगोल संशोधनात प्रत्यक्ष निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत आणि नमुना घेण्याच्या विविध तंत्रांचा वापर कसा करावा याचे सविस्तर मार्गदर्शन येथे दिले आहे.\u003cbr\u003eक्षेत्रीय कार्याची व्याख्या आणि भूमिका संशोधनात प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षणाचे स्थान, आवश्यक उपकरणे आणि अभ्यास क्षेत्र निवड प्राकृतिक व राजकीय घटकांची ओळख, संशोधन तंत्रे प्रश्नावली मुलाखत निरीक्षण यांचे गुणदोष, प्रश्नांचे प्रकार बहुपर्याय रँक ऑर्डर लोकसंख्याशास्त्रीय खुलेबंद प्रश्न, नमुना पद्धती यादृच्छिक स्तरीकृत गुच्छा व पद्धतशीर नमुना घेण्याचे मार्ग.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना संशोधन प्रश्नांची रचना योग्य तंत्राची निवड आणि नमुना घेण्याच्या पद्धतींचे व्यावहारिक ज्ञान देते. शैक्षणिक अभ्यासक्रम प्रकल्प कार्य आणि संशोधनासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.\u003cbr\u003eभूगोल शिकणाऱ्यांसाठी हे पुस्तक एक विश्वासार्ह मार्गदर्शक आहे सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704323043647,"sku":null,"price":86.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhugolatilKshetraTantre_DrVijayBaviskar_1.jpg?v=1775548618"},{"product_id":"dur-sanvednachi-multattve","title":"दूर संवेदनाची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात \u003cstrong\u003eदूर संवेदन तंत्रज्ञान\u003c\/strong\u003e हे भूगोलशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोजित क्षेत्र आहे. भूपृष्ठावरील विविध घटकांचे अचूक निरीक्षण, मोजमाप, नकाशांकन आणि विश्लेषण करण्यासाठी दूर संवेदनाचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी आवश्यक ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तक \u003cstrong\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/strong\u003e यांच्या SYBA (सत्र-IV) GG-226 (SEC-02) अभ्यासक्रमाशी सुसंगत असून \u003cstrong\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020)\u003c\/strong\u003e च्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून तयार केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e🎯 \u003cstrong\u003eपुस्तकाची वैशिष्ट्ये\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदूर संवेदनाचा अर्थ, व्याख्या व संकल्पना यांचे सोपे स्पष्टीकरण\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eउपग्रहांचे प्रकार, स्कॅनिंग तंत्रे व संवेदकांचे प्रकार यांचा सखोल आढावा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहवाई छायाचित्रण, त्यांची भौमिती, प्रकार व स्टीरीओस्कोप यांचे स्पष्ट विवेचन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअभ्यासक्रमाशी सुसंगत, सोपी व शैक्षणिक शैलीतील मांडणी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त उदाहरणे, तक्ते व संदर्भ\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक विद्यार्थ्यांना दूर संवेदन तंत्रज्ञानाची मूलभूत समज विकसित करण्यास मदत करेल. तसेच शिक्षक व संशोधकांसाठी अध्यापन व संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704327041343,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/DurSanvednachiMultattve-II_DrRameshAhire_1.jpg?v=1775548895"},{"product_id":"manavi-bhugol","title":"मानवी भूगोल","description":"\u003cp\u003e“मानवी भूगोल” या पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीमागे एक ठोस उद्देश आहे. भूगोलाच्या या अत्यंत महत्त्वाच्या शाखेचे समग्र व सुलभ स्वरूपात ज्ञान विद्यार्थी व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे. भूगोल ही एक केवळ भौगोलिक स्थळांची माहिती देणारी शाखा नसून मानव व निसर्ग यांतील परस्परसंबंधाची सखोल मांडणी करणारी ज्ञानशाखा आहे. सदर पुस्तकात मानवी भूगोलाच्या मूलभूत संकल्पना, दृष्टिकोन, मानवी वंश, संस्कृती, भाषा, धर्म, मानव-पर्यावरण सहसंबंध व इतर संबंधित विषयांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषयाचा प्रदीर्घ अध्यापनानुभव, तज्ञ मंडळींशी चर्चा व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पाठ्यपुस्तक लिहिले आहे. विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध नकाशे, आकृत्या, सारणी, छायाचित्रे यांचा योग्य त्या ठिकाणी वापर केलेला आहे. भूगोल हे शास्त्र असल्याचे भान ठेवून जास्तीत जास्त शास्त्रीय भाषा संकल्पनांचा वापर करून अप्रचलित परिभाषिक शब्दांसाठी इंग्रजी शब्द दिले आहेत. या पुस्तकाची रचना करताना आम्ही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा, संशोधक आणि शिक्षक या सर्वांचा विचार करून मुद्देसूद व सुलभ भाषा वापरून मांडणी केलेली आहे. प्रत्येक संकल्पना उदाहरणे, आकडेवारी, आकृती व तक्ते यांच्या सहाय्याने स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे विषय अधिक समजण्यास सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. मानवी भूगोलात नव्याने अंतर्भूत झालेल्या विविध भाषा, संकल्पना, प्रतिमाने, सिध्दांत यांचा समर्पक उदाहरण म्हणून वापर केला आहे.\u003cbr\u003eयामुळे विद्यार्थी, संशोधक व शिक्षक यांना हा ग्रंथ नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704341262655,"sku":null,"price":130.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ManaviBhugol_DrLalitSandanshiv_1.jpg?v=1775551876"},{"product_id":"nakashastra-tantra-prayogik-bhag-1","title":"नकाशाशास्त्रतंत्र (प्रायोगिक) (भाग 1)","description":"\u003cp\u003eनवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने भौगोलिक अभ्यासक्रमात नकाशाशास्त्र आणि प्रायोगिक भूगोलाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या स्थानिक माहितीची समज वाढविण्यासाठी, तसेच राष्ट्रीय विकास, उद्योगव्यवसाय, वाहतूक, दळणवळण आणि नियोजन या क्षेत्रात योग्य दिशादर्शन करण्यासाठी नकाशा शास्त्राचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. या ग्रंथात नकाशे व त्यांचे प्रकार, नकाशा वैशिष्ट्ये, नकाशाप्रमाण, नकाशा प्रक्षेपण, विविध प्रक्षेपणांची रचना तसेच व्यवहार्य वापरासाठी योग्य प्रक्षेपणाची निवड या सर्व बाबी सविस्तर व सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आल्या आहेत.\u003cbr\u003e“नकाशाशास्त्र तंत्र” हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, संशोधकांसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे. प्रायोगिक भूगोलाच्या अभ्यासातून विश्व, पृथ्वी, सूर्य-चंद्र, ग्रह-तारे आणि अवकाश यांचा परिचय करून घेताना नकाशाशास्त्र ही एक प्रभावी व वैज्ञानिक पद्धत ठरते.\u003cbr\u003eहे पुस्तक वाचकांना नकाशांच्या साहाय्याने ‘ब्रम्हांडाच्या सत्यानुभवाचा’ शोध घेण्याची नवी दृष्टी प्रदान करेल, याची खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704469713215,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/NakashastraTantra_Prayogik_Bhag1_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775555988"},{"product_id":"paryantan-bhugol","title":"पर्यटन भूगोल","description":"\u003cp\u003eअत्यंत पूव पासून मानव आपल्या सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या साधनसंपत्तीचा वापर करून आपल्या स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मग त्यात आपला आर्थिक विकास असेल सामाजिक असेल किंवा भौगोलिक असेल या सर्व अंगाने मानव उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर आपल्या स्वतःच्या व्यवसायाला प्रगतिशील करण्यासाठी करत आलेला आहे. संपूर्ण पृथ्वीवर साधन संपत्तीचे वितरण देखील असमान आहे त्याचा वापर स्थळ काल परत्वे प्रत्येक मानव आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आणि आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे करत आलेला आहे. \u003cbr\u003eपर्यटन ही मानवी भूगोलाची उपयोजित शाखा विसाव्या शतकाच्या मध्यंतरापासून प्रगत झालेली दिसून येते. पूव पासून मानवाला प्रवास करणे हे जीवन जगत असताना अत्यावश्यक बाब समजली जाते. पुरी पासून प्रत्येक माणूस आपला जीवनाचा आनंद घेण्यासाठी नवीन स्थळांना भेट देणे, धार्मिक स्थळांची भेटी देऊन आत्मिक आनंद शोधणे, व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांना भेट देणे किंवा नवीन प्रदेश शोधण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक विविध उद्देशाने माणूस हा प्रवास करत राहिला आणि त्यामधून पर्यटन ही आधुनिक संकल्पना उदयाला आली. खऱ्या अर्थाने पर्यटन हा शब्द तेराव्या शतकापासून प्रचलित झालेला असून विशिष्ट उद्देशाने प्रवास करून ठराविक ठिकाणी परत आला म्हणजे त्याला पर्यटन म्हणतात अशी संकल्पना त्या काळात उदयास आली. या उद्देशाने अत्यंत सर्वंकषपणे पर्यटन भूगोलाचा अभ्यास या पुस्तकात मांडण्याचा लेखकांनी प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704476365119,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ParyatanBhugol_DrNitinkumarMali_1.jpg?v=1775556416"},{"product_id":"prachin-bharatatil-bhaigolik-vichar","title":"प्राचीन भारतातील भौगोलिक विचार","description":"\u003cp\u003eभूगोल हा विषय केवळ नकाशे, प्रदेश किंवा पर्यावरणापुरता मर्यादित नसून मानवाच्या सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारशाशी घट्ट जोडलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय विद्वानांचे खगोलशास्त्रीय व गणितीय योगदान, ब्रह्मांडशास्त्र, विश्वदृष्टी, धार्मिक व पवित्र भूभागाशी असलेले निसर्गाचे संबंध तसेच प्राचीन भारतातील आर्थिक भूगोलाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांना आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे पृथ्वी व ब्रह्मांडाविषयीचे विचार, नद्या-पर्वतांचे सांस्कृतिक महत्त्व, व्यापारमार्गांचा भौगोलिक पाया, तसेच हडप्पा-मोहेंजोदडो ते लोथल-कालीबंगा या नगररचनांचा अभ्यास करून भौगोलिक दृष्टिकोनाची ऐतिहासिक परंपरा समजून घेता येईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🎯 पुस्तकाची वैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअभ्यासक्रमाशी सुसंगत व सोपी मांडणी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन भारतीय विद्वानांचे भूगोलातील योगदानाचे विवेचन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआर्थिक भूगोलातील व्यापार-जाळे व शहरी नियोजनाचा सखोल आढावा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपरीक्षाभिमुख उदाहरणे, संदर्भ व मुद्देसूद विवेचन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक SYBA (सत्र-III) GG-213 (DSC-9) अभ्यासक्रमाशी सुसंगत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून तयार केलेले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजावून घेण्यासाठी, परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्राचीन भारताच्या भौगोलिक वारशाविषयी अभिमानाची जाणीव करून देण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704487735615,"sku":null,"price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PrachinBharatatilBhaigolikVichar_DrRameshAhire_1.jpg?v=1775556846"},{"product_id":"prachin-bharatiya-bhaigolik-vicharsarani","title":"प्राचीन भारतीय भौगोलिक विचारसरणी","description":"\u003cp\u003eप्राचीन भारताचा इतिहास फक्त राजे-महाराजे, युद्धे आणि राजवटींवरच आधारित नाही, तर तो एक समृद्ध बौद्धिक आणि वैज्ञानिक परंपरा दाखवतो. या परंपरेत भूगोल विषयाला विशेष महत्त्व मिळाले आहे. या पुस्तकात प्राचीन भौगोलिक विचारसरणी आणि आर्थिक भूगोल या दोन महत्त्वाच्या अंगांचा सविस्तर अभ्यास केला आहे. आर्यभट्ट, भास्कराचार्य, वराहमिहिर यांसारख्या महान विद्वानांनी खगोलशास्त्र, गणित आणि भूगोल क्षेत्रात केलेल्या संशोधनामुळे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण मानवजात समृद्ध झाली.\u003cbr\u003eभारताची आर्थिक समृद्धी त्याच्या भूगोलाशी निगडित आहे. सुपीक गंगा-सिंधूची मैदाने, मोठा समुद्रकिनारा, विपुल खनिजसंपत्ती आणि व्यापारी मार्गांवरील भारताचे स्थान यामुळे तो जगातील एक प्रमुख व्यापारी व सांस्कृतिक केंद्र ठरला. हडप्पा मोहेंजोदडो सारखी प्रगत शहरे व त्यांचे नगरनियोजन याचे पुरावे आहेत. या ग्रंथात वैदिक साहित्य, पुराणे, महाकाव्ये, अर्थशास्त्र यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा तसेच पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा भूगोल व अर्थकारणाचे सर्वांगीण चित्र स्पष्ट होते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52704500646207,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PrachinBharatiyaBhaigolikVicharsarani_DrFulaKhandekar_1.jpg?v=1775557110"},{"product_id":"bharatatil-paryatan-utpadane","title":"भारतातील पर्यटन उत्पादने","description":"\u003cp\u003e    आधुनिक काळातील पर्यटकांच्या वर्गात विविध उद्देशांनी प्रवास करणाऱ्यांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः पर्यटनकाळ हा मर्यादित असतो. आठवड्यातील सुट्या, रजा तसेच एखाद्या कार्याचा वा कार्यक्रमाचा भाग म्हणून नियोजित कालावधीत पर्यटन केले जाते. प्रेक्षणीय स्थळे पाहणे, आरोग्यधामात निवास करणे. अभ्यास वा संशोधन करणे, सदिच्छा भेटीचा घटक म्हणून प्रसिद्ध स्थळे पाहणे यांसारख्या विविध हेतूंनी पर्यटकांची ये-जा चालू असते.\u003cbr\u003e    पर्यटनाचे क्षेत्र अंतर्देशीय तसेच आंतरराष्ट्रीय असते. जुन्या पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पर्यटनस्थळे विकसित करणे, ही पर्यटन उद्योगाची महत्त्वाची अंगे होत. अनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, त्यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धियंत्रणा उभी करणे, पर्यटकांना वाहतुकीच्या तसेच निवास-भोजनादी सुखसोयी उपलब्ध करून देणे, हेदेखील पर्यटन उद्योगाचे महत्त्वाचे घटक ठरतात. पर्यटनाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर परस्परांविषयी सामंजस्य व सद्भाव निर्माण करण्याचे कार्यही साधले जाते. \u003cbr\u003e    आधुनिकपूर्व काळातील प्रवासाची उद्दिष्टे प्राधान्याने धार्मिक, व्यापारी व विद्याध्ययनात्मक असत. पश्चिमी प्रबोधनकाळापासून एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन हा इहलोकनिष्ठ होऊ लागला व सांस्कृतिक, ऐतिहासिक, कालवाङ्मयीन, नव्याजुन्या निर्मितीबद्दल नवे आकर्षण निर्माण झाले. आधुनिक पर्यटनदृष्टीचा आरंभ तेव्हापासूनच झाला, असे म्हणता येईल. ही दृष्टी केवळ धनिक वर्गापुरतीच मर्यादित न राहता, ती सर्वसामान्य लोकांतही निर्माण होऊ लागली. \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52770675949887,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BharatatilParyatanUtpadane_DrDipakShirsat_1.jpg?v=1776175336"},{"product_id":"environmental-studies","title":"Environmental Studies","description":"\u003cp data-start=\"0\" data-end=\"420\"\u003eThis comprehensive textbook on Environmental Studies offers a clear and systematic understanding of the fundamental principles that govern the relationship between humans and the environment. Designed to build strong conceptual foundations, the book presents key topics such as ecosystems, biodiversity, natural resource management, environmental pollution, and sustainable development in a simple and accessible manner.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"422\" data-end=\"891\"\u003eThe content is thoughtfully organized to help readers grasp both theoretical concepts and their practical applications. It explores important environmental issues including climate change, global warming, ozone layer depletion, and resource conservation, along with discussions on environmental policies, legislation, and international agreements. Real-life examples and case studies further enhance understanding, making the subject relevant to present-day challenges.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"893\" data-end=\"1317\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eThe book also highlights the impact of human activities on the environment, covering areas such as population growth, disaster management, environmental movements, and ethical perspectives. With its balanced approach and student-friendly presentation, this book serves as a valuable resource for developing environmental awareness, critical thinking, and a sense of responsibility toward sustainable living and conservation.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52772039819583,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/EnvironmentStudies_AnilPatil_1.jpg?v=1776176673"},{"product_id":"environmental-studies-1","title":"Environmental Studies","description":"\u003cp data-start=\"0\" data-end=\"397\"\u003eThis comprehensive textbook on Environmental Studies presents a clear and systematic understanding of the relationship between humans and the environment. It introduces fundamental concepts such as ecosystems, biodiversity, natural resources, environmental pollution and sustainable development in a simple and structured manner, making it accessible to learners from diverse academic backgrounds.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"399\" data-end=\"874\"\u003eThe book covers a wide range of contemporary environmental issues including climate change, global warming, ozone layer depletion, acid rain and resource conservation. It also provides detailed insights into environmental policies, legislation and international agreements, helping readers understand both national and global efforts toward environmental protection. Real-life examples and case studies are thoughtfully included to connect theory with practical applications.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"876\" data-end=\"1312\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eIn addition, the book highlights the impact of human activities on the environment, addressing topics such as population growth, disaster management, environmental movements and ethical perspectives. With its balanced approach and easy-to-understand presentation, this book serves as a valuable resource for developing environmental awareness, critical thinking and a sense of responsibility towards conservation and sustainable living.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52772551655743,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/EnvironmentStudies_DrOnkarSalunkhe_1.jpg?v=1776177224"},{"product_id":"paryavaran-abhyas","title":"पर्यावरण अभ्यास","description":"\u003cp\u003eपर्यावरण हा सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार असून त्याचा ऱ्हास मानवजातीसमोरील गंभीर समस्या बनली आहे. वाढते प्रदूषण, जैवविविधतेला धोका, जागतिक तापमानवाढ, आणि मानवी कृतींमुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.या पुस्तकात पर्यावरणविषयक समस्या, कायदे, उपाययोजना, आणि पर्यावरण संवर्धनासाठीचे विविध दृष्टिकोन सविस्तरपणे मांडले आहेत. विद्याथ, शिक्षक, तसेच पर्यावरणप्रेमी यांना सध्याच्या परिस्थितीचे भान देऊन त्यांच्या भूमिका प्रभावी बनविण्याचा प्रयत्न यात केला आहे. पर्यावरण रक्षणासाठी सर्व स्तरांवर सजगता निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.\u003cbr\u003eशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक संवेदनशीलता निर्माण करून भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी योगदान द्यावे, हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52773065621823,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ParyavaranAbhyas_ProfAPChaudhari_1.jpg?v=1776177884"},{"product_id":"prakritik-bhugol","title":"प्राकृतिक भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभूगोल विषयातील मूलभूत संकल्पना, नकाशे व आकृत्यांच्या सहाय्याने सुलभपणे समजावून सांगणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांना अध्ययन व अध्यापन सोपे व्हावे या उद्देशाने तयार केले आहे. मृदावरण, विदारण, वातावरण, वारे, जलावरण अशा महत्त्वाच्या घटकांचा सखोल आढावा घेताना विषयाची गुंतागुंत दूर करून स्पष्टता साधली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखनात साधेपणा, सुसंगतता आणि शैक्षणिक दृष्टिकोन यांचा समन्वय साधला असून अभ्यासकांना स्पर्धा परीक्षा तसेच उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर उपयुक्त ठरेल अशी रचना केली आहे. नकाशे व आकृत्यांचा वापर करून विषय अधिक जिवंत व समजण्यास सोपा केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हे पुस्तक ज्ञानार्जनाची प्रक्रिया आनंददायी बनवते. अभ्यासकांना विषयाची गोडी लागावी, आत्मविश्वास वाढावा आणि शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52803107815743,"sku":null,"price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PrakritikBhugol_DrPankajShinde_1.jpg?v=1776434514"},{"product_id":"vasti-bhugol","title":"वस्ती भूगोल","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eवस्ती भूगोल\u003c\/strong\u003e हे पुस्तक ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या उत्पत्ती, उत्क्रांती आणि स्वरूपाचा सखोल अभ्यास सादर करते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत वस्त्यांचे विविध प्रकार, त्यांचे सांस्कृतिक व औद्योगिक महत्त्व, तसेच ग्रामीण-नागरी समस्यांचा विचार या पुस्तकात सुबोध भाषेत व सुबक आकृत्यांच्या सहाय्याने केला आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. वस्ती भूगोलाच्या अभ्यासातून खेडी व शहरे यांचा परस्पर संबंध स्पष्ट होतो आणि मानवी जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीचे दर्शन घडते. हे पुस्तक भूगोलाच्या अभ्यासकांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52805911052607,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/VastiBhugol_ProfDrNitinDeshmukh_1.jpg?v=1776494399"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/geography.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}