{"title":"समिक्षा","description":"","products":[{"product_id":"ekavisavya-shatkatil-marathi-kadambarine","title":"एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीने सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक पातळीवर नवे क्षितिज गाठले आहे. ग्रामीण-शहरी वास्तव, जात-लिंग-श्रम यांचे भेद, जागतिकीकरणाचे परिणाम, अस्तित्वाचा संघर्ष आणि आत्मशोधाच्या वाटा यांचे विविधांगी चित्रण या काळातील मराठी कादंबऱ्यांमधून समर्थपणे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. राहुल पाटील यांच्या संपादनाखाली साकारलेला ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी : आशय, स्वरूप आणि प्रवाह’ हा ग्रंथ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समग्र समीक्षणाचा आदर्श नमुना ठरतो. डॉ. पाटील यांची सर्वसमावेशक दृष्टी, काटेकोर व साक्षेपी निवड आणि विषयाशी सुसंगत अभ्यासकांचा सहभाग या ग्रंथाला संशोधनपर आणि संदर्भात्मक मूल्य बहाल करतो. या कादंबऱ्यांचे विश्लेषण करणारे लेखकही महाराष्ट्र व गोव्यातील विविध विद्यापीठांतील, विविध पिढ्यांचे, भिन्न साहित्यदृष्टीचे प्रतिनिधित्व करणारी लेखकमंडळी आहेत. त्यांनी त्यांच्या सामाजिक-राजकीय जाणिवा आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून या कादंबऱ्यांचे सखोल वाचन करून अतिशय अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.  \u003cbr\u003eविविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि लिंगविवेकाशी निगडित 24 महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचे सखोल विश्लेषण या ग्रंथात आहे. हा ग्रंथ एकविसाव्या शतकातील कादंबऱ्यांची केवळ समीक्षा नसून समकालीन सामाजिक बदलांचा दस्तऐवज आहे. या सर्व कादंबऱ्यांची निवड आणि विविध समीक्षा दृष्टिकोनांतून साकारलेली त्यावरील चिकित्सक चर्चा एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरीचा आशयसंपन्न प्रवास तसेच आशय, स्वरूप व प्रवाह समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003eसाहित्य, भाषा व समाजजीवनाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींसाठी हा ग्रंथ एक महत्त्वाचा संदर्भ ठरेल, यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788175307071,"sku":null,"price":356.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/21vyaShatkatilMarathiKadambariSamiksha_RahulPatil_1.jpg?v=1776246367"},{"product_id":"kavivarya-bhau-panchbhai","title":"कविवर्य भाऊ पंचभाई","description":"\u003cp\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.\u003cbr\u003eभाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही या पुस्तकात आहेत.\u003cbr\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊंचे जीवन आणि भाऊंचे काव्य यांच्यातील आंतरसंबंध उलगडून दाखविले आहेत. वाचकांना या पुस्तकात भाऊ पंचभाई नावाच्या आकांताची उत्कट गोष्ट ऐकायला येईल...\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789000208703,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavivaryaBhauPanchbhai_YashwantManohar_1.jpg?v=1776261560"},{"product_id":"krantdarshi-dr-m-n-wankhade-janmshatabdi-kritdnyatagranth","title":"क्रांतदर्शी डॉ. म. ना. वानखडे जन्मशताब्दी कृतज्ञताग्रंथ","description":"\u003cp\u003eडॉ. म. ना. वानखडे यांनी जीवनाच्या आणि साहित्याच्या चर्चाविश्वात एका प्रगमनशील सौंदर्याचं नवं युग निर्माण केलं. त्यात रॅशनल नीतीचं वैश्विक सौंदर्य आहे आणि साहित्याच्या सौंदर्याची पुनर्रचनाशील नीती आहे. एवढंच नाही तर त्यांनी उभारलेल्या पायाभूत ज्ञानव्यवहारात या दोन्हींची अविभाज्यताच आपल्या प्रत्ययाला येते.\u003cbr\u003e     या क्रांतदर्शी ज्ञानमंथनातून म.ना. वानखडे नावाचा एक अस्सल तत्त्ववेत्ता आपल्याला दिसतो. सर्वसमावेशकता आणि सर्वांचे समान हितसंबंध या पायावर त्यांची सौंदर्यसंकल्पना अधिष्ठित आहे. या बंडखोर प्रज्ञावंतानं जीवन आणि साहित्य या दोन्हींसाठी अनिवार्य तत्त्वज्ञान मांडलं आहे.\u003cbr\u003e     या अस्सल प्रज्ञावंताच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं हा कृतज्ञताग्रंथ निर्माण झाला आहे. या ग्रंथातील प्रत्येकच शब्दावर म.ना. वानखडे हे विशेषनाम कोरलेलं आहे आणि या ग्रंथातील सर्वच शब्दांच्या बेरजेचं नावही कृतज्ञता हेच आहे. हे एका खन्ऱ्याच क्रांतदर्शित्वाला केलेले विनम्र अभिवादन आहे.\u003cbr\u003e     'क्रांतदर्शी डॉ.म.ना. वानखडे' हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या अनेक चाहत्यांनी निर्माण केलेला कृतज्ञतेचा दीपस्तंभ आहे. या ग्रंथातून पुढल्या पिढ्यांना म.ना. वानखडे नावाचा गगनभेदी दीपस्तंभ वाचताही येईल, बघताही येईल आणि विश्वासू मार्गदर्शक म्हणून सोबतही घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789007548735,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KrantdarshiDrMNWankhade_YashwantManohar_1.jpg?v=1776261961"},{"product_id":"marathitil-nivadak-sahity-samiksha","title":"मराठीतील निवडक साहित्य समीक्षा","description":"\u003cp\u003eडॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हयातभर अध्यापनाचे कार्य करीत असतानाच आपल्यातील सर्जनशीलतेला आणि आस्वादकतेला कुठे बाधा येणारा नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यातूनच त्यांच्यातील ललितलेखिका आणि विवेचक समीक्षिका घडत गेली. ही घडणूक होताना त्यांनी अवतीभवतीचे भान राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला. समाजमनापासून व्यक्तिमनापर्यंतचे सर्वस्तरीय भान त्यांनी आपल्या लेखनात सातत्याने प्रकट केले. समीक्षक हा सर्जनशील लेखक असेल तर त्याच्या लेखनाला वेगळी झळाळी कशी प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे लेखन समोर ठेवता येईल. या प्रक्रियेतूनच त्यांनी वारंवार काही समकालीन कलाकृतींवरील लेखन केलेले आहे. त्या लेखनाची एकत्रित भेट ‘मराठीतील निवडक साहित्य-समीक्षा’ या शीर्षकाखाली वाचकांना, जाणकारांना मिळते आहे, हे या दृष्टीने महत्त्वाचे वाटते.\u003cbr\u003eप्रस्तुत ग्रंथात डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी ज्या कलाकृती रसास्वादासाठी निवडलेल्या आहेत त्या बहुतेक या शतकातल्या पहिल्या पर्वातल्या आहेत. खाउजा संस्कृतीच्या परिणामकारकतेच्या उत्तर पर्वातील या कलाकृतींवर लिहितांना लेखिका समकालीन नैतिकता आणि कलाकृतीची सर्वांगीण मूल्यात्मकता तपासात मुक्तपणे त्यातील स्वत्त्वाला सामोरी जाते. आणि हे करताना या मूल्यमापनात कुठेही सैद्धांतिक बोजडपणा येऊ नये, हे लेखन सर्वसामान्याला अधिक भावेल, याची त्या पुरेपूर दक्षताही घेतात.\u003cbr\u003eमराठी समीक्षेत आस्वादक समीक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते ती वर्ण्य कलाकृतीचा अधिक खोलात जाऊन सर्वांगीण शोध घेते, म्हणून. आपल्या समीक्षालेखनासाठी डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी हीच वाट निवडल्याने यात चर्चिल्या गेलेल्या कलाकृतींना योग्य न्याय मिळाला आहे. आणि म्हणूनच अभ्यासकांना हा समीक्षाग्रंथ महत्त्वाचा ठरावा, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. रवींद्र शोभणे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eअध्यक्ष, 97 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अमळनेर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792853659967,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MarathitilNivadakSahitySamiksha_DrShrutiWadagbalkar_1.jpg?v=1776324760"},{"product_id":"stri-sahitya-ani-strivad","title":"स्त्री साहित्य - स्त्री वाद","description":"\u003cp\u003eसोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ. श्रुती वडगबाळकर यांचे नवीन पुस्तक “स्त्री साहित्य... स्त्री वाद..” वाचकांच्या हाती देताना आनंद वाटतो. त्या लेखिका, समीक्षक तर आहेत, पण सर्जनशील साहित्यिका आहेत. कथा, कादंबरी, नाटक, ललित लेख, कविता, एकांकिका, बालसाहित्याची मिळून त्यांची चाळीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या अनेक संस्थांच्या कार्यकारणी वरती आहेत सध्या सोलापूर म.सा.प.च्या अध्यक्ष असून साहित्यिक वाटचालीबरोबर शिक्षण क्षेत्रातही त्यांचा सहभाग आहे. प्रभारी प्राचार्य, मराठी विभाग प्रमुख, पीएच.डी.च्या मार्गदर्शिका म्हणून त्यांनी काम केले आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत. स्त्रीमुक्तीच्या चळवळीनंतर स्त्रियांनी लिहिलेल्या साहित्याला उठाव मिळाला. स्त्रिया लिहिताहेत हे अधोरेखित होत असल्याने त्याकडे सजगपणे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत गेला. स्त्रीवादी साहित्याची व्याख्या, त्यातूनच भारतीय व पाश्चात्य स्त्रीवादाची तुलना ओघानच आली. पाश्चात्य स्त्रीची जीवनपद्धती, मानसिकता ही वेगळी म्हणून भारतीय स्त्री जीवनाचे विश्लेषण व्हायला सुरुवात झाली. तिची आत्मचरित्र हा त्याचा आरसा होता. हे नक्की. ती काय करते? तिच्या कार्याची क्षेत्र कोणती? याचाही शोध घेतला जात राहिला. तिचं सुयोग्य चित्र कथा साहित्यात आलं असेल तरी त्याचं स्वरूप काय? या सगळ्या गोष्टीचा विस्ताराने  विचार प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी  या पुस्तकात केला आहे. याचबरोबर महिलांना आरक्षण असणं कायद्याच्या रूपाने किती आवश्यक हेही त्या आग्रह पूर्वक मांडतात. कारण भारतीय महिलांना कायद्यानेच पुरुषां बरोबरीच्या सवलती मिळाल्यात, मग ते शिक्षण असो, वारसा हक्क असो की मतदान. हे लेखिका जाणून आहे. त्यांच्या मुलाखतीतून त्यांची भूमिका जास्त स्पष्ट होते. हा “स्त्री साहित्य..स्त्री वाद..” समीक्षणात्मक लेखसंग्रह मराठी साहित्याला आणखी समृद्ध करेल व अभ्यासकांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी होईल हे निश्चित.. या प्रतिथयश लेखिकेला उर्वरित लेखनासाठी अनेक शुभेच्छा...\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. छाया महाजन\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिका, माजी प्राचार्या,\u003cbr\u003eडॉ. आय.बी.पी. महिला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52792859918655,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/StriSahityaAniStrivad_DrShrutiWadagbalkar_1.jpg?v=1776325097"},{"product_id":"rajkiya-kadambarikar-r-r-borade","title":"राजकीय कादंबरीकार : रा. रं. बोराडे","description":"\u003cp\u003e    साठोत्तरी मराठी साहित्यात आपल्या अनुभवविश्वाने आणि लेखनशैलीने प्रस्थापित झालेले काही महत्त्वाचे लेखक आहेत, त्यात प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. रा. रं. बोराडे यांचे नाव घेताच, नजरेसमोर येते ती त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी. ग्रामीण जीवनातील मूल्यांतरांच्या संदर्भात या कादंबरीचे महत्त्व विशेष आहे. तथापि, आपल्या लेखनाच्या रूढ चौकटी मोडून, नव्याचा शोध घेणारे लेखक म्हणून बोराडे यांच्या लेखनाचा विचार करावा लागतो. नवे अनुभवविश्व, नवी क्षेत्रे खुणावत असताना, त्याकडे आस्थेने पाहण्याचे कसब बोराडे यांच्यात होते. म्हणूनच त्यांनी राजकीय विषयांवरील महत्त्वाच्या कादंबऱ्यांची निर्मिती केली आहे. ‘आमदार सौभाग्यवती’, ‘मरणदारी’ आणि ‘नामदार श्रीमती’ या त्यांच्या तीन कादंबऱ्या राजकीय म्हणून गणल्या जातात. बोराडे यांच्या या तीन कादंबऱ्यांचा विचार करता, राजकारणात स्त्रीची होणारी कुचंबणा, त्या व्यवस्थेत तिच्या पदरी पडणारे यश-अपयश आणि त्यातून उभी राहणारी, खचणारी ती स्त्री- असा अनुभवाचा पोत जाणवतो. मुळातच रा. रं. बोराडे यांचे लेखन स्त्रीभावविश्वाशी अधिक घट्ट नाते सांगणारे असे आहे, आणि त्याची प्रचीती याही लेखनातून येते.\u003cbr\u003e    मराठीतील राजकीय कादंबरी लेखनाचे विश्व तसेही सीमित आहे. फार कमी लेखकांनी मोजक्या राजकीय कादंबऱ्या लिहिल्या आहेत. राजकीय लेखनासाठी समकालीन राजकारणाची नाळ ओळखणारी दृष्टी त्या कादंबरीकाराजवळ असावी लागते. समकालीन राजकारण आणि माणूस यांतील भावबंध अधिक तन्मयतेने शोधणारी व्यापक, मातृहृदयी दृष्टी असणे आवश्यक ठरते, आणि ती रा. रं. बोराडे यांच्याकडे होती. त्या दृष्टीचा मराठी जाणकारांना, अभ्यासकांना सर्वार्थाने शोध घेता येईल असे मर्मग्राही विवेचन डॉ. भास्कर पाटील यांनी या ग्रंथात केले आहे. त्यामुळे या लेखनाचे मोल अधिक आहे. त्यासाठी डॉ. भास्कर पाटील अभिनंदनास पात्र ठरतात, आणि समीक्षक म्हणूनही त्यांच्या लेखनाचे अचूक मर्म सुद्धा कळून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. रवींद्र शोभणे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eअध्यक्ष, 97 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन, अमळनेर\u003cbr\u003eतथा अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793540903231,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/RajkiyaKadambarikar-RRBorade_ProfDrBhaskarPatil_1.jpg?v=1776346629"},{"product_id":"ranangan-rachayita-d-b-jagtpuriya","title":"रणांगण - रचयिता डी. बी. जगत्पुरिया","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eचिंतक प्रतिभा की ऊर्जावान कविता!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडी. बी. जगत्पुरिया के ‘रणांगण’ संग्रह की अनुदित कविताओं में रचनात्मक ऊर्जा, संवदेना एवं वैचारिक पक्षधरता की त्रिवेणी प्रवाहित है| कवि को भूखे मन की व्याकुलता का क़यास है, जनता की आँखों के आँसुओं का एहसास है और शोषित, पीड़ित लोगों के प्रति गहरा आभास है| ये कविताएँ प्रजातांत्रिक व्यवस्था से जुड़े मूल्यों के नाम पर चल रहे ‘गड़बड़झाले’ को निरावृत्त करती चलती हैं तथा एक ऐसी व्यवस्था के विद्रुपों को उद्घाटित करने में प्रयासरत हैं, जो चालाकी और शोषण पर टिकी है| इन कविताओं में वैज्ञानिक दृष्टिकोण, तार्किकता, चिंतन और पैनी परख होना कवि को बधाई का पात्र बनाता है|\u003cbr\u003eमानव जीवन के हरेक क्षेत्र से जुड़े हुए अनुभवों को कविताओं की विषयवस्तु बना कर कवि ने अपनी सुदीर्घ काव्य-प्रतिभा का निचोड़ प्रस्तुत किया है| ये कविताएँ जीवन का काव्यात्मक अनुवाद हैं जो संवेग व संघर्ष की उस क़लम से लिखी गईं हैं, जिस में यथार्थता अपनी पूरी गरिमा के साथ उपस्थित है| मनुष्यता को खोजने की चाहत लेकर कविअनुभूतियों के आसपास वैज्ञानिक ढंग से अपना काव्य-भूगोल रचते हैं, जहाँ हर शोषित चेहरा संघर्षरत नज़र आता है| मानवता की अपरिभाषेय ऊँचाई की तहक़ीक़ात करनेवाली एवं विषमताओं की विकरालता नापती ये अनुदित कविताएँ एक सार्थक-साहित्यिक सृजन हैं|\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. युवराज सोनटक्के\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eबेंगलुरु (कर्नाटक)\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793546047807,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Ranangan_KavyaSangrah__DBJagtpuriya_1.jpg?v=1776347169"},{"product_id":"sahitya-chintan","title":"साहित्य - चिंतन","description":"\u003cp\u003eमराठी साहित्यातील काही महत्त्वाच्या कलाकृतींच्या आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने घेतलेले हे चिंतन केवळ समीक्षण नसून, एक संवेदनशील आणि सामाजिक भान असलेल्या मनाचा वस्तुनिष्ठ शोध आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या ज्वलंत सामाजिक वास्तवाचा, मानवी मनोवस्थांचा आणि सांस्कृतिक घडामोडींचा सखोल वेध या ग्रंथात घेतलेला आहे.\u003cbr\u003eराष्ट्रीय भावना, व्यसनाधीनता, मनोविकृती, जातिभेद, आर्थिक विषमता, शेतकऱ्यांच्या व्यथा, ग्रामीण संघर्ष आणि शहरी झगमगाट यांचे ताणतणाव... या सर्वांवर या ग्रंथातील समीक्षणांनी अतिशय संवेदनशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, स्त्रीजीवन, कुटुंबसंस्था आणि गावगाड्याची सर्वांगाने होत असलेली पडझड यावर आधारित कलाकृतींचे अभ्यासपूर्वक विश्लेषणही येथे आढळते.\u003cbr\u003eया ग्रंथातील लेखन हे केवळ साहित्याच्या मर्यादेत न अडकता, समाजाच्या व्यापक संदर्भांशी संवाद साधते. प्रत्येक कलाकृतीच्या मागे असलेल्या सामाजिक, ऐतिहासिक आणि मनोवैज्ञानिक पार्श्वभूमीचा विचार करताना, लेखक स्वतःची भूमिका कुठेही लादत नाही, तर वाचकाला स्वतंत्रपणे विचार करण्यास उद्युक्त करतो. त्यामुळे हे समीक्षण नुसते आस्वादपर न राहता, चिंतनपर अनुभव देते.\u003cbr\u003eप्रा.डॉ. जतिन मेढे हे खानदेशातील एक विचारवंत, अभ्यासू आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याचा आणि चिंतनशील दृष्टिकोनाचा परिपाक या ग्रंथातून प्रकर्षाने जाणवतो. एक समीक्षक म्हणून त्यांची ही भूमिका वाचकांसाठी नवा दृष्टीकोन घेऊन येणारी ठरेल.\u003cbr\u003e‘साहित्य चिंतन’ हे केवळ साहित्यावरचे चिंतन नाही, तर समाजाच्या मनोभूमिकेचे, संघर्षांचे आणि बदलत्या काळाच्या स्पंदनाचे भाष्य आहे. संवेदनशील वाचकांनी नक्कीच जवळ ठेवावा असा हा ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e  - प्रा. डॉ. वासुदेव वले\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसदस्य - मराठी अभ्यास मंडळ,\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802779775295,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sahitya-Chintan_DrJatinkumarMedhe_1.jpg?v=1776411916"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}