{"title":"Education (KBCNMU)","description":"","products":[{"product_id":"bhartiya-gyan-parampara","title":"भारतीय ज्ञान परंपरा","description":"\u003cp\u003eभारत हा केवळ एक सांस्कृतिक वारसा लाभलेला देश नाही, तर तो हजारो वर्षांची समृद्ध ज्ञानपरंपरा जपणारा देश आहे. “भारतीय ज्ञानपरंपरा” हे पुस्तक भारताच्या प्राचीन, वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक परंपरेचा सखोल अभ्यास सादर करते. वेद, उपनिषद, आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, शिक्षणपद्धती आणि तत्वज्ञान यांचे मूलभूत तत्त्वज्ञान या ग्रंथात प्रभावीपणे मांडले आहे.\u003cbr\u003eभारतीय ऋषीमुनींनी निर्माण केलेली ज्ञानसंस्कृती ही शतकानुशतके मानवजातीला दिशा देत आली आहे. गुरुकुल शिक्षणपद्धती, मौखिक परंपरा, गुरु-शिष्य संबंध, आणि तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला यांसारख्या विद्यापीठांची परंपरा हे भारताच्या शैक्षणिक वैभवाचे प्रतीक आहेत. वेदांमध्ये सामाजिक व्यवस्था, नैतिकता, विज्ञान, गणित आणि वैद्यकशास्त्र यांचे मूलभूत तत्त्वे अंतर्भूत आहेत. या पुस्तकात ज्ञान म्हणजे काय, त्याची व्याख्या, स्वरूप, शिक्षणपद्धती, ग्रंथांचे वगकरण आणि भारतीय ज्ञान परंपरेचा जागतिक प्रभाव यांचा अभ्यास सुसंगत आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्यात आला आहे. हे पुस्तक वाचकाला भारताच्या ज्ञानपरंपरेशी जोडते आणि आधुनिक शिक्षणाच्या संदर्भात त्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. भारतीय ज्ञान प्रणाली ही केवळ भूतकाळातील गौरवगाथा नसून, आजच्या शिक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी एक प्रकाशस्तंभ ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52712555381055,"sku":null,"price":536.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhartiyaGyanparampara_DrDipakBaviskar_1.jpg?v=1775742534"},{"product_id":"shikshanache-nave-parva-nep-2020","title":"शिक्षणाचे नवे पर्व (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020)","description":"\u003cp data-start=\"0\" data-end=\"441\"\u003eThis edited volume presents a comprehensive exploration of the transformative vision of the National Education Policy 2020, highlighting its role in redefining the educational landscape of India. It brings together diverse scholarly perspectives that examine the policy’s focus on holistic development, inclusivity, and the integration of modern technologies, offering readers a well-rounded understanding of contemporary educational reform.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"443\" data-end=\"945\"\u003eThe book covers a wide range of themes including culturally responsive pedagogy, digital education, skill-based learning, and inclusive practices. It also reflects on key areas such as evaluation reforms, teacher development, stakeholder participation, and the role of education in social transformation. Through critical analysis and practical insights, the chapters collectively emphasize the importance of student-centered learning, equity, and innovation in achieving the goals of modern education.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"947\" data-end=\"1361\" data-is-last-node=\"\" data-is-only-node=\"\"\u003eWith contributions from academicians and researchers, this volume captures the essence of NEP 2020 as a forward-looking framework aimed at fostering creativity, critical thinking, and lifelong learning. Written in an accessible and engaging style, the book serves as a valuable resource for educators, policymakers, and learners who seek to understand and contribute to the evolving educational ecosystem in India.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52712606007615,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ShikshanacheNaveParva_DrDipakBaviskar_1.jpg?v=1775744582"},{"product_id":"margdarshan-samupdeshan-aani-samaveshak-shikshan","title":"मार्गदर्शन समुपदेशन आणि समावेशक शिक्षण","description":"\u003cp\u003eमार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण हे पुस्तक आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आजच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. शाळेत येणारा प्रत्येक विद्याथ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो. त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक स्थिती वेगळी असते. या विविधतेचा विचार करून शिक्षकाने अध्यापन करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकाला मार्गदर्शन व समुपदेशनाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची संकल्पना, उद्दिष्टे व प्रक्रिया, शालेय मार्गदर्शन समितीची भूमिका व कार्य, समुपदेशनाचे प्रकार, तत्वे व प्रक्रिया, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व सामाजिक फायदे, शिक्षकाची सज्जता, जबाबदाऱ्या व व्यावसायिक नीती, विविध गरजा असणाऱ्या बालकांचे शैक्षणिक व सामाजिक प्रश्न तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या बालकांच्या समस्या व उपाययोजना यांचा सखोल विचार केलेला आहे.\u003cbr\u003eलेखकांनी या सर्व पैलूंचा सुसंगत व सर्वसमावेशक आढावा घेतला असून हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715405115711,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/15_MargdarshanSamupdeshanAaniSamaveshakShikshan_DrDipakBaviskar1.jpg?v=1775801317"},{"product_id":"shaley-shkshanatil-mulyanirdharan-aani-mulyamapan","title":"शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन","description":"\u003cp\u003eशालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन हे पुस्तक आधुनिक शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे. समाजाच्या बदलत्या मागण्या आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील सतत होणाऱ्या सुधारणा लक्षात घेऊन या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी समाविष्ट केलेल्या या विषयाचा उद्देश शिक्षक प्रशिक्षणाथ आणि प्राध्यापकांना योग्य दिशा देणे हा आहे.\u003cbr\u003eया ग्रंथात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन संबंधी दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे व साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन व अंमलबजावणी, तसेच मूल्यमापनातील सुधारणा यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे मुद्देसुद स्वरूपात, साध्या आणि सरळ भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.\u003cbr\u003eलेखकांनी विविध संदर्भग्रंथ, नियतकालिके, संशोधन लेख आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत अद्ययावत व सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मापन, मूल्यनिर्धारणाची उपयुक्तता, विविध चाचण्यांचे स्वरूप, तसेच सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची गरज याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळते.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन या प्रक्रियांचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715407049023,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/16_ShaleyShkshanatilMulyanirdharan_DrDipakBaviskar1.jpg?v=1775801621"},{"product_id":"chhatrasevakal","title":"छात्रसेवाकाल","description":"\u003cp\u003eछात्रसेवाकाल हा बी.एड. अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून शिक्षक प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. या कालावधीत प्रशिक्षणाथ शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करून शिक्षणाच्या विविध पैलूंशी परिचित होतात. शाळेतील कार्यपद्धती, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या गरजा, उपक्रम, मूल्यांकन प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाज यांचा अनुभव घेऊन ते अध्यापन व्यवसायातील वास्तवाशी जवळून जोडले जातात.\u003cbr\u003eया ग्रंथात छात्रसेवाकालाची संकल्पना, उद्दिष्टे, नियोजन व अंमलबजावणी, शाळेची वैशिष्ट्ये, शाळा व समाजातील परस्पर आंतरक्रिया, मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका, अध्यापन व्यवसायाचे स्वरूप व त्यातील समस्या, शिक्षक-विद्याथ संबंध, पालक-शिक्षक संबंध तसेच शैक्षणिक संशोधनाची गरज व महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे साध्या, सरळ आणि मुद्देसूद भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी छात्रसेवाकाल हा घटक किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715409506623,"sku":null,"price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/17_Chhatrasevakal_DrDipakBaviskar1.jpg?v=1775802048"},{"product_id":"ganit-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"गणित : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eगणित अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक बी.एड. द्वितीय वर्षातील गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित असून शिक्षक प्रशिक्षणाथ, विद्याथ आणि संशोधकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरते. या ग्रंथाचा मुख्य उद्देश म्हणजे गणित विषयाची भीती दूर करून नवनवीन संज्ञा, संकल्पना, अध्यापन पद्धती, तंत्रे व उपागम यांचे सखोल स्पष्टीकरण देत शिक्षकाची अध्यापनदृष्टी विकसित करणे.\u003cbr\u003eया पुस्तकात माध्यमिक स्तरावरील गणिताचा अभ्यासक्रम, अध्यापनाचे उपागम व प्रतिमाने, अध्ययन संसाधने व आयसीटीचा वापर, सर्वांसाठी गणित शिक्षण, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन, शिक्षकाचा व्यावसायिक विकास तसेच अंकगणित, बीजगणित व भूमितीचा मूलभूत आशय यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सक्रिय अध्ययन, ज्ञानरचनावादी उपागम, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती आणि प्रश्नोत्तर तंत्र यांचा शैक्षणिक उपयोग स्पष्ट करून गणितातील संकल्पना दृढ करण्यावर विशेष भर दिला आहे.\u003cbr\u003eयाशिवाय पुस्तकात गणित अध्यापनासाठी आवश्यक असलेली विविध संसाधने, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्याथकेंद्रित अध्यापनाची गरज आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाचे महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. उजळणी, सराव, पर्यवेक्षित अभ्यास तंत्र तसेच मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा कशी साधता येईल याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्याथ, शिक्षक, संशोधक आणि मार्गदर्शकांसाठी उपयुक्त ठरेल. गणित अध्यापन अधिक सुलभ, परीक्षाभिमुख आणि विद्याथ-केंद्रित करण्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी साधन ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715416125759,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/18_Ganit-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775802278"},{"product_id":"vidnyan-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"विज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eविज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक आधुनिक शालेय शिक्षणातील विज्ञान विषयाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक सर्वसमावेशक ग्रंथ आहे. विज्ञान शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारशक्ती, निरीक्षण कौशल्य, प्रयोगशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. या दृष्टीने विज्ञान अभ्यासक्रमाची रचना व अध्यापनशास्त्रीय मांडणी प्रभावी असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.\u003cbr\u003eया ग्रंथात विज्ञान अध्यापनाच्या विविध पद्धती, प्रयोगशाळा तंत्र, क्षेत्रभेटी, स्वयंशोधन पद्धती, तसेच अध्यापन प्रतिमानांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (खउढ) वापर, प्रात्यक्षिके, घटक चाचण्या, नैदानिक चाचण्या आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यांचा विज्ञान शिक्षणातील उपयोग स्पष्ट करण्यात आला आहे. याशिवाय विज्ञान शिक्षकाची भूमिका, व्यावसायिक विकास, पर्यावरण जागृती आणि शाश्वत विकासातील योगदान यांचा विचार केला आहे.\u003cbr\u003eपुस्तकात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूविज्ञान यांचा मूलभूत आशय सोप्या भाषेत मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन नियोजन, पाठयोजना तयार करणे, अध्यापन कौशल्ये विकसित करणे, साधनसामग्रीचा योग्य वापर करणे आणि आधुनिक मूल्यमापन पद्धती समजून घेणे यासाठी हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणार्थींना विशेषतः उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715433820479,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/20_Vidnyan-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775803705"},{"product_id":"bhugol-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"भूगोल : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे शैक्षणिक पाठ्यपुस्तक भूगोल विषयाच्या अध्यापनशास्त्राचा सखोल अभ्यास घडवते. नियोजन, मूल्यमापन, अध्यापनाच्या पद्धती, प्रतिमाने, रचनावाद, फिप्ड क्लासरूम यांसारख्या आधुनिक अध्यापन संकल्पना विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात.\u003cbr\u003eया पुस्तकात भूगोल शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये, व्यावसायिक विकासाची गरज, सेवांतर्गत प्रशिक्षण, तसेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर यांवर विशेष भर दिला आहे. हवामानशास्त्र, प्रादेशिक भूगोल, मानवी भूगोल, ऊर्जा साधने, जलसंपत्ती, पर्यावरणीय समस्या अशा विविध संकल्पनांचा सखोल ऊहापोह करून विद्यार्थ्यांना विषयाची व्यापक समज दिली जाते.\u003cbr\u003eशिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाशी सुसंगत अशा या ग्रंथात क्षेत्रभेट, सर्वेक्षण, अहवाल लेखन, ई-स्त्रोतांचा वापर यांसारख्या अध्ययन-अध्यापनाच्या साधनांचा सविस्तर आढावा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते आणि अध्यापन अधिक परिणामकारक होते.\u003cbr\u003eभूगोल विषयातील सामाजिक समस्या जसे की पर्यावरण ऱ्हास, लोकसंख्या विस्फोट, नागरीकरण, जंगलतोड यांचा विचार करून शैक्षणिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामुळे हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारे ठरते.\u003cbr\u003eलेखकांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव आणि शास्त्रशुद्ध मांडणी यामुळे हे पुस्तक शिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्याथ, प्रशिक्षणाथ शिक्षक, संशोधक आणि अभ्यासक यांच्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715451547967,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/19_Bhugol-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775805031"},{"product_id":"dnyan-ani-abhyaskram_sarwade","title":"ज्ञान आणि अभ्यासक्रम","description":"\u003cp\u003e‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’च्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला ‘ज्ञान आणि अभ्यासक्रम’ हा ग्रंथ शिक्षक घडविणाऱ्या बी.एड् अभ्यासक्रमातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शिक्षणाचा उद्देश, मूल्ये, प्रक्रिया व शैक्षणिक तत्त्वज्ञान यांचे सखोल विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. अभ्यासक्रम म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक दस्तऐवज आहे, ही संकल्पना यामध्ये समजावून सांगितली आहे. बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमातील परिवर्तन, मूल्याधिष्ठित शिक्षण, मातृभाषेतील अध्यापन, समावेशकता, आणि नव्या शैक्षणिक दृष्टिकोनांवर भर दिला आहे.\u003cbr\u003eराष्ट्रीय धोरणानुसार आवश्यक असलेल्या 21व्या शतकातील कौशल्ये, नैतिक मूल्ये, नवाचार, आणि समजूतदारपणाचा अभ्यासही यात आहे. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांवर न राहता, अभ्यासक्रमाच्या रचनेतील दृष्टीकोन समजून घेणे किती आवश्यक आहे, हे पुस्तक अधोरेखित करते. यामध्ये अभ्यासक्रम विकास, संकलन प्रक्रिया, धोरण निर्मिती आणि शिक्षणातील परिवर्तनशीलतेचे मांडलेले विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. शैक्षणिक जगतातील अभ्यासक, विद्यार्थी व भावी शिक्षकांसाठी हे पुस्तक एक मार्गदर्शक ठरेल. समकालीन शैक्षणिक विचार व धोरणांच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे बहुआयामी भान देणारा हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715697733951,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/DnyanAniAbhyaskram_Sarwade_1.jpg?v=1775815061"},{"product_id":"dnyan-aani-abhyasakram_dr-nagesh-d-sarvade","title":"ज्ञान आणि अभ्यासक्रम","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा सखोल अभ्यास करणारा हा संदर्भग्रंथ विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संशोधकांना उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर शिक्षणातील बदल, अभ्यासक्रमाची पुनर्रचना, ज्ञानाचे स्वरूप आणि त्याचे संप्रेषण यांचा स्पष्ट व सुसंगत आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे. ज्ञानाचे स्वरूप, प्रकार आणि निर्मिती प्रक्रिया, अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, तत्त्वे, घटक, नियोजन व अंमलबजावणी यांचा सखोल अभ्यास, सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक व तांत्रिक घटकांचा प्रभाव, भाषा संपादन, वर्गातील भाषा आणि बहुभाषिक शिक्षणातील आव्हाने व उपाययोजना यांचा समावेश या ग्रंथात आहे. सोपी, स्पष्ट आणि विद्यार्थ्याभिमुख भाषा ही या ग्रंथाची वैशिष्ट्ये असून वाचकांना शैक्षणिक यशाबरोबरच विचारशील व जबाबदार नागरिकत्वाकडे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य यात आहे.\u003cbr\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाची व्याप्ती सतत बदलत आहे. अशा परिस्थितीत हा ग्रंथ वाचकांना शिक्षणाच्या व्यापक संदर्भाचे आकलन करून देतो आणि त्यांना नव्या शैक्षणिक प्रवाहाशी सुसंगत राहण्यास मदत करतो. वाचकांच्या सूचनांचे स्वागत करून पुढील आवृत्त्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52722755764543,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Dnyan_Aani_Abhyasakram_Dr_Nagesh_D_Sarvade_1.jpg?v=1776089249"},{"product_id":"shikshanatil-navpravah-v-navpravah-nep-2020","title":"शिक्षणातील नवसंकल्पना व नवप्रवाह  (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सह)","description":"\u003cp\u003eशिक्षणातील नवसंकल्पना व नवप्रवाह या पुस्तकात लेखक डॉ. ह. ना. जगताप यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलांचा परामर्श घेत प्रस्तुत ग्रंथाची मांडणी केली आहे. 25 वर्षांपूव त्यांनी ‘शिक्षणातील नवप्रवाह व नवप्रवर्तने’ हा ग्रंथ लिहिला होता आणि 2017 मध्ये डॉ. नागनाथ येवले व डॉ. तुषार साळुंखे यांच्यासोबत ‘शिक्षणातील नवप्रवाह’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता.\u003cbr\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि कोविड-19 नंतरच्या बदलत्या परिस्थितीमुळे शिक्षणात झालेल्या मूलगामी परिवर्तनांचा अभ्यास या ग्रंथात मांडलेला आहे.\u003cbr\u003eया ग्रंथात पाच अभ्यासपूर्ण भाग समाविष्ट आहेत. डॉ. युवराज पवार यांनी तंत्रज्ञान, मूल्यमापन व शैक्षणिक सुधारणा यांचे विश्लेषण केले आहे. डॉ. अनिल पाटील यांनी स्वयं, चजजउ, दीक्षा आणि ऑनलाइन शिक्षणाच्या प्रभावीतेवर प्रकाश टाकला आहे. तिसऱ्या भागात डॉ. जगताप यांनी मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाच्या विविध पैलूंवर सविस्तर विवेचन केले आहे. चौथ्या व पाचव्या भागात डॉ. मोरे व डॉ. येवले यांनी नवसंकल्पना, शैक्षणिक योजना व राष्ट्रीय धोरणाच्या अंमलबजावणीचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.\u003cbr\u003eग्रंथात सैद्धांतिक दृष्टिकोनाबरोबरच व्यवहार्य उपक्रम, संकल्पना आणि सर्जनशील विचार समाविष्ट आहेत. विद्याथ केंद्रित शिक्षण, शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण व मूल्याधिष्ठित दृष्टिकोन यावर भर देण्यात आलेला आहे. \u003cbr\u003eशेवटच्या प्रकरणात डॉ. जगताप यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा थोडक्यात परामर्श घेतलेला आहे. हा ग्रंथ केवळ बी.एड., एम.एड., पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथ आणि सर्व शिक्षणप्रेमींसाठी उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792908611903,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ShikshanatilNavpravah_JagtapSir_1.jpg?v=1776326649"},{"product_id":"balakacha-vikas-shaikshanik-manasshatra","title":"बालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eबालकाचा विकास व शैक्षणिक मानसशास्त्र हा ग्रंथ खढएझ अभ्यासक्रमानुसार तयार केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक घडविण्याच्या उद्देशाने तयार केलेल्या या पुस्तकात बालकाच्या सर्वांगीण विकासाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. बालकाच्या विकासाच्या विविध टप्प्यांपासून ते शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासापर्यंतच्या सर्व घटकांचे बारकाईने विश्लेषण या ग्रंथात केले आहे. याशिवाय अध्ययन प्रक्रियेशी संबंधित वर्तनवाद, ज्ञानवाद, समष्टिवाद व रचनावाद यांसारख्या विचारसरणींचे विवेचन, अध्ययनातील माहिती प्रक्रियाकरणाचे प्रतिमान, समस्यानिराकरणासाठीचे उपाय, शोध अध्ययन तसेच श्री अरविंदो यांचा एकात्मिक उपागम अशा अनेक पैलूंवर सविस्तर चर्चा केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसंबंधी सिद्धांत, प्रेरणा देण्याच्या विविध कार्यनीती, वर्गव्यवस्थापनाची शास्त्रीय मांडणी, समूहगतिशीलता तसेच समाजमितीचा उपयोग यामुळे हे पुस्तक अधिकाधिक उपयुक्त ठरते.\u003cbr\u003eसोप्या व सुबोध भाषेत लिहिलेले हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षणाथ आणि शिक्षणशास्त्रातील संशोधक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. खढएझ अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टपूतसाठी हे पुस्तक निश्चितच प्रभावी ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792949113151,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BalakachaVikas_ShaikshanikManasshatra_DrHNJagtap_1.jpg?v=1776328255"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/education-kbcnmu.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}