{"title":"कथा आणि कादंबरी","description":"","products":[{"product_id":"कथा-जनाच्या-व्यथा-मनाच्या","title":"कथा जनाच्या व्यथा मनाच्या","description":"\u003cp\u003eशिक्षकाची भूमिका ही समाजनिरीक्षकाची असते. समोर असणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्याथ वर्गापुरती ही भूमिका मर्यादित राहू शकत नाही तर आपल्या भोवतालातील बरे-वाईट, आंतरिक पातळीवर अस्वस्थ निर्माण करणारे घटनाप्रसंग, व्यक्ती यांच्याकडेही एक संवेदनशील आणि विचारी समाजघटक म्हणून शिक्षक पाहत असतो. याची प्रचीती सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजी साळुंके यांच्या सदर कथासंग्रहातून प्रभावीपणे येते. हा शिक्षक-लेखक कधी व्यक्तीच्या जीवनकहाणीपासून कथेला सुरुवात करतो, कधी हुंडाबळी, बलात्कार अशा तात्कालिक घटनांमधून कथानकाला चालना मिळते, कधी गावखेड्यातील उलथापालथी प्रसंगचित्रण व वातावरणनिर्मिती यांना आपसूक वाट मोकळी करून देतात, कधी जातपात, आंतरजातीय विवाह यांना चर्चेच्या केंद्रस्थानी आणून सामाजिक वास्तवाच्या भयावह रूपाचे दर्शन घडवले जाते तर कधी मुक्त चिंतनाव्दारा ललित गद्याचा भावप्रत्यय देतात. वर्गातील शिक्षकाकडून समाजशिक्षकाच्या व्यापक भूमिकेकडे झुकणारा या कथालेखकाचा पिंड आपले लक्ष वेधून घेणारा आहे. म्हणून तर सदर पुस्तकाचे शीर्षक ‘कथा जनाच्या व्यथा मनाच्या’ हे आहे. आपला जीवनानुभव त्याच्या अस्सल प्रत्ययासह आणि आंतरिक आचेसह अभिव्यक्त करणाऱ्या या लेखकाच्या सदर पुस्तकाचे हार्दिक स्वागत आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- आशुतोष पाटील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52788992213311,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KathaJanachyaVyathaManachya_ShivajiSalunke_1.jpg?v=1776260901"},{"product_id":"khandemalani-kathasangrah","title":"खांदेमळणी (कथासंग्रह)","description":"\u003cp\u003eजागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती ग्रामीण संस्कृती वेगवेगळ्या अंगाने प्रभावित झाली आहे.हा झालेला बदल कलेतून आणि साहित्यातून मांडण्याचा प्रभावी प्रयत्न दोन दशकांपासून सुरू झालेला आपणास दिसतो.\u003cbr\u003e‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह त्याचे प्रातिनिधिक उदाहरण होय. ग्रामीण जीवनात झालेल्या सामाजिक, राजकीय, सांकृतिक किंवा भाषिक बदलाची सूक्ष्म दखल हा कथासंग्रह घेताना आपणास दिसतो. ‘खांदेमळणी’ या कथासंग्रहात लेखक कोणतेही भडक भाष्य किंवा विधान करीत नाही किंवा ग्रामजीवनाचे फार तपशील मांडत नाही तर ग्रामीण जीवनातील सर्व पातळ्यांवरील सूक्ष्म वस्तुनिष्ठता टिपते. व्यक्तिरेखेतील विविधता, नात्यातील ताणतणाव, सामाजिक-राजकीय जीवनातील पेच, त्यातील अंतर्गत संघर्ष, जीवनाचे विविधांगी बदलते स्वरूप अस्सल भाषेतून मांडणे हे अनंता सूर यांना लिलया जमले आहे. ग्रामीण कथेचा जो एकूणच परीघ आहे तो या कथासंग्रहामुळे नक्कीच विस्तारल्या जाणार आहे. अनंता सूर यांच्या भविष्यातील कथा अधिक प्रगल्भ आणि परिणत होऊन येईल याची आश्वासक खात्री ‘खांदेमळणी’ हा कथासंग्रह आजच आपणास देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रमोदकुमार अणेराव\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789060043071,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Khandemalani_AnantaSur_1.jpg?v=1776263258"},{"product_id":"khandeshatil-varkari-sampraday","title":"खान्देशातील वारकरी संप्रदाय","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे. म्हणूनच आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही वारकरी संस्कृती आपले अस्तित्व टिकवून आहे. अठरा पगड जातीचे, विविध धर्मपंथाचे लोकं वारकरी संप्रदायाने जवळ केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसामान्यांच्या पर्यंत वारकरी संप्रदायाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. वैभवशाली व सर्व समावेशक असणाऱ्या वारकरी संप्रदायाची, संतांच्या मूल्याधिष्ठित व मानवतावादी साहित्याची परंपरा खान्देशातही महत्त्वाची ठरलेली आहे. खान्देशच्या भूमीत निर्माण झालेले संत, कीर्तनकार, प्रवचनकार, महत्त्वाचे मठ, संस्थान यांचे कार्य मोलाचे आहे. खान्देशातील वारकरी सांप्रदायिक संतांनी निर्माण केलेली आध्यात्मिक लोकशाही, मानवता, सर्वधर्मसमभाव वृत्ती, सामाजिक समरसता, डोळस भक्ती याचा परामर्श घेता यावा. या हेतूने प्रेरित होऊन खान्देशातील वारकरी संप्रदाय या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे. यात खान्देशातील वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे मठ, संस्थान यांचे कार्य व परंपरा. खान्देशातील वारकरी संतांचे समाज प्रबोधन व वाङ्मयीन कार्य, खान्देशातील महत्त्वाच्या कीर्तनकारांचे भक्ती प्रबोधन, समाज प्रबोधन व दिशादर्शक कार्य याविषयीचा परामर्श घेतलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52789089141055,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/KhandeshatilVarkariSampraday_DineshPatil_Bhalod_1.jpg?v=1776263643"},{"product_id":"single-by-choice","title":"सिंगल, बाय चॉइस","description":"\u003cp\u003eप्रत्येक शिक्षक हा जातिवंत शिक्षक असतोच. पण तो विद्यार्थ्याचा पालक ही असतो. दोन्ही भूमिका तो एकाच वेळी बजावत असतो. किंबहुना तो पालक अधिक असतो. म्हणून विद्यार्थ्यांबद्दल वात्सल्याचा पान्हा त्यांना अगोदर फुटतो. नेमलेल्या पाठ्यपुस्तकांमधील नियोजित विषयांचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यात तो हमखास सफल होतो. त्याचं कारण, त्याचं अध्यापन कौशल्य एवढंच नाही, तर त्याबरोबर त्याचं शिष्यवात्सल्य हेही आहे. आपल्यावर सोपवलेलं काम निष्ठेने व नियमितपणे करणं. आपलं अध्यापन कौशल्य पणाला लावून अपेक्षित ज्ञान विद्यार्थ्यांकडे संक्रमित करणं, ते त्याला अवगत करता आलं की नाही, याची चाचपणी म्हणून अधूनमधून चाचणी परीक्षा घेणं, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अधिकाधिक सुधारणा घडवून आणणं, विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करणं, त्याचबरोबर त्याच्यामधील चिकित्सा वृत्तीलाही प्रोत्साहन देणं, वारंवार प्रतिप्रश्न विचारून शंकासमाधान करून घेण्यास त्याला प्रवृत्त करणं, विषय-ज्ञानाबाबत त्याला आपल्या पातळी पर्यंत आणून पोचवणं, आपल्याशी चर्चा करण्याएवढा त्याचा आत्मविश्वास वाढवणं ही झाली शिक्षकाची एक बाजू. पण या निमित्तानं जवळ आलेल्या विद्यार्थ्याच्या व्यक्तित्वाचे विविध कंगोरे साक्षेपानं साफसूफ करून घेणं, त्याच्यातल्या सुप्त गुणांना विकासासाठी वाव देणं, एकूण त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला मदत करणं, जग व जीवन याबद्दलची डोळस जाण त्याच्यामधे उत्पन्न करून हळूहळू वाढवत नेणं, तो एक परिपूर्ण नागरिक बनेल या दृष्टीनं त्याच्या वाढीकडं लक्ष पुरवणं ही शिक्षकाची दुसरी बाजू. यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. फक्त पालकाचं अंतःकरण असावं लागतं. समोरचा मुलगा हा आपला विद्याथ आहे असं मानलं, तर गुरूशिष्यांच्या नात्यात रूक्षपणा येतो. अंतर उत्पन्न होतं अन् तो एकदा परीक्षेत उत्तीर्ण किंवा अनुतीर्ण झाला, की त्याच्याशी असलेलं शिक्षकाचं नातं संपुष्टात येतं. विद्यार्थ्याऐवजी तो आपला पाल्य ही दृष्टी एकदा स्वीकारली, की संबंधात ओलावा निर्माण होतो व अभ्यासाव्यतिरिक्तच्या वेळाकडं व अवस्थेकडं लक्ष पुरवावंसं वाटतं. शिष्यांचं जाऊन तिथं पितापुत्राचं नातं आकार घेऊ लागतं. या नात्यामध्ये ते एकमेकांमधल्या उणिवा दूर करतात व एकमेकांच्या निकोप वाढीस साहाय्यभूत होतात.\u003cbr\u003eतेव्हा शिक्षकांच्या या दोन्ही बाजूंचा आपण अभ्यासू नजरेनं विचार करायला हवा !\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793244516671,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/SingleByChoice_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776334505"},{"product_id":"tasadibaddal-kshamaswa","title":"तसदीबद्दल क्षमस्व","description":"\u003cp\u003eचंद्रकांत भंडारी यांचा आरसा म्हणजे त्यांचा नायक - ‘सूर्यकान्त अमळनेरकर’! तोही त्यांच्यासारखाच अमळनेरचा. पेशाने शिक्षक. शिक्षकी वातावरणात, पुस्तकांच्या सान्निध्यात आणि साध्या जगण्यात जीवनाचं सुख शोधणारा. त्याला एक मुलगी आवडते. तो तिला तसं सांगतोही. त्यासाठी काही पत्रे लिहितो. त्याचा मित्र ती पत्रे तिच्यापर्यंत पोहोचवतो. मात्र, त्या वयाला शोभणारा राग, अवघडलेपण ‘तिला’ वाटतं. ती संपर्क कमी करते आणि इथे ‘सूर्यकान्त’च्या प्रेमाचा उगवता सूर्य मावळतो. आपल्यामुळे तिला त्रास झाला, तिचं मन दुखावलं या विचाराने तिच्यापेक्षा जास्त त्याचं मन दुखावतं आणि ती सल घेऊन तो महाविद्यालयातून बाहेर पडतो. परंतु, आपला हा अश्वत्थामा पुढे आयुष्यभर तिला शोधत ती ठसठसती जखम घेत तसाच फिरत राहतो. इतकंच नाही, तर आपल्या पत्नीला मोकळेपणाने सर्व सांगतो. ती देखील परिस्थिती समजून घेते त्याला साथ देते आणि त्याच्या शोधाला आडकाठीही घालत नाही. मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप वगैरे नसलेल्या त्या काळात सुटलेली साथ. नाव सोडून कोणतीही माहिती जवळ नाही. अशा स्थितीत तो तिला कसं शोधतो? ती त्याला सापडते का? सापडली असेल तर तो तिला ‘तसदीबद्दल क्षमस्व!’ असं म्हणतो का? आणि ती त्याला क्षमा करते का? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी वाचण्याची प्रेमळ ‘तसदी’ घ्यायला हवीच!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- मयूर भावे, पुणे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e(लेखक, वक्ते व पत्रकार)\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52793255952703,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/TasdibadalShamaksha_ChandrakantBhandari_1.jpg?v=1776334822"},{"product_id":"yethe-amcha-shwas-kondto-ahe","title":"येथे आमचाही श्वास कोंडतो आहे! (काव्यसंग्रह)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eप्रभूच्या कवितेविषयी...\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e    प्रभू राजगडकर हे आदिवासी मराठी साहित्यप्रवाहातील पहिल्या पिढीतले एक महत्त्वाचे कवी आहेत. प्रस्तुत कवितासंग्रहातील त्यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक व राजकीय पर्यावरणातील बदलत्या घडामोडींचे आणि आदिवासी समूहाच्या अस्तित्वाला छेद देऊ पाहणाऱ्या विचार-मानसिकतेचे अंत:स्थ हेतू प्रकट करणारी व त्याविरोधात उलगुलानचे नवे भान देणारी कविता आहे. \u003cbr\u003e    ही कविता फॅसिस्ट प्रवृत्ती आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या विरोधात आहे. म्हणूनच या कवितेत सर्वप्रकारच्या अधोगामी वृत्तीची भलावण करणाऱ्या छद्म राजसत्तेच्या व व्यवस्थेच्या धुरिणांकडून ऊर्ध्वगामी तत्त्वविचारांचा केला जाणारा संकोच आणि जल, जंगल, जमीन या नैसर्गिक स्रोतांवर आपली पिढीजात अधिसत्ता असलेल्या आदिवासींच्या जगण्यातील कोंडी अनुभवणारा श्वास - ‘विचार’ आणि ‘जगणे’ - अशा द्विविध पातळ्यांवरील एकूणच संघर्षाशी निगडित आहे. हा संघर्ष आदिवासी समूहांच्या केवळच आर्थिक जगण्याशी संबंधित नसून तो त्यांच्या जगण्यातील भावजीवनाशी आणि सांस्कृतिक मूल्यजाणिवांशीही जुळलेला आहे. \u003cbr\u003e    याच अंगाने या कवितेत फॅसिस्ट प्रवृत्तीच्या धोरणांनी मानवी कल्याणाची विचारसरणी आणि आदिवासी समूहांचे जगणे या दोहोंच्या वाट्याला येणाऱ्या कोंडीतून उद्भवलेले गुदमरणे तीव्रपणे अधोरेखित झाले आहे. या अधोरेखनात समकालीन राजकारण, नवभांडवली वृत्ती, आदिवासी समूह आणि त्यांचे नैसर्गिक हक्क व त्यांचे भावजीवन यांच्यातील आंतरसंबंध व आंतरसंघर्षाच्या अनेकविध कडा आणि नवभांडवली अधिसत्तेचा राजसत्ताक व्यवस्थेसोबत अर्थव्यवहाराच्या पातळीवरील असलेला छुपा अजेंडा आहे. त्यातून नैसर्गिक अधिवासात आपले जीवन जगणाऱ्या आदिवासी समूहांच्या वाट्याला विकासाच्या नावावर येणारी घुसमट, त्यांचे उद्ध्वस्तीकरण व त्यांचे मरण... असा या कवितेचा संवेद्य परीघ आहे.\u003cbr\u003e    म्हणूनच आजच्या बदलत्या वातावरणात नवभांडवली राजसत्ता आणि कार्पोरेट जग यांच्या युतीचा अमानवी चेहरा लक्षात घेऊन त्यातून आकाराला आलेल्या दुष्ट धोरणांचे फलित म्हणून आदिवासी समूहांच्या वाट्याला येणारे विनाशाच्या समकालीन वास्तवाचे अनेक प्रस्तर नेमकेपणाने उलगडून दाखवणारी या संग्रहातील कविता आपल्या समकालीन आदिवासी मराठी कवितेतील एक महत्त्वाचे प्रकटन आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- प्रो. डॉ. अशोक नामदेव पळवेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52802938503487,"sku":null,"price":446.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/YetheAmchaShwasKondtoAhe_RajgadkarSir_1.jpg?v=1776419983"},{"product_id":"aadhalimadhali-pane","title":"अधलीमधली पाने","description":"\u003cp\u003eद्यायचंच असेल, तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत, आयुष्यात कणभर सुखासाठी मणभर दुःख झेलावं लागतं म्हणून सांगतो. कुणी संत, महंत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय, तर वेदनेच्या वाटेने चालणारा तू जगात काही एकटा अन् एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":52805950406975,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AadhaliMadhaliPane_Chavhan_20261_1.jpg?v=1776499376"},{"product_id":"bhatkan","title":"भटकन","description":"\u003cp\u003e'भटकन' या कादंबरीमध्ये लेखक रविंद्र भास्कर सोनवणे यांनी आपले अनुभव, संघर्ष आणि ग्रामीण जीवनातील भावनिक पैलूंना हृदयस्पर्शी शब्दांत गुंफले आहे. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा आरसा असून, कष्टकऱ्यांच्या वेदनांना शब्दरूप देणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखकाच्या भटकंतीतील संघर्ष, पाण्यासाठीचा आटापिटा, कुटुंबातील त्रासदायक घटना, आणि शिक्षणासाठी झगडताना आलेल्या अडचणी यांचे भावपूर्ण चित्रण वाचकांना अंतर्मुख करते.\u003cbr\u003eचांभारवाड्याच्या दुर्गंधीत काम करणाऱ्या हातांना स्वाभिमानाचे बळ देत लेखकाने उभे केलेले जीवन प्रेरणादायी आहे. पुस्तकाच्या पानांमध्ये विविध भाषांची आणि लोकजीवनाची छटा आढळते. पिढीजात व्यवसायातील तडजोडी, सामाजिक अवहेलना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळत लेखकाने आपले स्वप्न साकारले आहे.\u003cbr\u003eही कादंबरी संघर्षाची गाथा असून, वाचकांच्या मनाला स्पर्श करून जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. ग्रामीण जीवन, त्यातील भाषा, भाव-भावना आणि निसर्गाची सजीवता वाचकांना मंत्रमुग्ध करते. ही कादंबरी आपल्यालाही जीवनाचा अर्थ शोधायला भाग पाडेल.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003e- देवा झिंजाड\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53042963317055,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/Bhatkan_page-00011.jpg?v=1779343740"},{"product_id":"pati-an-dhagafuti","title":"पाटी अन ढगफुटी","description":"\u003cp\u003e'पाऊस शाळा', 'आभाळाची सावली' बालकविता संग्रह आणि 'भटकन' कादंबरी यानंतर कवी रविंद्र सोनवणे हे आपला चौथा कवितासंग्रह 'पाटी अन् ढगफुटी' घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहेत.\u003cbr\u003eरविंद्र सोनवणे हे उत्तम शिक्षक असलेले सामाजिक चळवळीची जाणीव असणारे कार्यकर्ते कवी, लेखक आहेत. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सातत्याने प्रयोगशील असतात.\u003cbr\u003eसभोवतालच्या समाज जीवनात घटनांचे निरक्षण, अभ्यास आणि निष्कर्ष काढण्याची चिकित्सक दृष्टी या कवितासंग्रहातून कवी रविंद्र सोनवणे यांच्याकडे दिसून येते. समकालीन वास्तवाचा उभा-आडवा छेद घेत ही कविता वाचकाला नवीन प्रश्नांकडे गंभीरपणे पाहायला लावते. हेच या कलेचे लक्षणीय यश आहे; असे मला वाटते.\u003cbr\u003eकवी रविंद्र सोनवणे यांची नवीन, सर्जनशीलतेला आयाम देणारी ही कविता निश्चितपणे वाचकांना मर्मदृष्टी देईल. त्यांची भाषाशैली साधी व परिणामकारक असूनही काही ठिकाणी तर खूपच प्रसादपूर्ण वाटते. समाजाच्या भल्यासाठी कवी रविंद्र सोनवणे यांनी यापुढेही लिहित राहावे; ही मंगल कामना !\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003eविलास सिंदगीकर\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमाजी सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि\u003cbr\u003eसंस्कृती मंडळ, मुंबई.\u003cbr\u003eसंवादः ९४२१३६९९४५\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53042974654783,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/PatiAnDhagphutiCover1.jpg?v=1779344477"},{"product_id":"aabhalachi-savali","title":"आभाळाची सावली","description":"\u003cp\u003e         विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, संवेदनशील कवी रविंद्र सोनवणे आपल्या 'पाऊस शाळा' या पहिल्या बालकवितासंग्रहानंतर 'आभाळाची सावली' हा नवीन बालकवितासंग्रह घेऊन मुलांच्या भेटीला आले आहेत. ही भेट नक्कीच मुलांना कवितेचा लळा लावणारी आणि त्यांचा आनंदाचा मळा फुलवणारी आहे.\u003cbr\u003e         सोनवणे यांची कविता मुलांना भरारी घेण्यासाठी कधी कवितेचे आभाळ देते. तर कधी उन्हात सावली होण्यासाठी गुलमोहराचे झाड होते. त्यांची कविता ससा कासवाच्या गोष्टीतले निरागसपण जपत मुलांच्या कल्पनाशक्तीला साद घालते. हे करत असताना कवितेतील लय, ताल, नादही जपत जाते. कवी सोनवणे यांना सुरांचे भान असल्यामुळे त्यांच्या कवितांचे आपसूक गाणे होते आणि हे गाणे मुलांना ठेका धरायला सहजगत्या लावते.\u003cbr\u003e         पंख असते तर, किती छान झाले असते उंच उडून जग सारे, पाहून आले असते.\u003cbr\u003e         अशी सहजता त्यांच्या कवितेत जागोजागी भेटते. त्यांची कविता मुलांना सोबत घेऊन निसर्गाच्या कुशीत शिरते.\u003cbr\u003e         थोडे दूर गेलो, पर्वतं ढगात भिडलेले \u003cbr\u003e         ढगही पर्वतांच्या, मिठीत सामावलेले\u003cbr\u003e         निसर्गदृश्य शब्दांत रेखाटताना त्यांची कविता अशी बोलकी होते. एकूणच कवी रविंद्र सोनवणे यांच्या 'आभाळाची सावली' या पुस्तकातील कविता सुंदर चित्रांच्या साथीने मुलांना कधी शेतशिवाराला फेरफटका मारायला नेते. कधी आनंदाच्या झुल्यावर बसून उंच आभाळी घेऊन जाते आणि म्हणूनच त्यांची कविता मुलांच्या आवडीची होते.\u003cbr\u003e         त्यांच्या पुढील काव्यप्रवासासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: right;\"\u003e\u003cstrong\u003eएकनाथ आव्हाड\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e(साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त कवी)\u003c\/p\u003e","brand":"Prime Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":53042979995967,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0977\/4071\/8399\/files\/AabhalachiSavali_RavindraSonawane2.jpg?v=1779344967"}],"url":"https:\/\/primebookss.in\/collections\/%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80.oembed","provider":"Prime Publishing House","version":"1.0","type":"link"}