{"title":"अर्थशास्त्र","description":"","products":[{"product_id":"banking-aani-vitta","title":"बँकिंग आणि वित्त","description":"\u003cp\u003eविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि अभ्यासक्रमातील बदल लक्षात घेऊन हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाशी सुसंगत राहून द्वितीय वर्ष कला शाखेसाठी “बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा“ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. \u003cbr\u003eया पुस्तकात भारतीय बँकिंग प्रणालीचा परिचय, बँकांची कार्ये व उद्दिष्टे, व्यापारी व सहकारी बँकांची भूमिका, लघु वित्त व पेमेंट बँकांची कार्ये, रिझर्व्ह बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी व धोरणात्मक कार्ये, तसेच भारतातील वित्तीय संस्थांची रचना व कार्ये यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सोप्या भाषेत, स्पष्ट मांडणीसह आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून तयार केलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी, संकल्पनांची समज आणि व्यावहारिक ज्ञान मिळविण्यास उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003eहे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील मूलभूत संकल्पना समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक वित्तीय प्रणालीतील बदल समजून घेता येतील आणि भविष्यातील करिअर संधींसाठी भक्कम पाया तयार होईल. तसेच, बँकिंग क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय आणि वित्तीय संस्थांची भूमिका यांचा व्यापक दृष्टिकोन मिळविण्यास हे पुस्तक सहाय्यभूत ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52689794072895,"sku":null,"price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Banking_ani_Vitta_Dr_Surekha_Bhingardive_1.jpg?v=1775312973"},{"product_id":"share-bajarachi-olkha","title":"शेअर बाजाराची ओळख","description":"\u003cp\u003eआपल्या देशाच्या आर्थिक विकासात गुंतवणुकीला मोठे महत्त्व आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी शेअर बाजार हा सर्वात महत्त्वाचा आणि लोकप्रिय पर्याय मानला जातो. यात काही प्रमाणात जोखीम असली तरी योग्य माहिती आणि समज असलेला गुंतवणूकदार नक्कीच चांगला फायदा मिळवू शकतो. त्यामुळेच शेअर बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शेअर बाजाराशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. भारतीय शेअर बाजाराचा इतिहास, प्राथमिक व दुय्यम बाजार, बीएसई व एनएसईची माहिती, सेबीची भूमिका, निर्देशांक, डिमॅट खाते, आयपीओ-एनएफओ-एफपीओ, म्युच्युअल फंड, डखझ व डथझ अशा अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना तसेच सर्वसामान्य वाचकांना समजतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत.\u003cbr\u003eहे पुस्तक सर्व विद्यापीठांसाठी लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (छएझ-2020) नुसार सुधारित अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल. याचबरोबर शेअर बाजारात नवीन गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठीही हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.\u003cbr\u003eआजच्या काळात शेअर बाजाराचे ज्ञान केवळ अभ्यासापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि गुंतवणुकीच्या योग्य संधी शोधण्यासाठी ते अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातही उपयुक्त ठरेल, हा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52690567692607,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ShareBajarachiOlkha_DrMaharudraKhose-Copy_1.jpg?v=1775311844"},{"product_id":"vittiya-sarksharta","title":"वित्तीय साक्षरता","description":"\u003cp\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात वित्तीय साक्षरता ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक जीवनकौशल्य बनले आहे. पैशाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, बचत व गुंतवणुकीचे तंत्र कसे आत्मसात करावे, डिजिटल युगात सुरक्षित व्यवहार कसे करावे यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक ठरते. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत घटक असून त्याचा योग्य वापर, नियोजन आणि व्यवस्थापन न झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वित्तीय साक्षरता म्हणजे फक्त आर्थिक व्यवहारांची माहिती नव्हे तर उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, विमा, कर्ज व्यवस्थापन आणि निवृत्ती नियोजन यांचा अभ्यास होय.\u003cbr\u003eया पुस्तकाद्वारे वाचकांना वित्तीय साक्षरतेचा अर्थ, बँक खात्यांचे प्रकार, बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, लघुवित्तीय संस्था, डिजिटल फायनान्स, गुंतवणूक, कर्जाचे प्रकार, बचत-गुंतवणुकीतील जोखीम आणि जोखमीचे व्यवस्थापन, विमा, पेन्शन इत्यादींची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिलेली आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक सर्व विद्यापीठांसाठी लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP-2020) नुसार सुधारित अभ्यासक्रमांशी सुसंगत आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषयाचे विद्याथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्याथ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003eआधुनिक काळात वित्तीय साक्षरतेचे ज्ञान अभ्यासापुरतेच मर्यादित राहिलेले नाही तर व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीसाठी व गुंतवणुकीसाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासक्रमाबरोबर प्रत्यक्ष आयुष्यातही उपयोगी ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52690971427135,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/VittiyaSaksharta_DrSurekhaBhingardive-Copy_1.jpg?v=1775312186"},{"product_id":"bharatiya-arthavyavastha-1991-pasun-ii","title":"भारतीय अर्थव्यवस्था 1991 पासून (भाग 2)","description":"\u003cp\u003e1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, कोट्यवधी नागरिकांच्या आकांक्षा, संघर्ष आणि संधींचा इतिहास आहे. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाच्या त्रिसूत्रीपासून ते डिजिटल इंडिया, णझख आणि स्टार्टअप क्रांतीपर्यंतचा प्रवास हा धोरणात्मक धाडस आणि सामाजिक परिवर्तनाचा आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शेती, उद्योग, बँकिंग, डिजिटल क्रांती, स्टार्टअप संस्कृती आणि जागतिक स्तरावरील भारताची भूमिका यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आर्थिक धोरणांचा थेट परिणाम शेतकरी, कामगार, उद्योजक, विद्याथ आणि मध्यमवगय कुटुंबांच्या जीवनावर कसा होतो, याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण येथे आहे.\u003cbr\u003eभारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना बेरोजगारी, विषमता आणि कौशल्य विकास यांसारखी आव्हानेही समोर आहेत. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा, क्षमता आणि भविष्यातील शक्यता समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरतो.\u003cbr\u003eभारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा केवळ आकडेवारीचा किंवा धोरणांचा अभ्यास नाही, तर तो सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. या पुस्तकात आर्थिक सुधारणा आणि डिजिटल क्रांतीने शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक संरचनेवर केलेल्या परिणामांचा सखोल वेध घेतला आहे.\u003cbr\u003eयाचबरोबर, भारताच्या जागतिक भूमिकेतील बदल, विकसनशील देशांचा आवाज म्हणून उभे राहणे आणि आर्थिक राजनयातून निर्माण झालेल्या संधी यांचा चिकित्सक आढावा येथे आहे. त्यामुळे हे पुस्तक भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचा संगम साधत, भारतीय अर्थव्यवस्थेचे सर्वांगीण चित्र वाचकांसमोर ठेवतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698687406399,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bharatiya_Arthavyavastha_1991_Pasun_-_II_Dr_Shubhangi_Pingale_1.jpg?v=1775383535"},{"product_id":"कृषी-आधारित-उद्योग-आणि-खानदेश","title":"कृषी आधारित उद्योग आणि खानदेश","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eकृषी आधारित उद्योग आणि खानदेश\u003c\/strong\u003e हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020नुसार तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रमाशी सुसंगत असून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना उपयुक्त ठरेल. कृषी आधारित उद्योगांचा परिचय, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, औद्योगिक विकासात शेतीची भूमिका आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्यांचे महत्त्व यांचे सुलभ विवेचन या पुस्तकात केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eखानदेश प्रदेशातील विविध कृषी उद्योग—केळी प्रक्रिया, दाल मिल, पीठ गिरण्या, फळ प्रक्रिया, डेअरी उद्योग, मसाले उत्पादन, पशुखाद्य, शीतगृह सेवा, कृषी पर्यटन आणि कृषी सेवा केंद्र—यांचा सविस्तर आढावा येथे दिला आहे. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक टप्पे, व्यवसाय मॉडेल्स, परवाना-नोंदणी, बौद्धिक संपदा यांची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसरकारी सहाय्य व प्रोत्साहन योजनांमध्ये मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, नाबार्ड व इतर संस्थांची भूमिका यांचा समावेश करून पुस्तक अधिक व्यवहार्य बनवले आहे. भविष्यातील संधी, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर, हवामान अनुकूल उद्योग, नवकल्पना व संशोधन, तसेच खानदेशातील यशस्वी उद्योजकांचे केस स्टडीज यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक कृषी उद्योगांच्या सामाजिक-आर्थिक परिणामांची जाणीव करून देत ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शाश्वततेच्या दिशेने मार्गदर्शन करते. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि उद्योजकांना कृषी आधारित उद्योगांचे स्वरूप, प्रक्रिया आणि संधी समजून घेण्यासाठी हे ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698688880959,"sku":null,"price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Krishi_Aadharit_Udyog_2nd_Edition__Dr_Pratibha_Kalmegha_1.jpg?v=1775383568"},{"product_id":"pragat-samgralakshi-arthashastra","title":"प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eप्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हा ग्रंथ विद्यार्थ्यांना समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना तसेच आधुनिक सिद्धांतांची सखोल समज देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. विषयाची मांडणी शैक्षणिक दृष्टिकोनातून काटेकोरपणे करण्यात आली असून, संकल्पनांची स्पष्टता आणि भाषेची सुलभता यावर विशेष भर दिला आहे.\u003cbr\u003eया ग्रंथामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे लेखांकन, उपभोग व गुंतवणूक फलन, पैशाची मागणी व पुरवठा, उत्पन्न व रोजगाराचे सिद्धांत, व्यापारचक्र व चलनवाढ यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकरणांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणात संकल्पना, सिद्धांत, त्यांचे परिणाम आणि मर्यादा यांचे विवेचन केले असून, आवश्यक तेथे आकृती, तक्ते आणि उदाहरणांचा वापर करून विषय अधिक स्पष्ट करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रमाशी सुसंगतता राखून विद्यार्थ्यांना विषय सहजपणे आत्मसात करता यावा यासाठी केलेली मांडणी. संकल्पनांचा मूळ अर्थ अबाधित ठेवून त्यांचे सुलभ स्पष्टीकरण दिल्यामुळे विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या आर्थिक प्रक्रियांची समज सुलभ होते.\u003cbr\u003eस्पर्धा परीक्षा, छएढ-डएढ सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा ग्रंथ उपयुक्त ठरतो. अभ्यासक्रमातील संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगण्याबरोबरच, विविध सिद्धांतांचे व्यावहारिक उपयोग आणि परिणाम यांचे विवेचन केले आहे.  प्रगत समग्रलक्षी अर्थशास्त्र हा ग्रंथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावहारिक दृष्टिकोनातून सक्षम बनवणारा, अभ्यासक्रमाशी सुसंगत आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52698692583743,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PragatSamgralakshiArthashastra_ProfSunilAdakmol_1.jpg?v=1775383699"},{"product_id":"digital-arthavyavastha","title":"डिजिटल अर्थव्यवस्था","description":"\u003cp\u003eसध्या आपण तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात जगत आहोत. पारंपरिक अर्थव्यवस्थेच्या जागी आता ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजेच डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. इंटरनेट, मोबाइल, कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), ब्लॉकचेन, आणि क्लाऊड संगणक यांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार आता अधिक जलद, पारदर्शक आणि सोपे झाले आहेत. 2015 मध्ये सुरू झालेल्या ‘डिजिटल इंडिया’ या अभियानामुळे भारतात डिजिटल बदलाची मजबूत सुरूवात झाली. णझख, इकखच ॲप, आधार कार्ड लिंक करणे, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन शिक्षण आणि बँकिंग या गोष्टींमुळे लोकांचे दैनंदिन व्यवहार खूप सोपे झाले आहेत. या पुस्तकामध्ये ‘डिजिटल इकॉनॉमी’ म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजावले आहे. पुस्तकात चार भाग आहेत- डिजिटल बँकिंग, डिजिटल पैसे (चलन), तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सरकारी योजना. पुस्तकात सोपी भाषा वापरली आहे, हे पुस्तक विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांनाही उपयुक्त आहे. हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर आपल्याला डिजिटल युगात आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्ग दाखवते. सायबर सुरक्षेची, डिजिटल साक्षरतेची आणि नागरिकांच्या सहभागाची जाणीव करून देते. भारत विकसित होण्यासाठी ही डिजिटल क्रांती खूप महत्त्वाची ठरणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52771685466431,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/DigitalArthavyavastha_CANarendraNerpagar_1.jpg?v=1776176089"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/economics.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}