{"title":"लोकसाहित्य आणि संतसाहित्य","description":"","products":[{"product_id":"sant-sahitya-aani-sanshodhan","title":"संत साहित्य आणि संशोधन","description":"\u003cp\u003eसंतांनी आपल्या साहित्यातून समाजात सुख, शांती, ऐक्य, सहिष्णुता, मानवता, अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी व मार्गदर्शक तसेच नीती मूल्यांवर आधारित, शाश्वत मूल्यांवर आधारित साहित्याची निर्मिती संतांनी केली. मध्ययुगीन कालखंडात समाजातील विविध समस्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेले संतांचे मूल्याधिष्ठित साहित्य सतत भव्यत्वाचा, दिव्यत्वाचा व अलौकिकतेचा शोध घेत आहे. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही समाजाला आदर्श, मानवतावादी, समतावादी जीवन जगण्यासाठी संतांचे मूल्याधिष्ठित व सर्वसमावेशक साहित्य प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार आहे. साहजिकच आदर्श जीवनाची, स्वधर्माची, मानवतेची, आध्यात्मिक लोकशाहीची, सकारात्मकतेची रुजवण करण्यासाठी संत साहित्याचा सतत शोध घेणे  महत्त्वाचे  आहे. प्रस्तुत संत साहित्य आणि संशोधन या पुस्तकात संत साहित्य संशोधनाची पार्श्वभूमी, संत साहित्य संशोधनाचा हेतू, दिशा व व्याप्ती संत साहित्य संशोधनाची गरज व महत्त्व, विविध भक्ती संप्रदाय व संत साहित्य यांचा अनुबंध या विषयावर चर्चा केलेली आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789096972607,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SantSahitya_Sanshodhan_DineshPatil_Bhalod_1.jpg?v=1776263998"},{"product_id":"sanskrut-yejurved","title":"यजुर्वेदीय-रुद्राष्टाघ्यायी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशुक्लयजुर्वेदीय रुद्राष्टाध्यायी ही वैदिक परंपरेतील एक अद्वितीय साधना आहे. रुद्राच्या असीम रूपाचे स्तवन करणाऱ्या या ऋचांमध्ये नमक व चमक विभागांद्वारे परमेश्वराला नमन व प्रार्थना व्यक्त केली जाते. रुद्र हा शिवाचा उग्र तसेच कल्याणकारी रूप असून सर्वव्यापक परमात्म्याचे दर्शन घडवतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया ग्रंथात रुद्राच्या विविध नावांचे स्मरण, मानवी आकांक्षांची यादी, तसेच पुरुषसूक्ताद्वारे विराट पुरुषाचे वर्णन यांचा समावेश आहे. योग, ज्ञान व मुक्तीच्या मार्गावर साधकाला नेणारे हे अध्याय जीवनाला शांती, प्रेरणा व अध्यात्मिक उन्नती देतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. वि. द. जोशी यांनी संस्कृत ऋचा व मराठी अर्थासह या ग्रंथाचे सुलभ रूप साकारले आहे. वैदिक परंपरेतील गूढ मंत्र सामान्यजनांपर्यंत पोहोचवून त्यांनी साधकांसाठी मार्ग सोपा केला आहे. शिवपूजनाचा वैदिक प्रचार तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकप्रिय करण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम ठरतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआजच्या धकाधकीच्या काळात रुद्राष्टाध्यायीचे पठण व चिंतन साधकाला अंतःशांती, आत्मविश्वास व परमेश्वराशी एकात्मता प्रदान करते. ही पुस्तिका वैदिक साधनेच्या मार्गावर एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802783609151,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SanskrutYejurved_1.jpg?v=1776412295"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}