{"title":"B.Ed. - KBCNMU University","description":null,"products":[{"product_id":"margdarshan-samupdeshan-aani-samaveshak-shikshan","title":"मार्गदर्शन समुपदेशन आणि समावेशक शिक्षण","description":"\u003cp\u003eमार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण हे पुस्तक आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. आजच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची ठरते. शाळेत येणारा प्रत्येक विद्याथ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेला असतो. त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक स्थिती वेगळी असते. या विविधतेचा विचार करून शिक्षकाने अध्यापन करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकाला मार्गदर्शन व समुपदेशनाचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाची संकल्पना, उद्दिष्टे व प्रक्रिया, शालेय मार्गदर्शन समितीची भूमिका व कार्य, समुपदेशनाचे प्रकार, तत्वे व प्रक्रिया, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व सामाजिक फायदे, शिक्षकाची सज्जता, जबाबदाऱ्या व व्यावसायिक नीती, विविध गरजा असणाऱ्या बालकांचे शैक्षणिक व सामाजिक प्रश्न तसेच सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या बालकांच्या समस्या व उपाययोजना यांचा सखोल विचार केलेला आहे.\u003cbr\u003eलेखकांनी या सर्व पैलूंचा सुसंगत व सर्वसमावेशक आढावा घेतला असून हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन, समुपदेशन आणि समावेशक शिक्षण या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715405115711,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/15_MargdarshanSamupdeshanAaniSamaveshakShikshan_DrDipakBaviskar1.jpg?v=1775801317"},{"product_id":"shaley-shkshanatil-mulyanirdharan-aani-mulyamapan","title":"शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन","description":"\u003cp\u003eशालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन हे पुस्तक आधुनिक शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारे एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे. समाजाच्या बदलत्या मागण्या आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातील सतत होणाऱ्या सुधारणा लक्षात घेऊन या विषयाची मांडणी करण्यात आली आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी समाविष्ट केलेल्या या विषयाचा उद्देश शिक्षक प्रशिक्षणाथ आणि प्राध्यापकांना योग्य दिशा देणे हा आहे.\u003cbr\u003eया ग्रंथात मूल्यमापनाची संकल्पना आणि हेतू, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन संबंधी दृष्टिकोन, अध्ययनाचे मूल्यनिर्धारण, मूल्यमापनाची तंत्रे व साधने, शाळांमधील मूल्यनिर्धारणासाठी चाचण्या, शिक्षक निर्मित संपादन चाचणी, मूल्यनिर्धारणाचे नियोजन व अंमलबजावणी, तसेच मूल्यमापनातील सुधारणा यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे मुद्देसुद स्वरूपात, साध्या आणि सरळ भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.\u003cbr\u003eलेखकांनी विविध संदर्भग्रंथ, नियतकालिके, संशोधन लेख आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेत अद्ययावत व सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मापन, मूल्यनिर्धारणाची उपयुक्तता, विविध चाचण्यांचे स्वरूप, तसेच सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाची गरज याबाबत स्पष्ट मार्गदर्शन मिळते.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन या प्रक्रियांचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715407049023,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/16_ShaleyShkshanatilMulyanirdharan_DrDipakBaviskar1.jpg?v=1775801621"},{"product_id":"chhatrasevakal","title":"छात्रसेवाकाल","description":"\u003cp\u003eछात्रसेवाकाल हा बी.एड. अभ्यासक्रमातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून शिक्षक प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. या कालावधीत प्रशिक्षणाथ शाळांमध्ये प्रत्यक्ष काम करून शिक्षणाच्या विविध पैलूंशी परिचित होतात. शाळेतील कार्यपद्धती, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या गरजा, उपक्रम, मूल्यांकन प्रक्रिया आणि दैनंदिन कामकाज यांचा अनुभव घेऊन ते अध्यापन व्यवसायातील वास्तवाशी जवळून जोडले जातात.\u003cbr\u003eया ग्रंथात छात्रसेवाकालाची संकल्पना, उद्दिष्टे, नियोजन व अंमलबजावणी, शाळेची वैशिष्ट्ये, शाळा व समाजातील परस्पर आंतरक्रिया, मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका, अध्यापन व्यवसायाचे स्वरूप व त्यातील समस्या, शिक्षक-विद्याथ संबंध, पालक-शिक्षक संबंध तसेच शैक्षणिक संशोधनाची गरज व महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. सर्व प्रकरणे साध्या, सरळ आणि मुद्देसूद भाषेत मांडलेली असल्यामुळे वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते.\u003cbr\u003eहे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणाथ, शिक्षणशास्त्राचे विद्याथ, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त ठरेल. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी छात्रसेवाकाल हा घटक किती महत्त्वाचा आहे याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715409506623,"sku":null,"price":104.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/17_Chhatrasevakal_DrDipakBaviskar1.jpg?v=1775802048"},{"product_id":"ganit-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"गणित : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eगणित अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक बी.एड. द्वितीय वर्षातील गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित असून शिक्षक प्रशिक्षणाथ, विद्याथ आणि संशोधकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरते. या ग्रंथाचा मुख्य उद्देश म्हणजे गणित विषयाची भीती दूर करून नवनवीन संज्ञा, संकल्पना, अध्यापन पद्धती, तंत्रे व उपागम यांचे सखोल स्पष्टीकरण देत शिक्षकाची अध्यापनदृष्टी विकसित करणे.\u003cbr\u003eया पुस्तकात माध्यमिक स्तरावरील गणिताचा अभ्यासक्रम, अध्यापनाचे उपागम व प्रतिमाने, अध्ययन संसाधने व आयसीटीचा वापर, सर्वांसाठी गणित शिक्षण, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन, शिक्षकाचा व्यावसायिक विकास तसेच अंकगणित, बीजगणित व भूमितीचा मूलभूत आशय यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सक्रिय अध्ययन, ज्ञानरचनावादी उपागम, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती आणि प्रश्नोत्तर तंत्र यांचा शैक्षणिक उपयोग स्पष्ट करून गणितातील संकल्पना दृढ करण्यावर विशेष भर दिला आहे.\u003cbr\u003eयाशिवाय पुस्तकात गणित अध्यापनासाठी आवश्यक असलेली विविध संसाधने, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्याथकेंद्रित अध्यापनाची गरज आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी संशोधनाचे महत्त्व यांचा सखोल विचार केला आहे. उजळणी, सराव, पर्यवेक्षित अभ्यास तंत्र तसेच मूल्यनिर्धारणाच्या विविध पद्धतींचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा कशी साधता येईल याचे मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते.\u003cbr\u003eहे पुस्तक विद्याथ, शिक्षक, संशोधक आणि मार्गदर्शकांसाठी उपयुक्त ठरेल. गणित अध्यापन अधिक सुलभ, परीक्षाभिमुख आणि विद्याथ-केंद्रित करण्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी साधन ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715416125759,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/18_Ganit-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775802278"},{"product_id":"vidnyan-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"विज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eविज्ञान : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास हे पुस्तक आधुनिक शालेय शिक्षणातील विज्ञान विषयाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक सर्वसमावेशक ग्रंथ आहे. विज्ञान शिक्षणाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारशक्ती, निरीक्षण कौशल्य, प्रयोगशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. या दृष्टीने विज्ञान अभ्यासक्रमाची रचना व अध्यापनशास्त्रीय मांडणी प्रभावी असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.\u003cbr\u003eया ग्रंथात विज्ञान अध्यापनाच्या विविध पद्धती, प्रयोगशाळा तंत्र, क्षेत्रभेटी, स्वयंशोधन पद्धती, तसेच अध्यापन प्रतिमानांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (खउढ) वापर, प्रात्यक्षिके, घटक चाचण्या, नैदानिक चाचण्या आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यांचा विज्ञान शिक्षणातील उपयोग स्पष्ट करण्यात आला आहे. याशिवाय विज्ञान शिक्षकाची भूमिका, व्यावसायिक विकास, पर्यावरण जागृती आणि शाश्वत विकासातील योगदान यांचा विचार केला आहे.\u003cbr\u003eपुस्तकात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भूविज्ञान यांचा मूलभूत आशय सोप्या भाषेत मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन नियोजन, पाठयोजना तयार करणे, अध्यापन कौशल्ये विकसित करणे, साधनसामग्रीचा योग्य वापर करणे आणि आधुनिक मूल्यमापन पद्धती समजून घेणे यासाठी हे पुस्तक शिक्षक प्रशिक्षणार्थींना विशेषतः उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715433820479,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/20_Vidnyan-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775803705"},{"product_id":"bhugol-abhyasakram-v-adhyapanshastriya-abhyas","title":"भूगोल : अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्रीय अभ्यास","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले हे शैक्षणिक पाठ्यपुस्तक भूगोल विषयाच्या अध्यापनशास्त्राचा सखोल अभ्यास घडवते. नियोजन, मूल्यमापन, अध्यापनाच्या पद्धती, प्रतिमाने, रचनावाद, फिप्ड क्लासरूम यांसारख्या आधुनिक अध्यापन संकल्पना विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात.\u003cbr\u003eया पुस्तकात भूगोल शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये, व्यावसायिक विकासाची गरज, सेवांतर्गत प्रशिक्षण, तसेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर यांवर विशेष भर दिला आहे. हवामानशास्त्र, प्रादेशिक भूगोल, मानवी भूगोल, ऊर्जा साधने, जलसंपत्ती, पर्यावरणीय समस्या अशा विविध संकल्पनांचा सखोल ऊहापोह करून विद्यार्थ्यांना विषयाची व्यापक समज दिली जाते.\u003cbr\u003eशिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाशी सुसंगत अशा या ग्रंथात क्षेत्रभेट, सर्वेक्षण, अहवाल लेखन, ई-स्त्रोतांचा वापर यांसारख्या अध्ययन-अध्यापनाच्या साधनांचा सविस्तर आढावा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते आणि अध्यापन अधिक परिणामकारक होते.\u003cbr\u003eभूगोल विषयातील सामाजिक समस्या जसे की पर्यावरण ऱ्हास, लोकसंख्या विस्फोट, नागरीकरण, जंगलतोड यांचा विचार करून शैक्षणिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामुळे हे पुस्तक केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारे ठरते.\u003cbr\u003eलेखकांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव आणि शास्त्रशुद्ध मांडणी यामुळे हे पुस्तक शिक्षणशास्त्र क्षेत्रातील विद्याथ, प्रशिक्षणाथ शिक्षक, संशोधक आणि अभ्यासक यांच्यासाठी एक विश्वासार्ह मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52715451547967,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/19_Bhugol-AbhyasakramVAdhyapanshastriyaAbhyas_DrJiteshChavhan1.jpg?v=1775805031"},{"product_id":"guidance-counselling-and-inclusive-education","title":"Guidance Counselling and Inclusive Education","description":"\u003cp\u003eEducation today demands not only knowledge but also sensitivity, guidance, and inclusion. Guidance Counselling and Inclusive Education is a comprehensive academic resource designed for teacher trainees, educators, and researchers who aspire to make learning meaningful for every child.\u003cbr\u003eThe book explores the foundations of educational and career guidance, essential services in school programmes, and the nature of counselling as a professional support system. It highlights the diverse types of guidance and counselling, from vocational to peer counselling, and situates them within the Indian context.\u003cbr\u003eEqually significant is its focus on inclusive education-its philosophy, objectives, and practices-supported by national and international initiatives. The text emphasizes teacher preparation, professional ethics, and evaluation techniques essential for inclusive classrooms. Special attention is given to children with varied needs, socially disadvantaged groups, and the role of technology and resources in bridging educational gaps.\u003cbr\u003eWith its structured content, practical orientation, and research insights, this book serves as a guide to empower educators in fostering equity, self reliance, and holistic development among learners. It is not merely a textbook but a companion for those committed to building an inclusive and just educational society.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53860659790143,"sku":"9789373440200","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/GuidanceCounsellingandInclusiveEducation_DrShamaliThorat_1.jpg?v=1782477881"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/b-ed-kbcnmu-university.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}