{"title":"कविता","description":"","products":[{"product_id":"mounacha-uchhar","title":"मौनाचा उच्चार","description":"\u003cp\u003eभोवतालातील आवाजी वास्तवामुळे समकाळाचा स्वर अधिकाधिक क्षीण होत चालला आहे. स्व-आंतरिकतेची लय समजून घेण्यासाठी अवसर मिळणे जगण्याच्या गोंगाटात दुरापास्त होत चालले आहे. त्यातूनच कवितेच्या निर्मितीपुढे, अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण कवितेच्या असण्याचे, तिच्या कवितापणाचे स्व-आंतरिकतेच्या अभिव्यक्तीशी जीवाभावाचे नाते आहे. भौतिकतेच्या रेट्यामुळे हरवत गेलेला जगण्यातील ओलावा, स्नेह आणि सुरक्षित, सोयीच्या कप्पेबंद जगण्याची लागलेली चटक, त्यातून प्रत्ययास येणारे संवेदनाशून्य व विचारनिष्प्रभ असे भोवतालाचे निगरगट्ट विश्व यांमुळे कवितेच्या निर्मितीपर्यंत, तिच्या कवितापणापर्यंत पोहोचावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होतो. समकाळात कवितानिर्मितीपुढे हा पेच उभा ठाकलेला असला तरीही तथाकथित कविता लिहिणे मात्र थांबलेले नाही. परंतु कवयित्री उषा हिंगोणेकर या पेचाविषयी सजग आहेत. म्हणूनच की काय मौनाचा मार्ग त्यांना आपलासा करावासा वाटतो. स्व-आंतरिकतेचा तळ धुंडाळण्यासाठी मौन हा सर्वोत्तम मार्ग आहे, याची त्यांना खात्री पटलेली आहे. समकाळाच्या धबडग्यात स्वत्वपूर्ण स्वर उच्चारण्यासाठी हा मार्ग अनुसरण्याशिवाय पर्याय नाही. काव्यनिर्मितीविषयीचे हे सजग भान या संग्रहातील कवितेला लक्षणीयता बहाल करते. मौनाच्या गाभाऱ्यातून (स्व-आंतरिकतेला साद घालून) कवितेच्या शब्दांना आकार देण्यासाठी हे कविमन अस्वस्थतेच्या गर्तेत स्वतःला झोकून देते. आत्मसन्मान, अस्तित्व यांसाठी कराव्या लागणाऱ्या उठावासाठी सज्ज होत असलेले हे कविमन मनाच्या तळघरातील अंतःस्फोटाचे सामर्थ्य जाणून आहे याचा प्रत्यय या संग्रहातील कवितांतून प्राधान्याने येतो. म्हणूनच कोणत्याही प्रकारची भावव्याकुळता वा वैचारिक बुवाबाजी यांचा आसरा न घेता सहजस्वभावी शब्दकळेतून मुक्तछंदाच्या प्रवाहाला आपलेसे करीत जाणारी या संग्रहातील कविता कवितेच्या विचक्षण वाचकाचे लक्ष वेधून घेणारी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e - आशुतोष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52716098421055,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/MounachaUchhar_UshaShashikantHingonekar199_1.jpg?v=1775830789"},{"product_id":"uttarardha","title":"उत्तरार्ध","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्य तर धोक्यात आले आहेच\u003cbr\u003eसमताही संपवली जातेय\u003cbr\u003eबंधुतेची ऐशी की तैशी करत\u003cbr\u003eन्यायालाही बांधले जातेय\u003cbr\u003eकुणाच्या तरी दावणीला\u003cbr\u003eजगण्याला अर्थ देणारे\u003cbr\u003eसंविधानही खूप अस्वस्थ झालेय\u003cbr\u003eआजकाल या वर्तमानात...\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52716129681727,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Uttarardha_Shashikant_Hingonekar_1.jpg?v=1775832656"},{"product_id":"pratikshecha-shunyakal","title":"प्रतीक्षेचा शून्यकाल","description":"\u003cp\u003eप्रश्नोत्तरांची\u003cbr\u003eजुगलबंदी सुरूय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसगळेच आक्रमक झालेले आहेत\u003cbr\u003eआपापल्या पटलावर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसार्थकी नाही होतंय\u003cbr\u003eही जुगलबंदी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणूनच प्रतीक्षेचा शून्यकाल\u003cbr\u003eपुन्हा सुरू झालाय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया बेदद व्यवस्थेविरुद्ध\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52716186501439,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PratikshechaShunyakal_ShashikantHingonekar_1.jpg?v=1775832159"},{"product_id":"bahinabainche-kavya-eka-chintan","title":"बहिणाईंची गाणी आणि जीवनदर्शन","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही त्यांच्या जगण्याची लय, ताल, नाद, स्वर मुखर करणारी आहे. शंभर वर्षांपूवच्या कृषिजनसंस्कृतीशी समरस झालेल्या एका शेतकरी स्त्रीजीवनाचे हे ह्रदगत आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनधर्माचे मर्म काव्यात्मतेने व्यक्त करणारी ही रचना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सहजपणे ओळख करून देणारी आहे. डॉ. उज्वला पंकज नन्नवरे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे आकलन करून घेताना एक स्त्री म्हणून स्वतःच्या जगण्याचाच एकप्रकारे शोध घेतला आहे. निसर्ग, अध्यात्म, जीवनविषयक तत्त्वज्ञान या सूत्रांच्या अनुरोधाने या कवयित्रीच्या कवितेचे अनोखेपण धुंडाळण्यासाठी अभ्यासकाने हा खटाटोप केला आहे. बहिणाईंची कविता ही किती अर्थ आवाहक आणि अर्थ प्रसरणशील आहे याचा प्रत्यय या मांडणीतून येतो. त्याबद्दल डॉ. उज्वला पंकज नन्नवरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुस्तकाचे मनःपूर्वक स्वागत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. आशुतोष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788241531199,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BahinainchiGaniAaniJivandarshan_DrUjwalaPNannavare_1.jpg?v=1776247892"},{"product_id":"गाणे-जनमाणसाचे-काव्यसंग्रह","title":"गाणे जनमाणसाचे (काव्यसंग्रह)","description":"\u003cp\u003eस्वत: शेतकरी असल्याने हयातभर माणूसकीचे गाणे गाणारे शाहिर, कवी नानाभाऊ पाटील कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावखेड्याच्या एक-एका चौकाला पायदळी तुडवत सामाजिक आरसा उभा करण्याचे कार्य साहित्य सेवेतून निष्ठेने करत आलेले आहेत. जीवनोत्सुक कवीमन आणि व्यवस्थानिर्मित अवस्था नानाभाऊ विवेकी भावनेतून पाहतात व काव्यप्रतिभेतून समाजाभिमुख विषयांची गुंफन आपल्या गाणे जनमाणसाचे यातून मांडतात. नानाभाऊंच्या काव्य भावसृष्टीत आत्मानुभूतीचे व संवेदनशील मनाच्या कंगोऱ्याला स्पर्श करणाऱ्या वास्तवलक्ष्यी भूमिकेचे नानाविध पैलू अंतर्बाह्य चिंतन करायला लावणारे आहेत. \u003cbr\u003eशाहिर नानाभाऊ पाटील यांच्या कवितेतील अध्यात्म, समाजिक प्रश्न, कृषक जीवनातील रहस्य, व्यसनमुक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, ग्रामीण संस्कृती व लोकसंस्कृतीच्या परिपेक्षातून मानवतावादी प्रवास करणारी प्रबोधनात्मक शब्दलेखनीची धार वाचकांना जवळची वाटते. अहिरानी व मराठीतून काव्यगीतांची वाड.मयीन समृध्दता कुशलतेने भाषिक टिळा लावणारी आहे. भाषिक तंत्र व व्याकरणाच्या कोसोदूर असलेली ग्रामीण वसा जोपासणारी खान्देशी बाज असलेली कविता सेंद्रियतेची आदर्शवादी भूमिका अंतकरणाची भाषा बोलते. शाहिर नानाभाऊ पाटील यांच्या कष्टाची भावना, काव्यगीताच्या अवकाशाला प्रामाणिकतेची गवसणी घालते. मानवतावादी प्रबोधनाची धारणा नानांच्या सात्विक व संवेदनशील भावविश्वाची अनुभूती वाचकाला देत असते, हे भावविश्व गाणे जनमाणसाचे या साहित्यकृतीतून नवी क्षितिजे उजळेल अशा शुभेच्छा..\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eकेंद्रिय अध्यक्ष-खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य, धु्ळे\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788665319743,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/GaneJanmansanche_ShahirNanabhauPatil-DrSadashivSuryawanshi_1.jpg?v=1776252976"},{"product_id":"man-maze-kavitasangrah","title":"मन माझे (कवितासंग्रह)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“मन माझे” हा कवितासंग्रह म्हणजे एका संवेदनशील मनाचा प्रवास आहे. आयुष्य, निसर्ग, बालपण, विचार, शांतता, स्वप्नं आणि भावविश्व या सगळ्या छटा या कवितांमध्ये जपल्या आहेत. प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती मनाच्या गाभ्यातून उमटलेली अनुभूती आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया संग्रहात एव्हरेस्टसारखी उंची, चक्रीवादळासारखी अस्थिरता, ब्रह्मांडासारखं विशालत्व, पावसाचा स्पर्श, नक्षत्रांची चमक, आणि क्षितिजाच्या पलीकडचं स्वप्न आहे. चारोळ्यांमध्ये हास्य, काळ, क्षण, एकांत आणि मनाच्या लहरी जपल्या आहेत. विचारांमध्ये गुलाबाचं सौंदर्य, थंडीची जाणीव, आई-वडिलांचं ऋण, आणि शांततेचं मौन शब्दांत उतरलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e“मन माझे” हा संग्रह समीक्षण नाही, प्रयोग नाही—तो एका मनाचा स्वतःशी केलेला संवाद आहे. प्रत्येक पानातून झिरपणारी भावना वाचकांच्या हृदयाला स्पर्श करेल आणि त्यांना स्वतःच्या मनाशी जोडून ठेवेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788979138879,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ManMaze_SarangPawar1_1.jpg?v=1776260414"},{"product_id":"kavivarya-bhau-panchbhai","title":"कविवर्य भाऊ पंचभाई","description":"\u003cp\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.\u003cbr\u003eभाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही या पुस्तकात आहेत.\u003cbr\u003e'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊंचे जीवन आणि भाऊंचे काव्य यांच्यातील आंतरसंबंध उलगडून दाखविले आहेत. वाचकांना या पुस्तकात भाऊ पंचभाई नावाच्या आकांताची उत्कट गोष्ट ऐकायला येईल...\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789000208703,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KavivaryaBhauPanchbhai_YashwantManohar_1.jpg?v=1776261560"},{"product_id":"bhau-bole","title":"भाऊ बोले","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e‘उत्साही’ ती...\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘ती’ चालत होती...\u003cbr\u003eचालता चालता मागे राहून गेलेल्यांना\u003cbr\u003e(विद्यार्थिनींसह ज्येष्ठ-श्रेष्ठ मैत्रिणींना)\u003cbr\u003eपुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होती.\u003cbr\u003eथोड्या वेगाने वा अतीवेगाने,\u003cbr\u003eपुढे जाणाऱ्यांना\u003cbr\u003e‘ती’ .. वास्तवतेचे भान देत होती\u003cbr\u003e‘ती’ चं चालणं जसं ‘धावणं’ झालं नाही\u003cbr\u003eतसंच ‘शिक्षकी’ बैठकीमुळे मोहापाशीही\u003cbr\u003e‘रेंगाळणं’ झालं नाही\u003cbr\u003eसाधी-साधी कामं करत पुढे जाणाऱ्या\u003cbr\u003e‘ती’ च्या कडे पाहून सर्वांना वाटायचं..\u003cbr\u003e‘ती’ खरी ‘गृहिणी’, खरी हाडाची ‘शिक्षिका’ \u003cbr\u003eखरी ‘कामसू स्त्री’... अन् बरंच काही\u003cbr\u003eपण... ‘ती’ मात्र आवर्जून नव्हे निक्षून\u003cbr\u003eसांगायची..\u003cbr\u003eमी आहे एक अस्सल गृहिणी...\u003cbr\u003eघरादारासाठी जगणारी! नातेवाईक सांभाळणारी!!\u003cbr\u003e‘ती’ चा हाच आठवणींचा प्रवास\u003cbr\u003e‘भाऊ बोले’ मध्ये शब्दबद्ध झालाय\u003cbr\u003e‘तो’  वाचून तुम्ही म्हणाल...\u003cbr\u003e‘ही’ होती ‘खरी’ स्त्री\u003cbr\u003eनिष्काम कर्म करणारी कर्मयोगीनी\u003cbr\u003eअन् ‘माणूस’ पेरणारी, वेचणारी\u003cbr\u003eएक ‘उत्साही’ स्त्री!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- चन्द्रकान्त भंडारी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793282560319,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/BhauBole_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776335543"},{"product_id":"purushachya-vyatha","title":"पुरुषाच्या व्यथा","description":"\u003cp\u003e    समकालीन समाजात सर्वच स्रिया आळशी, बेफिकीर व अहमी नाहीत; पण बऱ्याच शिक्षित गृहिणी तशा दिसून येतात. त्यामुळे अशा बायका ज्यांच्या नशिबात आल्या असतील त्याला हे ‘पुरुषवादी’ काव्य त्याच्या जीवनाचे प्रतिरूप वाटेल, असे अनुभव प्रस्तुत संग्रहात काव्यात्म पद्धतीने सांगितलेले आहेत. मध्यमवगय नोकरदार पुरुषाच्या जीवनाचे ते भीषण वास्तव आहे; म्हणून घर घर की कहाणी अशीच काहीशी प्रचिती त्यातील कवितांमधून वाचकांना येईल. मात्र ती कोण्या स्त्रीबाबत तक्रार नाही, की कोणा स्त्रीचे दोष दाखवून पुरुषांचे श्रेष्ठत्त्वही इथे सांगितले नाही. आजच्या काळात काही बायका नवऱ्याशी चांगल्या वागत नाही, त्यामुळे बिचाऱ्याची फार घुसमट होते, ती अनेक दृष्टीने, हेच इथे समजून घ्यावे लागते, ते एका नवऱ्याच्या भावविरेचनातून, त्याच्या दुखऱ्या मनाच्या व भावनेच्या प्रकटनातून. अशावेळी ती बायकोविषयी केलेली तक्रार न मानता आजच्या पुरुषांच्या व्यथा-वेदनांचा तो उद्गार आहे, असे म्हणता येईल. काही कवितांमधून मात्र मैत्रीण किंवा प्रेयशी हिच्याबाबत मात्र हळुवार भावना प्रकट झालेल्या आहेत. म्हणजे बायकोपेक्षा मैत्रीण अधिक चांगली वाटते, असे का होते ? बायकोनेच नवऱ्याची मैत्रीण का होऊ नये ? असे काही प्रश्नही इथे पडतील. केवळ पुरुषाचे भावविश्व कवितेतून अधोरेखित करायचे असल्याने त्याच्या व्यथांचे स्वरूप वाचक समजून घेतील.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793333612863,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PurushachyaVyatha_DrManoharSurwade_1.jpg?v=1776336949"},{"product_id":"to-ti-te","title":"तो-ती-ते","description":"\u003cp\u003e    तो तिचा पती आहे, तसेच  कोणाचा तरी मुलगा किंवा भाऊ आहे. त्याच्या रक्तसंबंधाचा एक गोतावळा आहे. त्याचा त्याविषयी लोभ आहे, पण त्याची जोडीदार तशी नाही. तिची ओढ व लोभ माहेराकडे असते. ही विसंगती त्यांच्यातील संघर्षाचे कारण ठरते, तेव्हा तो तिच्याशी कसा वागतो, हे त्याच्या भावना व विचारांसह कविता निर्माण होत गेली आहे. \u003cbr\u003e    ‘तो’ मित्र आहे, तसा स्नेही व प्रियकरदेखील आहे आणि ‘ती’ मैत्रीण आहे, तशी प्रेयसीही आहे. दोघांच्या भावसंबंधात ‘तेच्या म्हणजे लोकांच्या परंपरागत मानसिकता, रूढ झालेली जुनाट मूल्ये, त्यातून तिचे घडलेले मन व तिचे दृष्टिकोन ‘त्याच्या’ स्वप्नांना बाधक ठरतात. धड बोलता येत नाही आणि सहनही करता येत नाही, अशी त्याची अवस्था होते. तिच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे तो दुरावाही सहन करू शकत नाही. ही त्याच्या मनाची चाललेली तगमग काही कवितांमधून दिसून येईल. त्याचे केविलवाणे मनोभाव रसिकमनाला स्पर्श करून जातील.  ह्या कविता पुरुषकेंद्री असल्याने ‘तोचे भावविश्व समजून घेता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793339085119,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ToTiTe_DrManoharSurwade_1.jpg?v=1776337193"},{"product_id":"shapit-shrunkhala","title":"शापित शृंखला","description":"\u003cp\u003e‘शापित शृंखला’ या कवितासंग्रहात कवयित्री छाया बोरकर यांनी सामाजिक संवेदनांना अचूकपणे टिपणारी आणि उजागर करणारी अत्यंत तरल कविता शब्दबद्ध केली आहे. मानवी जीवन, मानवा-मानवातील संघर्ष, या संघर्षाचे सामाजिक अस्थिरतेत होणारे रूपांतर, त्यामुळे भंग पावणारी सामाजिक शांतता, सत्य, शिव व सुंदर यावरचा मानवाचा उडत चाललेला विश्वास, वाढलेली दांभिकता, बोकाळणारा प्रखर जातीवाद या सर्वामुळे मानवाची व पर्यायाने समाजाची अतोनात हानी होत असल्याचे चित्रण या कवितांमधून कवयित्रीने केले आहे. समाजात जे-जे म्हणून काही चांगले करता येईल त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. लिंग, वर्ण, जात, धर्म यानुसार होणारा भेदाभेद टाळावा, प्रत्येकाला जगण्याचा समान हक्क मिळावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, माणुसकी जपावी, सर्वांनी बंधुभावाने राहावे ही संविधानिक मूल्ये या कवितासंग्रहातील विविध कवितेमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसतात. भारतीय संविधानाप्रती आदर, महामानवांच्या विचारांचा जागर, समाजहितास प्राधान्य, उपेक्षितांना आधार, लढणाऱ्याला बळ, दुष्ट प्रथांची पोलखोल, मानवी मूल्यांवर विश्वास, राष्ट्रप्रेमाची भावना, सामाजिक परिवर्तनासाठी घातलेली साद, स्त्रियांमध्ये जागृत केलेली स्वत्वाची जाणीव अशी बहुपदरी कविता कवयित्री छाया बोरकर लिहितात.\u003cbr\u003e    या कवितासंग्रहातील कविता वाचकांच्या मनाचा ठाव घेतील, या काव्यसंग्रहाचे रसिक व श्रोते उत्स्फूर्त स्वागत करतील अशी अशा आहे. कवयित्री छाया बोरकर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसहाय्यक कुलसचिव,\u003cbr\u003eपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर \u003cbr\u003eसोलापूर विद्यापीठ, सोलापूर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802808774975,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/ShapitShrunkhala_ChhayaBorkar_1.jpg?v=1776414044"},{"product_id":"तुला-लढायचे-आहे-काव्यसंग्रह","title":"तुला लढायचे आहे (काव्यसंग्रह)","description":"\u003cp\u003eश्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील माझे सहयोगी प्रा. संतोष देठे यांचा ‘तुला लढायचे आहे’ हा काव्यसंग्रह मराठी साहित्यविश्वात नव्याने येत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील समकालीन ज्वलंत प्रश्नांना साकारले आहे. सामान्य माणसाच्या मनातील भावनांना ऊजाळा देत रोखठोकपणे अभिव्यक्त झालेली त्यांची कविता अतिशय साधेपणाने समोर येते आणि भविष्यातील प्रश्नांना उजागर करते. समकालीन वास्तवात परिवर्तनाचा विचार रूजविणारी त्यांची कविता रडणारी नसून लढणारी आहे. कुसुमाग्रजांची ओळ इथे मला आठवते ‘पैसे नकोत सर मला, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा!’ जीवनाचा संघर्ष ज्याचा त्यालाच लढायचा असतो. धीर देणारा हात मात्र हवा! तुकारामाचा वारसा सांगणारा हा कवी डाव्या विचारसरणीला पुढे नेणारा आहे. समाजवास्तवाचा वेध घेणारी त्याची कविता वरपांगी साधी, सोपी वाटत असली तरी मानवी मनातील प्रश्नांना जागवणारी संवेदनशील कविता आहे. सामाजिक मूल्यांचे भान ठेवून समतावादाचा अंगीकार करणारी आहे. प्रा. संतोष देठे यांची काव्यलेखनाची वाटचाल अशीच पुढे सुरु राहावी हीच सदिच्छा व पुढील लेखनकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. सुधा मालधुरे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमराठी विभागप्रमुख (सेवानिवृत्त),\u003cbr\u003eश्री शिवाजी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा.\u003cbr\u003eजि. चंद्रपूर\/हल्ली मु.पो.वऱ्हा, जि. अमरावती\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802932212031,"sku":null,"price":176.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/TulaLadhayacheAahe_SantoshDethe_1.jpg?v=1776419497"},{"product_id":"jagar-kavitasangra","title":"जागर (कवितासंग्रह)","description":"\u003cp\u003eकविता ही प्रत्येकाच्या मनात असतेच. ती जेव्हा आतून अस्वस्थपणे बाहेर येते, तेव्हा ती संजीवक कविता म्हणून जन्म घेत असते. कवी शंकर रंगनाथ भामेरे हे कवितेच्या प्रांतात त्यांची सत्वशील कविता घेऊन उतरले आहेत. त्यांच्या निर्मळ आणि चारित्र्यशील व्यक्तिमत्त्वाची चाहूल त्यांच्या कवितेत सतत मनाला स्पर्श करणारी आहे. ज्ञानदानाच्या पवित्र विद्यालयात ते कार्यरत आहेत. म्हणूनच त्यांच्या कवितेत संस्काराची बीजं पेरणाऱ्या कविता संग्रहभर आहेत. अत्यंत तरल, नितळ मनातून आलेली ही कविता स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार तर करतेच, त्या मूल्यांचा जागरही मांडते हे त्यांच्या कवितेचे बलस्थान आहे. सभोवताली सर्वच क्षेत्रात प्रदूषण पसरले आहे; त्यामुळे ते जरी अस्वस्थ असले तरी ते आशावादी आहेत. हे जग मानवतावादी होईल, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे. तो लाखमोलाचा आहे, चिंतनशील आहे. मानवतेचा वसा घेणाऱ्या या कवितेला माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- शशिकांत हिंगोणेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52803328082239,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Jagar_Kavitasangra__ShankarBhamere_1.jpg?v=1776437889"},{"product_id":"aantarmanatil-akant-swar","title":"अंतर्मनातील एकान्त स्वर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘अंतर्मनातील (हळवे) एकान्त स्वर’ हा अरूणकुमार जोशी यांचा काव्यसंग्रह वाचकांना कल्पनाविलासाच्या उंच भराऱ्या आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणांच्या हळव्या क्षणांचा अनुभव देतो. त्यांच्या कवितांमध्ये शब्दांची अल्पाक्षरी मांडणी असूनही ती वाचकांना पुढे वाचण्यास भाग पाडते. ‘उत्सव’, ‘बा, चंद्रा!’, ‘बा, मना!’, ‘गजाआडच्या भिंतीतलं जग’ अशा कवितांतून ते कधी कल्पनांच्या आकाशाशी संवाद साधतात तर कधी मानवी संवेदनांना स्पर्श करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजोशींच्या कवितांमध्ये समाजातील हळुवार क्षणांचे दर्शन घडते, मानवतेचा आग्रह दिसतो आणि उच्च ध्येयाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या कवितांचा चिंतनशील एकान्त स्वर वाचकांना अंतर्मनाशी संवाद साधायला भाग पाडतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहा संग्रह वाचताना वाचकाला कल्पनाविलास, संवेदनशीलता आणि मानवतेचा हळवा स्पर्श अनुभवायला मिळतो. प्रत्येक कवितेतून जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. म्हणूनच या काव्यसंग्रहाला दिलेले शीर्षक ‘अंतर्मनातील एकान्त स्वर’ सार्थ ठरते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52823094001983,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AantarmanatilAkantSwar_ArunkumarJoshi_1.jpg?v=1776866940"},{"product_id":"patrasanvad","title":"पत्रसंवाद","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘पत्रसंवाद’ हा अरुणकुमार जोशी यांचा पत्रसंग्रह वाचकांना समाजहितार्थ चिंतनशील विचारांची दिशा दाखवतो. दैनंदिन वर्तमानपत्रातील बातम्या, लेख वाचून त्यावर तटस्थ वृत्तीने केलेले चिंतन आणि त्यातून व्यक्त झालेली सामाजिक जाणीव ही या पत्रांची मूळ प्रेरणा आहे. या संग्रहातील एकही पत्र हे वैयक्तिक नातेसंबंधासाठी लिहिलेले नाही, तर समाजहितासाठीच लिहिलेले आहे. म्हणूनच संपादकांनी त्यांना प्रसिध्दीसाठी स्थान दिले आणि वाचकांनी त्यांचा स्वीकार केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजोशींच्या पत्रलेखनात संवेदनशीलता, तर्कशुद्धता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम दिसतो. ‘पत्रसंवाद’ वाचताना वाचकाला जाणवते की प्रत्येक पत्र हे एका विचारवंताचे समाजाशी साधलेले संवाद आहे. यातून वाचकांना ‘‘हे खरं आहे, असं व्हायला नको होतं, असं व्हायलाच हवं’’ अशा प्रतिक्रिया उमटतात आणि विचारांची नवी दालने खुली होतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पत्रसंग्रहाबरोबरच ‘अंतर्मनातील एकान्त स्वर’ हा कवितासंग्रहही प्रकाशित होत आहे. दोन्ही ग्रंथ वाचकांना चिंतन, संवेदनशीलता आणि साहित्यिक आनंदाचा अनुभव देतील. अरुणकुमार जोशी यांच्या या अक्षरसाधनेला शुभेच्छा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52823104323903,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Patrasanvad_ArunkumarJoshi_1.jpg?v=1776867477"},{"product_id":"vartman-bolat-nahiya-satya","title":"वर्तमान बोलत नाही सत्य","description":"\u003cp\u003eवर्तमान बोलत नाहीय सत्य\u003cbr\u003eथरथरतो आहे तोही\u003cbr\u003eहताश हतबल\u003cbr\u003eलोकांसारखा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतो जेव्हा बोलेल ना सत्य\u003cbr\u003eतख्तापलट होईल\u003cbr\u003eअसत्याचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि हताश हतबल लोक\u003cbr\u003eपुकारतील एल्गार \u003cbr\u003eरस्त्यावर \u003cbr\u003eनक्कीच \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52823121887551,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/VartmanBolatNahiyaSatya_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776868634"},{"product_id":"aajkal","title":"आजकाल","description":"\u003cp\u003e“आत्मचिंतन, उदासीनतेची छाया व पडझडीतूनही डोकावणारा आशावाद यातून शशिकांत हिंगोणेकर यांची कविता आकार घेते. आपण आणि आपली कविता यात गुंतून पडलेली मानसिकता या कवितासंग्रहात जागोजागी प्रत्ययाला येते. आयुष्याच्या उतरत्या टप्प्यावरून घेतलेला स्वतःचा शोध आणि भल्याबुऱ्या अनुभवांची नितळ मांडणी करण्याकडे त्यांचा कल आहे. कुठलीच इच्छा, आकांक्षा मनात नसल्याची तीव्र जाणीव झाल्यानंतरचे उद्गार या कवितेतून प्रतिबिंबित होत जातात. अंतर्भेदी दीर्घ मौनातून उमललेल्या शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितेतून अंतिम सत्याच्या शोधात निघालेल्या कवीची व्यथा, आयुष्यभराची वैचारिक पुंजी आणि जपलेल्या सत्त्वाची मांडणी निनादत राहते. कवीची निरपेक्ष वृत्ती आणि त्याने केलेला चिंतनगर्भ भावाविष्कार ही या कवितेची जमेची बाजू आहे. इतरांसाठी सावली बनण्याची शशिकांत हिंगोणेकर यांची प्रामाणिक भावना ही या कवितेची खरी ताकद आहे. त्यातून झालेली कवीच्या नितळ मनाची अभिव्यक्ती या कवितेला अधिक प्रभावी बनवते, यात संदेह नाही.”\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- सतीश बडवे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825539576127,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Aajkal_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776923731"},{"product_id":"akhandit","title":"अखंडीत","description":"\u003cp\u003e‘अखंडीत’ हा शशिकांत हिंगोणेकर यांचा नवा कविता-संग्रह एकाच वेळी त्यांचं आत्मभान, समाजभान आणि विश्वभान व्यक्त करु पाहतो. म्हणूनच कवीच्या मनात भळभळणारी जखम ही त्याची एकट्याची नाही. तसेच त्याचा लढासुद्धा अंतर्बाह्य आहे. तो अमानुष जग बदलण्याची वाट पाहतोय. शक्यता-अशक्यतांच्या अलीकडे व पलीकडेही जगणारा हा कवी एकांताच्या प्रदेशातून व दुभंगून जातानासुद्धा विध्वंसाच्या उंबरठ्यावरील जगासाठी लढू पाहतोय. त्याच्या अखंडीत लढ्यातील त्याचं शस्त्र म्हणजे त्याची कविता. काळाचं विशिष्टत्व आणि अनंतत्व या दोहोंचं भान त्याला आहे. म्हणूनच कवी कधीतरी संपेल, पण त्याच्या माघारीसुद्धा त्याची कविता न्याय्य हक्कांसाठी लढत राहील, असा दुर्दम्य आत्मविश्वास कवीला आहे. माणसांच्या स्वप्नांवर बुलडोझर फिरत असताना कवितेचं संविधानिक शस्त्र तो चालवत राहतो. त्यासाठी नेहमी त्याला दुःखाचा रुमाल पिळून सुकवायचा असतो. निदान काही काळ तरी स्थितप्रज्ञ जगायचं असतं. हरवून गेलेल्या कविमित्रांना जागवायचं असतं. एका अथ ही कविता म्हणजे अस्वस्थतेचा अखंड जागर आहे. पण छलचक्राचा भोवरा फोडून अगदी ही लढाई संपेपर्यंत आणि कवीचं जीवन ओलांडूनसुद्धा लढत राहण्याची भाषा त्याची कविता करते. किंबहुना केवळ कवीचेच नव्हे, तर सध्याच्या व्यामिश्र आणि आभासी विश्वाचेही संजीवन बनण्याच्या आशेची भाषा ती बोलत राहते. \u003cbr\u003eशशिकांत हिंगोणेकर हे काय ताकदीचे कवी आहेत, याचा आणखी एक प्रत्यय म्हणजे त्यांचा ‘अखंडीत’ हा कविता-संग्रह!\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. राजा दीक्षित\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825543180607,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Akhandit_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776924061"},{"product_id":"aryakshari","title":"अर्थाक्षरी","description":"\u003cp\u003eआंतर्विरोधी भोवतालावर, समाजव्यवहारावर आत्यंतिक संवेदनशीलतेने भाष्य करणारे कवी म्हणून शशिकांत हिंगोणेकर यांची ओळख आहे. अत्यंत साध्या, सोप्या शब्दकळेतून भावगर्भ आशय प्रकट करणारी त्यांची कविता अस्वस्थ वर्तमानाच्या असंख्य ज्ञात- अज्ञात बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. युद्ध आणि तत्सम समाजसंहारी वास्तवाला प्रतिमित करताना ते धर्म आणि राजकारणाचा अमानवी चेहराही अधोरेखित करतात. माणसाच्या सार्वभौम अस्तित्वाला तडा देणाऱ्या अंत:कलहाला, अराजकाला ही कविता सामोरी जाते. माणसांविषयीची खोल आस्था या कवितेत एकवटली आहे. माणसाच्या प्रयोजनशून्य जगण्याचा तळठाव घेतानाच भाव-भावनांच्या कोवळ्या ऋतूनांही ही कविता प्रतिसाद देते. ही कविता अल्पाक्षरी असली तरी प्रत्येक शब्दांना कवीने आशयाचे व्यापक परिमाण दिले आहे. सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अनुभवांसकट ही कविता मानवी मनाच्या निर्लेप आंतरक्रियेलाही कवेत घेते आणि समतायुक्त निरामय जगण्याचे मनोज्ञ स्वप्न पाहते. ‘अर्थाक्षरी’ हा संग्रह म्हणजे कवीच्या व्यापक अशा आत्मचिंतनाचा, जीवनदृष्टीचा नितांतसुंदर आविष्कार आहे. या आविष्काराच्या मुळाशी सामाजिकता तर आहेच ; सोबतच मूल्यात्मक जाणिवेचे, सद्भावनेचे अनेक पदर आहेत. महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक स्वातंत्र्याविषयीचे आणि स्वाभिमानी जगण्याविषयीचे ठोस विधानदेखील आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- पी. विठ्ठल \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825555665215,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Athakshari_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776924410"},{"product_id":"sabhovatal","title":"सभोवताल","description":"\u003cp\u003e    प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक सभोवताल असतो. त्यात अनेक घटना, वस्तू, व्यक्ती, पर्यावरण अशा अनेक घटकांचा समावेश असतो. श्री. शशिकांत हिंगोणेकर कवी कलावंत आहेत. सभोवताली घडणाऱ्या घटना परिस्थितिनुरुप होणारी परिवर्तने याकडे ते संवेदनशीलतेने पहातात. कवी हिंगोणेकर यांच्यासाठी कविता म्हणजे प्राण आहे. आजूबाजूची विषमता, झुंडशाही, राजकारण अशा वातावरणाने ते अस्वस्थ होतात. या  त्यांच्या अस्वस्थतेपणालाही सांभाळणारी सखी कविताच होते. पण कधी असाही क्षण येतो अनुभूतीच्या अभिव्यक्तीची अनावर ओढ असूनही  काही सुचत नाही, शब्द रुसून बसतात. अशा या जीवघेण्या खेळात त्यांच्या कवितेचा श्वास गुदमरतोय. कधी कधी तर आपला प्राण असलेली कविता आपल्याला सोडून जाते की काय याचे भय त्यांना वाटते. “कवितेशिवाय मी पडलो अंधाराच्या कालकोठडीत” ही भावना क्रमाने प्रबळ होत जाते आणि शेवटी “सारे श्वास, कवितेच्या हवाली करुन, मी मुक्त होऊन जाईल, या अवकाशातून” या शब्दांत कवी आपली हतबलता दर्शवतात. कवी मनाची तगमग, ती व्याकुळता शब्दांकित करताना अनुभवाचा सच्चेपणा व  झाड, रिंगण, वाळवी  अशा  तरल भावस्पश प्रतिमा यामुळे कवी मनाने टिपलेला हा सभोवताल मनावर ठसतो. \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा. डॉ. सुनीता सांगोले\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eअधिष्ठाता,\u003cbr\u003eमराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर,\u003cbr\u003eअमरावती\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825556189503,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sabhovatal_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776924667"},{"product_id":"sarvabhaum","title":"सार्वभौम","description":"\u003cp\u003eकवितेचे दृश्यमान परिप्रेक्ष म्हणजे अदृश्यमान अस्वस्थतेचे सर्जनात्मक बीजरोपण होय. कविता दृश्यरूप धारण करते त्यावेळेला तिचे असणारे छोटेसे अस्तित्त्व प्रदीर्घ विचारचिंतन पटलावरील असंख्य केंद्रांमधून प्रसवलेलं सारगर्भ रूप असते. सार्वभौम या कवितासंग्रहातील कवितांना अशा विस्तीर्ण विचारचिंतनाच्या पटलावरील प्रत्येक केंद्रांना स्पर्शन्याचा अनुभूतीजन्य अस्सल अनुभव प्राप्त झाल्याचे स्पष्टपणाने दिसते. त्यामुळे कवितेचे आयाम वैविध्यतेने सक्षम होतांना दिसतात.\u003cbr\u003eशशिकांत हिंगोणेकरांची मूलगामी प्रकृती सातत्यपूर्ण चिंतनगर्भ वलयात वात वारंवार मुशाफिरी करण्याची असल्याने ते कवितेशी तादात्म्य पावतांना दिसतात. त्यांच्यातील आतील बाहेरील असणारा काव्यभाव हा पूर्णपणे कविताच असल्यामुळे कवी नेहमीसाठीच कविता होतांना दिसतो. या कवितासंग्रहाच्या निमित्ताने हिंगोणेकर प्रभावीपणाने काव्याच्या सार्वभौम मार्गाला प्रस्थापित करतांना दिसतात. त्यामुळे काव्याचे सार्वभौमत्व अधिष्ठित होण्यासाठी त्यांच्या कविता लेखनाला अनेकानेक शुभेच्छा !\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रा.डॉ.म.सु.पगारे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसंचालक, भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र, \u003cbr\u003eवरिष्ठ प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख.\u003cbr\u003eसंचालक, विचारधारा प्रशाळा,क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825557434687,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sarvabhoum_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776924849"},{"product_id":"sarvakal","title":"सर्वकाल","description":"\u003cp\u003e    सर्वकाल या शशिकांत हिंगोणेकर यांच्या कवितासंग्रहातील कविता आकाराने लहान असल्या तरी त्या आशयाने समृद्ध आहेत हे लगेच जाणवते. सर्वकाल हे वैशिष्ट्यपूर्ण शिर्षकही आतील कवितांचे विश्व गोचर करण्यास समर्थ आहे. कवीला कसलीही घाई नाही. तो म्हणतो शब्दांचे हे अंकुर हळुहळू वाढताहेत. क्षणात शब्दांचे झाड मोठे व्हावे याची कुठलीही घाई नाही मला. ज्या मातीत शब्द उगवलेत त्या मातीत ओल कशी राहील याचीच काळजी छळतेय मला ही कविता अल्पाक्षरी असली तरी वाचकास विचार करायला लावणारी आहे. कवी जीवनाबद्दल निराश नाही आहे. आपल्या कवितेच्या मातीत सातत्याने ओल कशी राहील ही जाणीव कवी जपत आहे.याचा अर्थ कवी जरी आंबेडकरी कवितेची मशाल घेऊन निघाला असला तरी तो इथे मात्र संयत भूमिका घेऊन जीवनाला कवटाळण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कवितासंग्रहातील एकूणच कवितेत ही संयत भूमिका कवीने घेतलेली दिसते. अर्थात कवी शशिकांत हिंगोणेकर यांचा विद्रोह नेहमीच संयत राहिलेला आहे. प्रश्न मांडण्यावर त्यांचा भर असतो. या कवितासंग्रहात तर कवी शशिकांत हिंगोणेकर हे इतर संग्रहांच्या तुलनेने अधिकच चिंतनशील झालेले दिसतात. हिंगोणेकरांची कविता बाह्यशक्ती पेक्षा अंतर्मनाशी संवाद साधण्यात अधिक रमतांना दिसते. त्यांना काळजातल्या तळघराची ओढ आहे. तिथेच त्यांना मनःशांती प्राप्त झाल्याचे जाणवते. हिंगोणेकरांची कविता कितीही संघर्षशील असली तरी त्यांच्या भाषेचा पोत कधीही बिघडताना दिसत नाही. तो नेहमीच संयमित राहिलेला आहे. हिंगोणेकर कवितालेखन विपुल प्रमाणात करीत असले तरी त्यांच्या काव्यात्म जाणीवा मात्र स्थीर राहिलेल्या आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- उत्तम कोळगावकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825723601215,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sarvakal_ShashikantHingonekar_6x9_1.jpg?v=1776924826"},{"product_id":"sarvatra","title":"सर्वत्र","description":"\u003cp\u003eशशिकांत हिंगोणेकर काव्यक्षेत्रातील न टाळता येणारं नाव ! 20-25 कवितासंग्रहांच्या पसाऱ्यात छलचक्र आणि अंतःस्वर नंतरचा ‘सर्वत्र’ हा तिसरा हायकूसंग्रह आहे. दीर्घ कविता आणि हायकूसारखी अतिलघु कविता हे कवी अतिशय संवेदनशीलतेने आणि ओघवत्या शैलीत लिहितात. काटा टोचला की डोळ्यातून आसवथेंब आपोआप गळतो, तसा या हायकूकाराच्या हातून हायकू लिहून पूर्ण होतो ! हे हायकू कल्पनेने वा उपदेशात्मक लिहिलेले नाहीत, तर रोजच्या जगण्यातील वास्तव मांडणारे आहेत. हायकूचा वास्तवतेचा मुख्य गुण घेऊन हे हायकू आलेले आहेत. जीवनातले चिरंतन सत्य जे सर्वसमावेशक आहे, त्याची अनुभूति या हायकूंतून घेताना जीव व्याकूळतो. कुठे बुडाले \/ मनातले चांदणे \/ दहशतीने असो कि, गिधाड थवे \/ उचलून नेतात \/ स्वप्नांची प्रेते इतकी दाहक वास्तवता इवल्या हायकूतून भेटीला येणे कल्पनातीत आहे. पानभर कविता लिहून येणार नाही ती आशयाची गहनता मोजक्या 17 वर्णांत येते. हे हायकूकार आणि कवी मनोरंजनासाठी शब्दांची माळ जपत नाहीत, तर संयमितपणे काळजात खोल रुतणारे शब्दबाण घेऊन चक्रव्यूह भेदण्याचा यत्न करताना दिसतात. हायकूचा आत्मा म्हणजे भोवतालची सृष्टी. ही सृष्टीदेखील या हायकूंतून आगळावेगळा संदर्भ घेऊन येते. इथली पानं फुलं मनाला रिझवत नाहीत, तर तेही माणसाचं जिणं जगतात. कुठली गाणी \/ पक्षी गात आहेत \/ पाने गळती वा फुले गळाली \/ मातीही सुगंधली \/ थरथरली सर्वसामान्य माणसांचे जगणे सुगंधीत हवेतही  कवी विसरत नाहीत. जगण्यातील दाहक वास्तव, हायकूचा बाज सांभाळून, मराठीत प्रथमतः शशिकांत हिंगोणेकर यांच्याच हायकूतून दिसून येते. दहशतीचा\/ थरकाप उडतो \/ जीभ छाटतो  किती गहन अर्थ सामावला आहे यात! इतके दाहकपण असूनही हायकूकार आशावादी आहेत. सरते रात्र \/ रोज नव्या दु:खाची \/ पहाट होते सारखी प्रेरक हाक गलितगात्र झालेल्या जीवाला देऊन जगण्याची उमेद जागवतात. खचितच, हा हायकू माणसांच्या जगण्याचा सारांश म्हणून हायकू क्षेत्रात वाखाणला जाईल.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- तुकाराम पुंडलिक खिल्लारे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825727074623,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Sarvatra_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776925500"},{"product_id":"tuze-aakasha","title":"तुझे आकाश","description":"\u003cp\u003eकवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या प्रारंभीच्या हळुवार जाणीवेच्या कवितांचा हा संग्रह ‘तुझे आकाश’.\u003cbr\u003eहे आकाश तिला दिलेले असले तरी ते सर्व काव्यरसिकांना आपले वाटेल. \u003cbr\u003eया आकाशात जसे पक्षी, स्वप्नफुले, नक्षत्रतारका आहेत तसेच विजा आणि तुफान देखील आहेत. \u003cbr\u003eपण हे आकाश \u003cbr\u003eआपल्याला \u003cbr\u003eउजेडाच्या वाटा \u003cbr\u003eनिश्चितच देईल.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- हेमंत गोविंद जोगळेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825729270079,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/TejheAakash_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776925969"},{"product_id":"uthavache-tapta-divas","title":"उठावाचे तप्त दिवस","description":"\u003cp\u003e    ‘उठावाचे तप्त दिवस’ हा शशिकांत हिंगोणेकरांचा अठ्ठावीसावा कवितासंग्रह आहे. शिवाय  नऊ कवितासंग्रह ‘आगामी’च्या  रांगेत आहेत. म्हणजे कवितेचा नित्य रियाज करणारे हिंगोणेकर हे मराठी पटलावर स्थिर झालेले कवी आहेत. त्यांनी सातत्याने आणि निष्ठेने कविता लेखन केले आहे.\u003cbr\u003e    ह्या संग्रहात व्यवस्था विरोधातील विद्रोह अत्यंत संयतपणे पानोपानी उजागर झाला आहे. ही कविता वंचितांची आदिम वेदना धुंडाळताना दुःखाच्या मुळांचा शोध घेते. कवीचा कवितेशी घडणारा संवाद हे या रचनांचे विशेष आहे. एकांताला फुलपाखराचं लोभस रुप देऊन न्याहाळणे असो की दुःखाचा शेजारधर्म निभावणे असो, लीलया घडत गेल्यामुळे ठणकणाऱ्या दुःखाची कविता अवतरली आहे. तसा प्रत्येक कवी भोवतालाचं अपत्य असतो. जगण्यातील अभावग्रस्तता, शोषणाची जाणीव इथे शब्दाशब्दांतून ध्वनित होते. अंधारलेल्या भिंगुळवाण्या वाटेवर अत्त दीप भवचा मार्ग कवितेला एक अधिष्ठान प्राप्त करून देतो. ही अल्पाक्षरी कविता सहज स्वाभाविकपणे बोलताना संवादी होत जाते. हा उठाव तप्त असला तरी समंजस आणि परिपक्व आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- दासू वैद्य\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825740968255,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/UthavacheTaptaDivas_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776926763"},{"product_id":"ya-navya-vartmanat","title":"या नव्या वर्तमानात","description":"\u003cp\u003eकवी शशिकांत हिंगोणेकर हे समकालीन आंबेडकरी काव्यप्रांतातील महत्त्वपूर्ण नाव आहे. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी सामाजिक परिवर्तन, संघर्षशील जीवनदृष्टी आणि सौंदर्यभान यांचे संयमितपणे काव्यरूप साकारले आहे.  \u003cbr\u003e‘या नव्या वर्तमानात’ या कवितासंग्रहात त्यांच्या आंबेडकरवादी जीवनदृष्टीची आणि वैयक्तिक तसेच सामाजिक भावव्याकुळतेची मोहक अभिव्यक्ती दिसून येते. त्यांच्या कविता वैयक्तिकतेच्या तरलतेतून सामाजिक भान आणि सृष्टिसंवादी भावनांचा संगम साधतात.  \u003cbr\u003e‘श्वासात ओल नाही \/ तरीही काळजात \/ झरे पाझरतात’ या काव्यपंक्तीतून ऋतुचक्राचे संवेदनशील चित्रण होते, तर ‘मावत नाहीय दुःख \/ माझ्या कवितेच्या ओळीत’ अशा ओळींतून त्यांच्या अंतर्मनातील अस्वस्थता प्रकटते. त्यांच्या कविता रणरणत्या वास्तवावर प्रकाश टाकत ‘कविता नेहमीच झालीय \/ उन्हात पोळलेल्यांसाठी सावली’ अशी संवेदना मांडतात.  \u003cbr\u003e‘या नव्या वर्तमानात’ मधील कविता समकालीन परिस्थितीचे आव्हान स्वीकारून सामाजिक परिवर्तनासाठी लढा देणाऱ्या प्रेरणादायी कलाकृती आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमराठी विभागप्रमुख\u003cbr\u003eराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52825752764735,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/YaNavyaVartamanat_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776927587"},{"product_id":"shashikant-hingonekar-yanchya-navya-kavitasangra-2024","title":"शशिकांत हिंगोणेकर (सम्यक जाणिवेचे १० कवितासंग्रह)","description":"","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52832537018687,"sku":null,"price":1500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Book_Box_Cnvt_1.jpg?v=1776946161"},{"product_id":"kavita-tuzi-mazi","title":"कविता तुझी माझी","description":"\u003cp\u003eइतकं का\u003cbr\u003eसोपं असतं\u003cbr\u003eकविता जगणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकवितेचा जन्म\u003cbr\u003eम्हणजे एक धगधगती\u003cbr\u003eअग्निपरीक्षाच तर असते\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52833294549311,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/1_KavitaTuziMazi_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776941293"},{"product_id":"alikade","title":"अलीकडे","description":"","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52833446166847,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/2_Alikade_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776941552"},{"product_id":"mazahi-swar","title":"माझाही स्वर","description":"","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52833466351935,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/3_MazahiSwar_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776941758"},{"product_id":"yuddha-suruch-aahe","title":"युद्ध सुरूच आहे","description":"\u003cp\u003eजगण्याचीच\u003cbr\u003eझालीय कविता\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतूच तर दिलाय\u003cbr\u003eमाझ्या कवितेला नवा अर्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुझेच विचार घेऊन\u003cbr\u003eलढतेय माझी कविता\u003cbr\u003eया जुलमी व्यवस्थेशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहामानवा,\u003cbr\u003eअजूनही\u003cbr\u003eमाझे युद्ध सुरूच आहेय\u003cbr\u003eप्रजासत्ताक होण्यासाठी\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52833781186879,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/4_YuddhaSuruchaAahe_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776942206"},{"product_id":"nirnayak","title":"निर्णायक","description":"\u003cp\u003eदहशती हंगाम\u003cbr\u003eसर्वत्र सळसळतोय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझी तलवार\u003cbr\u003eगंजून गेलीय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eढालही\u003cbr\u003eतुटून पडलीय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला शरणाथ बनवण्याची\u003cbr\u003eजय्यत तयारी सुरूय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुठल्याही परिस्थितीत मला\u003cbr\u003eलढायचेच आहेय\u003cbr\u003eया निर्णायक युद्धात\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52834332836159,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/5_Nirnayak_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776942383"},{"product_id":"abhivyakta","title":"अभिव्यक्त","description":"\u003cp\u003eखूप गद झालीय\u003cbr\u003eसाऱ्याच दु:खांना\u003cbr\u003eमाझ्या कवितेतून\u003cbr\u003eअभिव्यक्त होण्याची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकेक दु:खाला\u003cbr\u003eमी भेटतोय हळुवारपणे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजातोय खोलवर\u003cbr\u003eदुःखाच्या तळाशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतळघरातले\u003cbr\u003eमाझे जगण्याचे पाणीही\u003cbr\u003eगायब होतेय अलीकडे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळ्या ऋतुंची\u003cbr\u003eटोकदार काळी फुलेही\u003cbr\u003eउगवून आलीयेत माझ्या\u003cbr\u003eकवितेत सर्वत्र अभिव्यक्तीसाठी.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52834818916671,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/6_Abhivyakta_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776943312"},{"product_id":"sarvatrik","title":"सार्वत्रिक","description":"\u003cp\u003eरोज नवा जन्म\u003cbr\u003eरोज नवी अनुभूती\u003cbr\u003eजगण्याची दमदार\u003cbr\u003eसक्ती आहेय दहशती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमरणाची दारे\u003cbr\u003eबंद केलीयेत\u003cbr\u003eगुलामीचे नवे पर्व\u003cbr\u003eछळतेय अवकाळी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोण\u003cbr\u003eकुठले हिशेब\u003cbr\u003eलिहिण्यात मश्गूल आहेत\u003cbr\u003eस्वातंत्र्याचा अमृतकाल\u003cbr\u003eछलकाल होऊन बसलाय छातीवर\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52835149742399,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/7_Sarvatrik_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776943711"},{"product_id":"samuchit","title":"समुचित","description":"\u003cp\u003eकुठल्याही शस्त्रापेक्षा\u003cbr\u003eधारदार झालीय माझी कविता\u003cbr\u003eकुठल्याही क्षणी\u003cbr\u003eती जाऊ शकते\u003cbr\u003eया छळव्यवस्थेच्या आरपार\u003cbr\u003eसमुचित कवितांचा\u003cbr\u003eएक तप्त समुहच झालीय\u003cbr\u003eमाझी कविता आजकाल\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52835489775935,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/8_Samuchit_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776944038"},{"product_id":"nave-parva","title":"नवे पर्व","description":"\u003cp\u003eही जी कविता\u003cbr\u003eअवतरते आहे ना\u003cbr\u003eमाझ्या अंतरंगातून\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eती सर्वकाल\u003cbr\u003eभावणारेय जगाला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअल्पाक्षरी\u003cbr\u003eजरी असली तरी ती\u003cbr\u003eअल्पायुषी निश्चितच नाहीय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी चर्चा सुरूय\u003cbr\u003eमाझ्या कवितेबद्दल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी नेहमीच तटस्थ राहतोय\u003cbr\u003eया चर्चेतून\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणूनच\u003cbr\u003eकवितेचे रोज नवे पर्व\u003cbr\u003eअवतरतेय माझ्या मनात\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52835701981503,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/9_NaveParva_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776944263"},{"product_id":"aata-tari","title":"आता तरी","description":"\u003cp\u003eहा जो भूतकाळ\u003cbr\u003eवारंवार येतोय मला भेटायला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याच्या चेहऱ्यावर\u003cbr\u003eदिसत असतात मला\u003cbr\u003eवेदनेचे काळे चट्टे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी जगतोय\u003cbr\u003eवर्तमानासोबत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर वर्तमानही\u003cbr\u003eअधिकच उदासलाय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या भविष्याचा\u003cbr\u003eचेहराच गायब करण्याच्या\u003cbr\u003eहालचाली जाणवताहेत मला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआता तरी\u003cbr\u003eसारी शक्ती एकवटून\u003cbr\u003eलढायला हवेच\u003cbr\u003eया जुलमी काळ्या व्यवस्थेविरूद्ध\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52835862774079,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/10_AataTari_ShashikantHingonekar_1.jpg?v=1776944412"},{"product_id":"shashikant-hingonekar-yanchya-navya-kavitasangra-2025","title":"शशिकांत हिंगोणेकर - संयत अनुभूतीचे अक्षरलेणे (१० कवितासंग्रह संच)","description":"","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52836346954047,"sku":null,"price":1000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Book_Box_1.jpg?v=1776946095"},{"product_id":"kavyankur","title":"काव्यांकुर","description":"\u003cp\u003eकु. रुपालीचा हा कवितासंग्रह म्हणजे नवोदित कवयित्रीचा स्त्रीसुलभ भावाविष्कार. ‘काव्यांकुर’ मधील कविता वाचताना तिच्या भावनाशील मनाचा भाबडेपणा मला खूप आवडला.\u003cbr\u003eमराठी साहित्यावर अतोनात प्रेम असले तरी प्राधान्याने तिचा पहिला साहित्य-श्वास कविताच आहे, हे तिच्या मराठी भाषा, कविता, शब्द... या संदर्भातील कवितांमधून जाणवते. आणि म्हणूनच तिने स्वतःसाठी ‘काव्याली’ हे टोपणनाव निवडले असावे.\u003cbr\u003eआणखी सखोल वाचन, चिंतन, मनन, अनुभवसमृद्धतेतून कु. रुपालीची कविता उत्तरोत्तर अधिकाधिक आशयसंपन्न, भावसंपन्न होऊन भविष्यकालीन साहित्यनिर्मितीस हार्दिक शुभेच्छा व शुभाशिर्वाद!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- मधु पांढरे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिक \u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52849890263359,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Kavyankur_RupaliKailasMali_1.jpg?v=1777032280"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}