{"title":"सरंक्षणशास्त्र","description":"","products":[{"product_id":"bharatasamoril-antargat-surksheche-dhoke","title":"भारतीय अंतर्गत सुरक्षेचे धोके","description":"\u003cp\u003eभारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून ‘विविधतेत एकता’ हीच त्याची खरी ओळख आहे. परंतु धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक व सामाजिक विविधतेसोबतच अंतर्गत सुरक्षेच्या अनेक गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत.\u003cbr\u003eया पुस्तकात सुरक्षेची व्याख्या, स्वरूप आणि महत्त्व स्पष्ट करून भारताच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हानांचा सखोल ऊहापोह करण्यात आला आहे. माओवादी चळवळ, प्रादेशिकता, दहशतवाद, भ्रष्टाचार, पर्यावरणीय संकटे आणि सामाजिक प्रश्न जसे की गरीबी, अशिक्षितता, लैंगिक असमानता व स्त्रियांवरील हिंसाचार यांचे सुरक्षा व्यवस्थेवरील परिणाम विवेचित केले आहेत.\u003cbr\u003eयाशिवाय दहशतवादाशी संबंधित संघटना व कार्यपद्धती, तसेच भारताने अवलंबिलेल्या कायदेशीर उपाययोजना - राष्ट्रीय सुरक्षा कायदा (छडअ), णअझअ, छखअ यांचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52700816277823,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/5_BharatasamorilAntargatSurkshecheDhoke_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775465400"},{"product_id":"bhu-samarniti","title":"भू-समरनीती","description":"\u003cp\u003eभौगोलिक घटकांचा मानवी जीवनावर, जनजीवनावर तसेच संरक्षण आणि युद्धाच्या पद्धतींवर प्रचंड प्रभाव पडतो. पर्यावरण, भूगोल आणि राजकारण यांचा परस्पर संबंध सुरक्षा धोरण निश्चित करतो. म्हणूनच भूराजनीती व भूसमरनीतीचा अभ्यास आज अत्यावश्यक ठरतो. या पुस्तकात भूसमरनीतीचा उगम, विकास आणि आजच्या आंतरराष्ट्रीय संदर्भातील उपयुक्तता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. प्राचीन काळापासून अरिस्टॉटल, रॅटझेल, क्लाऊत्झेविज, ॲडमिरल महान, मेकिन्डर यांसारख्या विचारवंतांनी मांडलेल्या संकल्पनांचा आढावा घेतला असून पहिल्या महायुद्धानंतर भूसमरनीती कशी स्वतंत्र शास्त्र म्हणून विकसित झाली हे स्पष्ट केले आहे. जमिनीचा भूगोल युद्धाची दिशा व रणनिती निश्चित करतो, या गृहितकावर आधारित भूसमरनीतीचे विविध पैलू उलगडले आहेत. रणनिती, डावपेच आणि महासमरनीतीची तत्त्वे, त्यांचा ऐतिहासिक संदर्भ आणि आधुनिक काळातील महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.\u003cbr\u003eभूसामरिक खनिजसंपत्ती राष्ट्राच्या आर्थिक विकासात व लष्करी तयारीत किती मोलाची भूमिका बजावते, याचे सविस्तर विश्लेषण येथे केलेले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम आशियाचे भूसामरिक महत्त्व, भारतातील अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि जम्मू-काश्मीर यांचे सुरक्षेसाठी असलेले योगदान तसेच अफगाणिस्तानाचे भूराजकीय महत्त्व या संदर्भात सखोल विवेचन केले आहे. भूसमरनीती हा विषय बहुपैलू व आंतरविद्याशाखीय आहे. भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, पर्यावरण या सर्व विषयांचा संगम यात दिसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना, संशोधकांना, स्पर्धा परीक्षार्थींना तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण वा संरक्षणशास्त्राची आवड असलेल्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52700823355711,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/4_Bhu-Samarniti_DrDevendraVispute_1_93190184-a05e-493e-82a7-83f624a0b17e.jpg?v=1775465912"},{"product_id":"cyber-surkshechi-multatve","title":"सायबर सुरक्षेची मूलतत्वे","description":"\u003cp\u003eआजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे, आणि त्यासोबतच सायबर सुरक्षेचे आव्हानही अधिक गंभीर बनले आहे. वैयक्तिक माहितीपासून ते राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत, सायबर हल्ल्यांचा धोका सर्वच स्तरांवर वाढत आहे. सायबर गुन्हेगारी, घुसखोरी, माहिती चोरी आणि डिजिटल यंत्रणांचा गैरवापर यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि संस्था सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.\u003cbr\u003e‘सायबर सुरक्षेची मूलतत्त्वे’ हे पुस्तक सायबर सुरक्षेच्या वैयक्तिक, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील पैलूंवर सखोल प्रकाश टाकते. माहिती तंत्रज्ञानातील संज्ञा, प्रणाली, नेटवर्क सुरक्षा, घुसखोरी प्रतिबंध, आपत्ती पुनर्प्राप्ती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या घटकांचे सुलभ आणि समर्पक विवेचन यात करण्यात आले आहे.\u003cbr\u003eविद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि सामान्य वाचकांसाठी हे पुस्तक सायबर सुरक्षेच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. डिजिटल युगात सुरक्षिततेचा मूलमंत्र म्हणजे जागरूकता, सावधगिरी आणि योग्य तांत्रिक ज्ञान. हे पुस्तक त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701350068543,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/CyberSurkshechiMultatve_DrDevendraVispute_1.jpg?v=1775476590"},{"product_id":"agni-surksha-v-vyavasthapan","title":"अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन","description":"\u003cp\u003e‘अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन’ हे पुस्तक आधुनिक काळातील महत्त्वाच्या विषयावर शास्त्रशुद्ध आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करते. निवासी क्षेत्र, कार्यालयीन वातावरण किंवा औद्योगिक ठिकाणी उद्भवणाऱ्या आगीपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, उपकरणांचा वापर आणि तातडीच्या परिस्थितीत घेण्याची पावले यांचे सविस्तर वर्णन यात केले आहे. अग्निसुरक्षेची व्याख्या, महत्त्व, आगीची कारणे व प्रकार, अग्नी त्रिकोण यांसारख्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्यानंतर अग्निशमन यंत्रे, अग्नी ओळख प्रणाली, क्षेत्रीय कवायत, स्प्रिंकलर्स, होजपाईप्स आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे यांचा सखोल अभ्यास पुस्तकात दिला आहे. \u003cbr\u003eहे पुस्तक चझडउ, णॠउ-छएढ, डएढ तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असून अग्निसुरक्षा क्षेत्रात कार्यरत अधिकारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठीही व्यवहार्य मार्गदर्शक ठरेल. सुबोध भाषा, अद्ययावत माहिती आणि व्यावहारिक दृष्टिकोनामुळे हे पुस्तक अभ्यासकांना अग्नि सुरक्षा व व्यवस्थापन या विषयाचे सर्वांगीण ज्ञान मिळवून देईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701353476415,"sku":null,"price":77.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AgniSurkshaVVyavasthapan_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775476917"},{"product_id":"rashtriya-surksheche-sankalpanatmak-pailu","title":"राष्ट्रीय सुरक्षेचे संकल्पनात्मक पैलू","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकात राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अधिक व्यापक, गतिमान आणि बहुआयामी झाली आहे. सुरक्षेच्या पारंपरिक लष्करी पैलूंसोबतच आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि पर्यावरणीय पैलूदेखील आता राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग झाले आहेत.\u003cbr\u003eआजच्या गुंतागुंतीच्या आणि वेगवान काळात दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, मादक पदार्थ व शस्त्रांची तस्करी, सायबर सुरक्षा, स्थलांतरित व निर्वासितांचे प्रश्न, पर्यावरणीय असंतुलन आणि नैसर्गिक आपत्ती या सर्व बाबींनी राष्ट्रीय सुरक्षेला नवे स्वरूप दिले आहे. राष्ट्रशक्तीची घडण भूगोल, नैसर्गिक संसाधने, औद्योगिक क्षमता, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक व व्यापारी सामर्थ्य, तसेच सामाजिक व राजकीय घटकांवर अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात “राष्ट्रहित” हाच प्रत्येक देशाचा सर्वोच्च ध्येय मानला जातो, कारण हितसंबंध बदलत नसतात; बदलतात ती फक्त परिस्थिती आणि नाती. आज राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पना अधिक संवेदनशील बनल्या असून प्रादेशिक व जागतिक अस्थिरतेमुळे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या संकल्पनात्मक पैलूंचे अध्ययन अपरिहार्य ठरते.\u003cbr\u003eया पुस्तकात राष्ट्रीय सुरक्षेतील विविध घटकांचा आढावा घेण्यात आला असून, भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, संस्कृती व समाजशास्त्र या सर्व दृष्टीकोनातून विषयाची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक, स्पर्धा परीक्षाथ तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षणशास्त्रात रस असलेल्या सर्वांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701355508031,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/2_RashtriyaSurkshecheSankalpanatmakPailu_DrDevendraVispute_1.jpg?v=1775477167"},{"product_id":"sanrkshan-patrakaritechi-multattve","title":"संरक्षण पत्रकारितेची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eपत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. समाजातील अन्याय, त्रुटी आणि सत्तेतील जबाबदारी उघड करण्याबरोबरच माध्यमे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित जनजागृती घडवून आणतात. म्हणूनच “संरक्षण पत्रकारिता” (Defence Journalism) हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्करी बाब नसून तिच्यात राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि परराष्ट्र धोरणाचेही पैलू येतात. या पुस्तकात संरक्षण पत्रकारितेचे महत्त्व, गरज, कार्यक्षेत्र आणि जबाबदाऱ्या यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eपत्रकारितेची मूलतत्त्वे, संरक्षण पत्रकारितेतील विशिष्ट भूमिका, राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरण, संरक्षण संघटनांची माहिती, पारिभाषिक शब्दसंग्रह, संरक्षण वृत्तसंकलन व वृत्तलेखन या सर्व घटकांचा यात अभ्यासक्रमानुसार समावेश आहे. तसेच संरक्षण पत्रकारितेसाठी आवश्यक कायद्याचे ज्ञान, उपलब्ध साधने आणि करिअरच्या संधींचाही आढावा यात देण्यात आला आहे. भारतामध्ये स्पेशलाईज्ड संरक्षण पत्रकारांची मोठी उणीव आहे. त्यामुळे या क्षेत्रात संधींचे दरवाजे उघडे आहेत. वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स, आकाशवाणी, दूरदर्शन तसेच इलेक्ट्रॉनकि व डिजिटल माध्यमांमध्ये संरक्षण पत्रकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध आहे. हे पुस्तक संरक्षणशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि वृत्तपत्रविद्येची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना व वाचकांना मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701357965631,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/3_SanrkshanPatrakaritechiMultattve_DrDevendraVispute_1.jpg?v=1775477442"},{"product_id":"sanrakshan-aani-samrik-abhyas-madhye-digitalization-vapar","title":"संरक्षण आणि सामरिक अभ्यासामध्ये  डिजिटलायझेशनचा वापर","description":"\u003cp\u003eआजचे युद्ध पारंपरिक रणभूमीच्या चौकटीत मर्यादित राहिलेले नसून सायबर स्पेसपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, प्रगत सेन्सर्स आणि डिजिटल नेटवर्क्स यामुळे युद्ध अधिक अचूक, गतिमान आणि सुरक्षित बनले आहे. सायबर युद्ध, ग्रे-झोन रणनीती आणि हायब्रिड संघर्ष यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे.\u003cbr\u003eया बदलत्या युद्धतंत्राच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार ‘संरक्षण आणि सामरिक अभ्यासामध्ये डिजिटलायझेशनचा वापर’ हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आधुनिक युद्धातील तांत्रिक बदल, डिजिटल प्रणालींचा वापर, सायबर सुरक्षेचे संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजना यांचे सखोल आणि सुलभ विवेचन करण्यात आले आहे.\u003cbr\u003eसुबोध भाषाशैलीत मांडलेला हा विषय विद्यार्थ्यांना तांत्रिक संकल्पना समजून घेण्यास मदत करतो, तसेच संरक्षण क्षेत्रातील नव्या दिशांचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतो. आधुनिक युद्धकलेच्या बदलत्या स्वरूपाची समज प्राप्त करून देणारे हे पुस्तक अभ्यासकांसाठी एक उपयुक्त आणि विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701361242431,"sku":null,"price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sanrkshan_Aani_Samrik_Dr_Devendra_Vispute_1.jpg?v=1775480098"},{"product_id":"yudhaniti-vicharvant","title":"युद्धनीती विचारवंत","description":"\u003cp\u003eआजच्या जागतिकीकरणाच्या युगात राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी विचारसरणी या विषयांचे महत्त्व प्रचंड वाढलेले आहे. युद्ध, संरक्षण आणि रणनीती यांवरील चिंतन केवळ सैनिकांसाठीच नाही तर प्रत्येक जागरूक नागरिकासाठी आवश्यक आहे. या ग्रंथामध्ये प्राचीन आणि आधुनिक युद्धतत्त्वज्ञानाचा विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. प्रारंभी लष्करी संस्कृती, व्याख्या व संकल्पना, तसेच रणनीतीचे विविध प्रकार यांचे स्पष्ट विवेचन दिले आहे.  \u003cbr\u003eआचार्य कौटिल्यांचे शाश्वत युद्धतत्त्वज्ञान या पुस्तकाचे पहिले वैशिष्ट्य आहे. त्यांच्या राजनीति, राज्यकारभार आणि युद्धविस्तार धोरणातून राष्ट्रसंरक्षणाची तत्त्वे वाचकांसमोर प्रभावीपणे उभी राहतात. यानंतर आधुनिक युगातील प्रमुख लष्करी विचारवंत कार्ल व्हॉन क्लाऊत्सेविझ यांचे On Wa या ग्रंथातील सिद्धांत, युद्ध- धोरण, आक्रमण व संरक्षण, तसेच डावपेचांची शास्त्रशुद्ध मांडणी पुस्तकात आहे. ॲण्टोनी हेन्री जोमिनी यांनी प्रतिपादित केलेली युद्धनीती, तंत्र, पुरवठा व्यवस्था आणि संयुक्त शस्त्रांचा उपयोग यांचे विवेचनही वाचकांना आधुनिक युद्धशास्त्राचे भक्कम आकलन करून देते.\u003cbr\u003eराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये संरक्षणशास्त्राचा समावेश करण्यात आल्याने या विषयाचा शैक्षणिक अभ्यास अधिक व्यापक झाला आहे. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी, संशोधक तसेच लष्करी विचारांमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52701383786815,"sku":null,"price":122.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/1_YudhanitiVicharvant_ProfAPChaudhari_1.jpg?v=1775478312"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/defence-studies.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}